☼ वेद-विज्ञान, अध्यात्म आणि मानवी जीवन ☼
२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, अध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु ‘तो कां करायचा?’ हा चा मूळ प्रश्न असतो. अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यात्म हे वैदिक विज्ञान आहे, तर विज्ञान हे आधुनिक अध्यात्म आहे, तरी सुद्धा या दोन्ही गोष्टींमध्ये एक सूक्ष्म फरक आहे अध्यात्म हे व्यक्तिगत आहे, तर विज्ञान हे सार्वजनिक आहे. साधना, तप वगैरे करून, अध्यात्मात व्यक्तिगत विकास साधता येतो तर वैज्ञानिक शोध हे सार्वजनिक विकास साधू शकतात. विज्ञानाचा उपयोग करून सर्वसाधारण माणूसदेखील एक बटण दाबून प्रकाश निर्माण करू कतो, टीव्ही च्या सहाय्याने जगभरातील घडामोडींचा आढावा घेऊ शकतो, तर अध्यात्म हे व्यक्तिगत पातळीवर ह्या सर्व गोष्टींची अनुभूती निर्माण करू शकते.
पराकोटीची आध्यात्मिक उन्नती साधलेला एखादा योगी सत्पुरुष वरील सर्व गोष्टींची अनुभूती कोणतीही वैज्ञानिक उपकरणे न वापरता घेऊ शकते किंवा घेत असतो. हे खरे आहे की खोटे, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यावर एकच उपाय आहे – व्यक्तिगतरीत्या आपली आध्यात्मिक उन्नती साधा. त्या सात्त्विक आध्यात्मिक पातळीपर्यंत स्वत:चा विकास करा अन् मग पाहा हे सर्व अनुभव घेता येतात की नाही, हे खरे आहे की नाही.
परंतु आजच्या धावपळीच्या युगात हा प्रकार केवळ अशक्य आहे. कोणाजवळ एवढा वेळच नाही, हा फारच लांबचा प्रवास आहे. प्राचीन शास्त्रांत तर आपण असेही वाचतो, की अशा उच्चतम पातळीपर्यंत व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी कधी कधी सात सात जन्मच काय, अनेक जन्म वाट पाहावी लागते. ह्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागते. सर्वसाधारण माणसाला हा सगळा द्राविडी प्राणायाम आजच्या धावपळीच्या जीवनात केवळ अशक्य आहे.
मग ह्यावर उपाय तो काय? प्राचीन भारतीय इतिहासातील नोंदींवरून तर असे वाटते, की आपल्या दैनंदिन जीवनातील दु:ख, त्रास, निराशा, अपयश आदींवर अध्यात्मात उपाय तर आहेतच. आपण वेगवेगळ्या धार्मिक कार्याचा सोपस्कार करून तसा प्रयत्नही करून पाहतो पण त्यातून म्हणावे तसे अपेक्षित यश वा परिणाम काही मिळत नाही. उलटपक्षीं आधुनिक विज्ञानात अशा स्पष्ट गोष्टी आहेत, की एक बटण दाबले की पाहिजे तो चॅनल लागतोच, एक नंबर डायल केला की विशिष्ट व्यक्तीशी संवाद होतोच, वगैरे वगैरे आणि त्यातही ह्या सुविधा वापरणारा माणूस अगदी अनपढ असला तरीही चालतो, काय गंमत आहे, नाही परंतु हे जेवढे खरे व सोयीस्कर आहे तेवढेच अध्यात्मसुद्धा खरे आहे व ते असेच सोयीस्कर होऊ शकते. विज्ञानाला जशी प्रक्रिया आहे तशीच अध्यात्माला आपली एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जर आपण आत्मसात केली तर अध्यात्मदेखील तेवढेच सोपे व सोयीस्कर आहे. विज्ञानामध्ये शास्त्रज्ञ शोध लावतात, मार्गदर्शन करतात, तर अध्यात्मात ऋषिमुनी, साधुसंत, योगी सत्पुरुष हे कार्य करतात.
