सर्व वाचकांसाठी आवाहन
या पूस्तकात केलेल्या सर्व विवेचनावरून लक्षात येईल की
१. आपले सद्यजीवन हे स्वतंत्र आहे, मागील जन्माशी ह्या जन्माचा काहीच संबंध नाही, असे समजून राहणे हे चुकीचे आहे. ह्या संदर्भात पूस्तकाच्या सुरवातीला ४ धार्मिक, आध्यात्मिक उदाहरणांचा विचार केला आहे.
२. पंचमहाभूते, चार वर्ण, चार युगे, चार निजतत्त्वे, चार गुण, जन्मपत्रिका व १२ राशी ह्या सप्तसूत्रांवरून ब्रह्मांडातील मानवी जीवनाच्या नियंत्रणाची कल्पना येते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडणार्या गोष्टींची सूत्रबद्ध नोंद पिंडावर होऊन जीवनात घडलेले कर्मदोष कसे लक्षात यंतात, हे लक्षात येईल.
३. प्रत्येकाच्या जीवनात सुखदु:खे ही असतातच. आपल्या जीवात आपल्याला आपल्यातला अमुक एक दोष वा प्रश्न त्रास देतो, हे प्रथम शोधून पाहावे. मग हा दोष जर पून्हा पून्हा घडत असेल तर तो ग्राह्य धरून न राहता तो कर्माच्या माध्यमातून घालविण्याचा प्रयत्न करावा.
४. प्रारब्ध बदलतच नाही, असे समजणे बरोबर नाही. काय केल्याने प्रारब्ध बदलू शकेल, ह्याच्या सतत शोधात राहणे जरुरीचे आहे.
५. अखंड गुरुपरंपरेने आध्यात्मिक कार्य करणारे गुरू ह्या बाबतीत हमखास मार्गदर्शन करू शकतात. मार्ग सापडला नाही तर कोणालाही दोष न देता तो शोधतच राहावा. नाथ शक्तिपीठातून हे कार्य १९९३ सालापासून होत आहे.
६. आपल्या प्रयत्नांच्या अभावामुळे आपले जीवन व कुटुंबातील इतरांचे जीवन दुःखी करू नका.
७. ‘कर्मेण हरते व्याधि: कर्मेण हरते भय:| कर्मेण हरते चिन्ता कर्मेस्तु जयमंगल: ॥
हे लक्षात घेऊन सुयोग्य कर्म केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारचे दोष वा अडसर दूर होऊ शकतात, हे लक्षात घ्यावे.
समाप्त
********** हा खेळ प्राक्तनाचा कि पूर्वसंचिताचा **********