अगोदर स्नान इत्यादी करुन शुध्द होऊन इष्ट देवतेच्या मुर्तीसमोर बसावे. प्राणायाम इत्यादींनी शरीर शुध्द करावे. त्यानंतर आसन विधी, न्यास, वगैरे करुन भगवंताची पुजा करावी.
अगोदर पूजा साहित्य, जमीन, स्वतः व देव मुर्ती हे सर्व पुजेसाठी योग्य बनवावे. नंतर आसनावर मंत्रोच्चार पूर्वक पाणी शिंपडून, पाद्य, आर्घ्य इत्यादी पात्रे जवळ तयार ठेवावीत. तदनंतर एकाग्र चित्त होऊन, हृदयादी न्यास करावे. नंतर हृदयात भगवंताचे ध्यान करुन समोरील मुर्तीमध्ये तिची स्थापना करावी आणि देश कालानुसार मिळालेल्या पुजा सामग्रीने मुल मंत्र म्हणून तिची पुजा करावी.
त्या त्या उपास्य देवतेच्या मुर्तीची हृदयी अंगे आयुधादी उपांगे आणि पार्शदासहीत त्यांच्या मंत्रांनी पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्रे, अलंकार, गंध, फुले, अक्षता, माळा, धुप, दीप, नैवेद्य इत्यादींनी यथासानग पुजा करावी. नंतर स्तोत्रांनी स्तुती करुन सदगुरूला, भगवंतांना नमस्कार करावा. तेच आपल्या मध्ये आहेत, असे ध्यान करीत इष्टदेवतेच्या मूर्तीचे पूजन करावे. निर्माल्य आपल्या मस्तकावर धारण करावे. नंतर मोठ्या आदराने इष्टदेवतेला हृदयामध्ये व योग्य ठिकाणी ठेवून पूजेची समाप्ती करावी. जो मनुष्य अशा प्रकारे अग्नी, सूर्य, जल, अतिथी आणि आपल्या हृदयामध्ये आत्मरूप श्रीहरीची पूजा करतो, तो लवकरच प्रगत होतो.
*****
देवावर विश्वास आहे किंवा नाही, नित्य पूजापाठ, उपासना होते किंवा नाही, ह्यावर जीवनाचे सुख किंवा आनंद अवलंबून नसतो, तर माणसाच्या सच्छीलतेवर, सज्जनतेवर व यथायोग्य नित्यकर्मान्वर, त्याच्या संस्कृतीवर,जीवनाच्या दैनंदिन कृतींवर,दातृत्वावर,त्याच्या चारित्र्यावर जीवनाचा आनंद अवलंबून असतो. आर्थिक सुबत्ता वा सर्व तर्हेचे स्वर्गोपभोग हे आत्मिक आनंद केव्हाही देऊ शकत नाहीत.
हा खेळ प्राक्तनाचा की पूर्व संचिताचा.
*****