आता हेच पाहा ना, ज्योतिषशास्त्रात ग्रह व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो. आधुनिक खगोलशास्त्रातही ह्याचा अभ्यास केला जातो. दोन्ही पद्धतींत फरक आहे. परंतु अध्यात्माच्या ह्या विषयाची मूळ संकल्पना हीदेखील विज्ञानाच्या आधारे सिद्ध झाली आहे. समुद्राला येणारी भरती-ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणाशी संबंधित आहे. समुद्राचे पाणी आणि आपल्या शरीरातील रक्त ह्यांत खूपच साम्य आहे, हे मेडिकल सायन्सेसच्या आधारे सिद्ध झाले आहे. ब्लडप्रेशर असणार्या व्यक्तींना पौर्णिमेच्या दरम्यान अधिक त्रास होतो. म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावरही परिणाम होतोच. पागलखान्यात भरती केलेले वेडे, पौर्णिमेच्या दरम्यान विचित्र वागतात. मानवी मनावर, शरीरावर परिणाम करणारा चंद्र हा एकटाच आहे की इतरही ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य आदि सर्व खगोलीय वस्तुजात ह्या ब्रह्मांडातील सकल चराचर सृष्टी, आदी आपल्या शरीरातील कणाकणांवर परिणाम करीत असतात? ह्या सर्व परिणामांचे अति सूक्ष्म आणि अति सरळ पातळीवरचे गणित मांडणारे, अभ्यासणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. गल्लोगल्ली वा रस्त्यावर दुकान मांडून लोकांना फसविणार्या कुडमुड्या ज्योतिष्यांनी हे शास्त्र पूर्ण बदनाम करून टाकले आहे. जो येतो तो स्वत:ला एक निष्णात ज्योतिषी भासवितो. आपण अभ्यासिलेले उपाय ठासून सांगतात. मग हे उपाय केल्यावरही जर दोष गेले नसतील तर त्याचा हे विचारदेखील करीत नाहीत. स्वत:ची कोणतीच अनुभूती नसते, नशीब बदलविण्याचे त्यांचे सामर्थ्यही नसते. तरी ते इतरांच्या भविष्याशी सतत खेळत असतात. ज्योतिषशास्त्राचे सूक्ष्म आणि खरे गणित जाणून अचूक भविष्यवाणी करणारे प्रामाणिक अभ्यासक फारच थोडे आहेत, ते भेटणे हा खरा दैवयोगच आहे.
केवळ ज्योतिषशास्त्रच नव्हे तर अध्यात्माशी संबंधित सर्व शास्त्रे,वास्तुशास्त्र, स्थापत्य, नृत्य, संगीत, गायन, वादन, यज्ञशास्त्र, कर्मकांड ह्या सगळ्यांचे गहन विज्ञान आहे. आजच्या आधुनिक विज्ञानाची प्रगती ह्या प्राचीन विज्ञानापूढे अक्षरश: तोकडी आहे.
प्राचीन स्थापत्यशास्त्रांच्या आधारावर बनविलेल्या एखाद्या मंदिराचेच उदाहरण पाहा, अशा मंदिराच्या घुमटाचा आकार हा अति विशिष्ट ‘जॉमेट्रीतल्या पॅराबोलाच्या’ आकारासारखा असतो, अंतर्गोल आरशावर जर सूर्याची किरणे पडली तर ती परावर्तित होऊन आरशाच्या केंद्रस्थानी प्रखर उष्णता निर्माण करतात. ह्या केन्द्रस्थानी जर कापसाचा बोळा ठेवला तर तो क्षणार्धात जळू लागतो, मंदिराच्या घुमटाचाही असाच एक केद्रबिंदू असतो, तो बिंदू म्हणजे गाभार्यात बसलेल्या पूजार्यांचे स्थान. हे अति विशिष्ट आहे. त्या स्थानावर बसून म्हटलेल्या ॐ काराचा, मंत्रांचा, वैदिक मंत्रांचा ध्वनी घुमटाच्या आतील भागावरून परावर्तित होऊन अनेक पटींनी प्रभावी बनतो, मंदिरातील वातावरण भारून टाकतो आणि हे आपल्या रोमारोमाला जाणवते. किती परिणामकारक विज्ञान आहे हे !
हल्लीच्या काळात मंदिराच्या गाभार्यात ग्लेझ्ड टाइल्स लावल्या जातात. घुमटाच्या आकाराकडे कोणाचे लक्षच नसते. अगदी वाट्टेल त्या पद्धतीने आधुनिक मंदिरे बांधली जातात. प्राचीन स्थापत्यशास्त्राची टिंगल उडवून बांधलेल्या अशा मंदिरांत पावित्र्य जपले जाईल का? ह्याचा आपण विचारच करू शकत नाही. कारण आपल्याला ही प्राचीन कला आणि त्यांची मूळ संकल्पनाच अवगत नाही.
प्राचीन काळात अध्यात्माच्या आधारावर आजच्या प्रगत विज्ञानापेक्षाही प्रभावी व्यवस्था टिकून होती. आधुनिक विज्ञानसुद्धा थिटे पडेल अशी लगणना पद्धती त्या काळात प्रचलित होती. सूक्ष्मातिसूक्ष्मापासून काळाच्या अंतापर्यंत कालगणना करणारी परिणामे कशी असत, ह्याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.वैज्ञानिकांनी सूर्यकिरण हे एका सेकंदात ३,००,००० कि. मी. इतके अंतर पार करतात, असे सांगितले आहे. अशा सूर्य किरणाला तीन अणू ओलांडण्यासाठी अत्यल्प काळ लागतो, त्याला त्रुटी म्हणतात. पुढील तक्ता पाहा -
१०० त्रुटिका १ वेध ३ वेध १ लव
३ लव १ निमिष ३ निमिष १ क्षण
५ क्षण १ काष्ठा १५ काष्ठा १ लघू
१५ लघू १ नाशिका ६ नाशिका १ प्रहर
४ प्रहर १ दिवस १५ दिवस १ पक्ष
२ पक्ष १ मास २ मास १ ऋतू
३ ऋतू १ अयन २ अयन १ वर्ष
१२ वर्षे १ तप १०० वर्षे १ शतक
१० शतके १ सहस्रक ४ सहस्रके १ युग
४ युगे १ मन्वंतर १०० मन्वंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस.
असा एक ब्रह्मदेव १०० वर्षे जगतो, त्यानंतर त्याचा र्हास होऊन सृष्टीचा नाश होतो. सध्या हयात असलेले सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. स्टिफन डब्लू हॉकिंग ह्यांनी सुद्धा हीच संकल्पना मांडली आहे, अविरतपणे स्पंदन पावणारे ब्रम्हांड अशी ती संकल्पना आहे. म्हणजे बिग बँग ‘सृष्टीच्या निर्मितीचा क्षण’ ते बिग क्रंच ‘सृष्टीच्या विनाशाचा क्षण’ असा एकूण ब्रम्हांडाचा प्रवास असू शकतो. इतक्या महाप्रचंड घडामोडींसाठी १०० मन्वंतरे इतका प्रदीर्घ काळ लागतो आणि गंमत म्हणजे सुपर कॅम्प्युटरच्या हाय्याने केलेल्या गणितांवरून ह्या कालगणनेचे उत्तर अंदाजे १०० मन्वंतरे इतकेच येते.
अध्यात्मात पंचमहाभूतांचे वर्णन केले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश अशा पाच तत्त्वांपासून चराचर सृष्टीची निर्मिती झाली आहे. आधुनिक विज्ञानालासुद्धा ही पाच तत्त्व मान्य आहेत. वैदिक वाङ्मयात ह्यांचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत
१. पृथ्वी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध
२. आप शब्द, स्पर्श, रूप. आणि रस हे चार गुणधर्म असलेले हे
तत्त्व मानवी जीवनाचे एक द्योतक आहे.
३. तेज शब्द, स्पर्श, रूप (पाहा कशी एकेका गुणधर्माची उकल होत चाललीय.)
४. वायू शब्द, स्पर्श म्हणजे याचा गुणधर्म ध्वनियुक्त आणि स्पर्शयुक्त आहे, परंतु याला रूप नाही.
५. आकाश शब्द म्हणजे आकाशाला फक्त ध्वनी आहे; आघाती किंवा अनाघाती-कोणताही.
पृथ्वी हे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे, कारण त्यामध्ये पाचही गुणधर्म आहेत. विज्ञान ह्या पाचही तत्त्वांना मिळून मॅटर ही संकल्पना मानते. परंतु वरील सर्व गुणधर्म मॅटरमध्ये आहेत हे गणिताने सिद्ध होऊ शकले नाही. म्हणून डॉ. स्टिफन हॉकिंग ह्यांनी नुकतीच ‘डार्क मॅटर’ नावाची एक संकल्पना मांडली आणि आता मॅटर आणि डार्क मॅटर ‘म्हणजे नेमके काय’, हे प्रगत विज्ञानाला अजूनही डार्कमध्ये म्हणजे अज्ञात आहे. ह्या दोन्हींचा आधार घेऊन ह्या पाचही तत्त्वांचे विशद केलेले गुणधर्म गणिताने सिद्ध करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.
तात्पर्य इतकेच, की अध्यात्मिक विज्ञानाचे ज्ञान देऊ शकते परंतु विज्ञान अध्यात्मिक ज्ञान देऊ शकत नाही. आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म यान्ही संकल्पना मुळात एकच आहेत. अध्यात्माची दैनंदिन जीवनात उपयोगिता नेमकी कशी आहे? मानवी जीवनात त्याचा विधायक उपयोग करून घेता येईल का? पंचमहाभूतांचा मानवी जीवनावर सतत होणारा परिणाम, दैनंदिन अडचणी,घसरती आयुमर्यादा, दुर्भाग्य, नैराश्य, नकारात्मक विचारप्रवृत्ती, प्रारब्ध, पूर्वसंचित,नशीब, संतती दोष, अपत्यसुख, जीवनातील अशांतता, बिघडलेले व्यक्तिगत संबंध, पितृदोष, अशा अनेक अडचणींवर कायमची मात करण्यासाठी अध्यात्मात शुद्ध शास्त्रीय उपाय आहेत. हे उपाय आजपर्यंत जाणणारा, सांगणारा, करून दाखविणारा भेटला नव्हता, म्हणून हे सर्व अशक्य वाटत होते. प्रारब्ध हे भोगलेच पाहिजे. त्याला काहीच पर्याय नाही, ते भोगल्याशिवाय आत्मोन्नती नाही, हाच पिढ्या न् पिढ्या खोलवर रुजलेला मानवी समज. ह्याच समजुतीवर पारंपरिक पद्धतीने जीवन जगले जाते, म्हणून असे म्हणावे लागते, की अखिल ब्रह्मांडामध्ये अनेकविध स्थरांतील अनेकविध समस्यांत अडकलेला मानवी जीव कसा व का ? अकार्यक्षम होतो आणि व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अपेक्षित पातळी गाठण्यात तो कमी का पडतो? हे लक्षांत घेऊन त्यावर योग्य कर्म केले तर जीवनात घडणार्या गोष्टींमध्ये योग्य ते परिवर्तन करता येईल.
नाथ शक्तिपीठ अकोला येथे अशा तर्हेचे प्रारब्ध बदलण्याचे यशस्वी कार्य गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे, ह्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाची सतत धडपड सुरू असते. त्याची धडपड ही सुखाच्या शोधात असते. ती कशी हे आपण प्रथम पाहू
वेद :-
संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती ही वेदमंत्रांतून झाली आहे. ईश्वरीय शक्तीच्या मुखातून जे वेद निघाले त्या वेदांतून संपूर्ण सृष्टी व सृष्टीवरील जीवन निर्माण झाले, असे वेदशास्त्रामध्ये सांगितले आहे. मनुष्यजन्माची कहाणी ह्याच तत्त्वांवर आधारित आहे. जीवनात घडणारे कर्म ज्याचे त्याचे भाग्य ठरविते. आकाश जे सूर्यमंडळाने, ग्रहमंडळाने, नक्षत्र तारांगणाने भरलेले दिसते त्यातील नवग्रह हे प्रत्येक जीवाचे भाग्य, नशीब, योग आदी व्यक्त करीत असते. जीवाच्या जन्माजन्माची कहाणी ह्या नवग्रहांच्या भाषेतून आपल्याला प्राप्त होऊ शकते. असे हे ग्रहशास्त्र आहे. आपल्या जीवनातील कठीण प्रसंग वा खडतर योग हे ह्याच ग्रहमंडळाच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतात.
वेदमंत्रांच्या माध्यमातून ह्या सर्व प्रकारच्या योगांवर उपाययोजना करून जीवनातील कठीण प्रसंग वा खडतर योग हे सौम्य करता येतात किंवा ते बदलता येतात, ह्या गुरुकृपेने लाभलेल्या ज्ञानाचा उपयोग मानवजातीला मिळावा म्हणून अकोला येथे ‘नाथ शक्तिपीठाची’ स्थापना केली. संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण जे वेद करू शकतात, ते वेद मानवी जीवनात पाहिजे त्या प्रकारचे स्थित्यंतर घडवू शकतात. त्याला लागणारे पावित्र्य ज्या ठिकाणी असेल तेथे ही अनुभूती घेता येऊ शकते. वेदमंत्रांच्या भाषांतरित अर्थांना विशेष महत्त्व नाही. तसा तो लावणे देखील योग्य नाही. वेदमत्रांच्या नादाला विशेष महत्त्व आहे. अर्थ समजला नाही तरी त्यांच्या नादांचाच परिणाम होतो. म्हणून ते गुरुपरंपरेच्या सिद्धतेवर व ते कसे म्हटले जातात ह्यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे.
मानवी जीवनातील विविध वाईट योगांवर मात करण्यासाठी, तसेच जीवनातील अनेक प्रकारच्या खडतर योगांवर उपाययोजना करण्यासाठी अनुष्ठान हवनाची उपाययोजना येथून केली जाते. शक्तिपीठामध्ये होणारे हवन अनुष्ठान हे केवळ नाथ पंथाच्या परंपरागत कृपेवरच साध्य होतात. वेदशास्त्राच्या आधारावर एवढेच म्हणता येईल, की ज्या वेळी अग्निदेवता प्रसन्न होते त्या वेळी अग्निकुंडातून प्रत्यक्ष अग्निदेवता प्रगट होईल किंवा अग्निज्वाळां मधून वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विविध रंगाच्या ज्वाळा दिसू लागतील. नाथशक्तीपीठात तर याशिवाय कृपा करणार्या देवतांच्या आकृती ज्वाळांमधून आल्याचे फोटोतून दिसून येते.
वेदकालीन यज्ञयागादी क्रियांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सद्य (प्रचलित) परिस्थिती लक्षात घेऊन आणि आपली परंपरा लक्षात घेऊन शास्त्रीय, तांत्रिक आणि वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे होमहवन करून आजच्या कलियुगात फलसाध्य होणे केवळ दुरापास्त आहे. ते केवळ गुरुपरंपरेने, भलेल्या गुरुकृपेने साध्य होताना दिसते.
नाथ शक्तिपीठातून होणार्या हवनामधून नेहमीच वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अग्निज्वाळांचे रंग दिसतात. बर्याच वेळा ह्या रंगांबरोबरच ज्या देवता कृपा करतात त्यांच्या आकृती फोटोमध्ये आलेल्या दिसतात. अशा विविध हवनांमधून गणपती, देवी, हनुमान, भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम आदी बर्याच देवतांनी कृपा केल्याचे फोटोवरून लक्षात येते. हे सर्व केवळ योगाभ्यानंद व्यंकटनाथांच्या गुरुकृपेने घडते.
भौतिक विज्ञान :-आजच्या कलियुगांत प्रत्येकाला आपण सुखी असावे असे वाटते. वैज्ञानिक क्रांतीने मानव चंद्रावर वास्तव्याची स्वप्ने रंगवू लागला आहे. पाश्चात्य राष्ट्रांत विज्ञानाच्या जोरावर सर्व ऐहिक सुखे संपादन करण्यासाठी चढाओढ लागली असून, जास्तीत जास्त सुखसोयींच्या उपलब्धतेच्या मार्गावर मानवी जीवन कार्यरत आहे. एवढेच काय पण मानवाच्या प्रगतीने संततिसुख नसलेल्या कुटुंबांना टेस्ट ट्यूब संशोधनाद्वारा संततीसुख प्रदान करण्याची क्षमता विकसित केली आहे. सद्यःस्थितीत मानवी जीवनात त्याच्यापूढे अंत्येष्टी पावेतों अशी एकही समस्या सकृतदर्शनी उभी असल्याचे दिसत नाही, की ज्याची पर्यायी योजना आधुनिक विचाराप्रमाणे नाही. अशा ह्या वैज्ञानिक सिद्धतेच्या युगात आणि विशेषत: सर्व तर्हेच्या भौतिक जीवनातच सर्वस्व मानण्याच्या किंवा केवळ लौकिक आनंद मिळविण्याचा अट्टहास बाळगलेल्या माणसाला वाटेल, की धार्मिक कर्मांची अथवा धार्मिक विधीची आवश्यकता प्रतिपादन करणार्यांचा हा कर्मविधी काय करू शकणार ?
विज्ञान ज्या वेळी धर्माची कास सोडते त्या वेळी मानवजातिसाठी हानिकारक, विनाशकारक सिद्ध होते. तसेच आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मोठेपणासाठी, आपल्या इन्द्रियशमनासाठी, सामान्य लोकप्र्रवृत्ती दाबून टाकून धर्माला विज्ञानापासून विन्मूख करण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा धर्म हा धर्म राहत नाही. सामान्य जनजीवन भ्रष्ट होते.
परंतु मानवी विज्ञानाने सर्व समस्यांवर मात करताना मानवातले सत्त्व नाहीसे केले आहे. विज्ञानावर परावलंबी झालेल्या माणसाला आपल्या चिरसुखाची जाण राहिली नाही. अमेरिका, रशिया, जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्रांनी विज्ञानाचे भगीरथ प्रयत्न करूनही जीवनात सात्त्विक सुख, समाधान, शांतीचे कोणतेही स्रोत न दिसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी वैफल्य निर्माण झाले आहे. समाजप्रबोधन करण्यासाठी आपल्या शास्त्रांनी प्रतिपादन केलेल्या षोडश संस्कारांची हेटाळणी केली जात आहे. परस्परांच्या सुखदु:खांत तन, मन, धनाने समाविष्ट होणार्या सप्तपदीला रजिस्टर मॅरेजेसचे कृत्रिम स्वरूप आणल्याने प्रगत राष्ट्रात सूर्योदयाला विवाह व सूर्यास्ताला घटस्फोट अशा जटिल समस्या निर्माण झाल्या असून, या समस्यांवर तोडगा काढण्याचे सामर्थ्य विज्ञानात किंवा भौतिकवादी जीवनात नसल्याने वैज्ञानिक तथा भैातिक प्रगतीची राष्ट्रे अत्यंत कष्टी व मनोमनी दु:खी आहेत आणि म्हणून त्यांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे विशेष आकर्षण आहे.
सध्या अपघात, तसेच मादक पेयांचे सेवन, लैंगिक स्वैराचार यांनी आधुनिक समाजव्यवस्था खिळखिळी झाली आहे. एके काळी सर्व जगावर सामर्थ्य गाजविणार्या इंग्लंडमध्ये तसेच विश्वाच्या अन्यत्र महत्त्वाच्या परराष्ट्रांत मानसिक ताणतणाव, मानसिक असमाधान वगैरे गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. वृद्ध पिढी या सर्व समस्यांवर चिंताग्रस्त झाली आहे. जगाच्या बाजारात भारत हा ‘दरिद्री नारायणा’चा देश गणला जात आहे. भारतांतील फार मोठी जनता दारिद्य्रात आहे. तरी पण प्रत्येक घरात, महालात, झोपडीत शिव-शक्ती, राम कृष्ण आदींच्या प्रतिमा भक्तिभावाने पुजल्या जात असताना दिसत आहेत. अशा प्रकारचे जीवनादर्श हे घराघरातून दिसत आहेत. आमच्या वैदिक संस्कृतीचे हेच वैशिष्ट्य आहे. म्हणून पाश्चात्त्य देशही भारतीय संस्कृतीकडे वळले आहेत. आपल्या ऋषीमुनींनी जे वैज्ञानिक संशोधन केले, त्याचा आपण गहन विचार करणे जरुरीचे झाले आहे. वैवाहिक जीवनाच्या सुखप्राप्तीसाठी वधूवरांचे किमान १८ गुणांचे मिलन असल्याचा विचार आमच्या ज्योतिषशास्त्राने मांडला आहे. ह्याच्या परिणामादाखल समाजाने ह्याला मान्यता दिली आहे.
पाश्चात्त्य गहन विचारवंतांनी भारतीय संस्कृतीचा, हिंदू धर्माचा, सखोल अभ्यास करून म्हटले आहे की – ”After a study of some 40 years and most of the great religions of the World I find none of them is so perfect, none so scientific, none so philosopical and none so spiritual as the great religion known by the name of Hinduism. The more you know it, more you will love it, more you will understand it, more deeply; you will value it.” Dr. Annie Besant.
धर्म आणि विज्ञान यातील फरक असा लक्षात घेता येईल
धर्म विज्ञान
१. आध्यात्मिक तत्त्वावार आधारित आधिभौतिक तत्त्वावर आधारित
२. इहलोक परलोक तत्त्व फक्त इहलोक तत्त्व
३. त्यागप्रधान भोगप्रधान
४. निवृत्तिप्रधान प्रवृत्ति प्रधान
५. अहिंसाप्रधान हिंसा प्रधान
६. अतींद्रियगम्य इन्द्रियगम्य
७. अंतर्मुखता बहिर्मुखता
८. परिणामरम्य आपातरम्य
९. धन्वंतरी मदिराकलश
१०. मंत्रप्रधान यंत्रप्रधान
११. ब्रह्मात्त्ववादी देहात्मवादी
१२. मोक्षप्रधान अर्थ – कामप्रधान
१३. अध्यात्मिक ज्ञान विज्ञानाचे विज्ञान अध्यात्मिक ज्ञान
ज्ञान देऊ शकते. देऊ शकत नाही.
मानवी जीवन :-जीवनात प्रत्येक जण कुणाचा ना कुणाचा आधार घेतोच. तसेच तो कुणाचे ना कुणाचे, काही ना काही अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोच. त्याला मनुष्यजन्म कसा प्राप्त होतो व मानवी जीवनाचा मूळ उद्देश काय, ह्याबद्दल थोडे जाणून घेऊ.
जीवनात आधाराची गरज :-प्रत्येक जण जीवनात कुणाचा ना कुणाचा आधार घेतच असतो. काही जण तो व्यक्त करतात. तर काही जण व्यक्त करीत नाहीत. आपण जीवनाच्या सुरवातीपासून विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आपण जन्माला आल्यापासूनच सतत कोणाचा न कोणाचा आधार शोधत असतो आणि घेतही असतो. आधाराशिवाय आपण राहूच शकत नाही. जसजसे आपण मोठे होऊ लागतो, तसतसे हळूहळू कळू लागते, की कायम कुणाच्या आधारावर राहता येत नाही. वयात आल्यावर कळते की आई वडिलांचा आधारदेखील सर्व गोष्टींसाठी घेता येत नाही. तरीही जन्मापासून आधार शोधण्याची त्याची प्रवृत्ती जात नाही. त्याचे मन सदैव कुणाचा ना कुणाचा आधार शोधत असते. मग तो कुणाला आदर्श मानून त्याचा आधार घेत असतो, तर कुणाला आपले आराध्य दैवत मानू लागतो. काही लोक, मी कुणाचाच आधार घेत नाही, असा फाजील आव आणून सांगत असतात, परंतु स्वत:च्या मनातून सतत बदलता आधार घेत असतात. काही लोक आध्यात्मिक गुरू करतात व त्यांचा आधार घेतात. ज्या वेळी माणूस खिन्न मनाच्या अवस्थेत असतो त्या वेळेस त्याला ह्याची जाणीव होते. खरे पाहिले तर जोपर्यंत आपले मन खंबीर होत नाही, आपण खंबीरपणे उभे राहत नाही तोपर्यंत आपण डगमगतच राहत असतो.
आधार कुठे आणि कुणात शोधणार? गुरू केले म्हणजे सर्व कांही ठीक होईल, ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. गुरू त्यांचे कार्य, त्यांचे तत्व,त्यांचे सामर्थ्य आदी गोष्टींचा विचार न करता सर्व तर्हेच्या कल्पना आणि अपेक्षा आपण त्यांच्याकडून बाळगतो. ते आपल्या बाबतीत कसे घडू शकेल ह्याचा आपण सूत्रबद्ध विचार करीत नाही. आपल्याला जे वाटते तेच बरेबर आहे, असे समजून आपण वावरत असतो. आपली विचारसरणी वा विचाराची दिशा आपण बदलण्याचा प्रयत्नच करीत नाही.
जीवनात आदर्शाचे अनुकरण :
आजपर्यंतच्या प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार विविध शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून निरनिराळ्या विषयांचे शिक्षण घेऊन प्रत्येक जण स्वत:ला जसे हवे तसे घडवीत आला. शिक्षणाबरोबरच महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज आदींसारख्या थोर राष्ट्रीय विभूतींच्या चरित्रगाथेवरून त्यांचे गुण ग्रहण करून आपल्या व्यक्तिमत्वात निरनिराळेपण आणून आपल्या गुणांचा विकास घडवीत असतात, हे आपण सततच पाहतो.
ज्याप्रमाणे अशा थोर विभूतींच्या चरित्रांवरून त्यांचे गुण ग्रहण केले जातात, त्याचप्रमाणे अति प्राचीन भारतीय संस्कृतीचे शिल्पकार, ऋषिमुनी, अवतारी युगपूरुष, यांच्या चरित्रांवरूनदेखील गुण ग्रहण करून व्यक्तिमत्त्व घडविता येते.
मारूती, गणपती, शंकर, रेणुकामाता, भगवान दत्तात्रेय आदी देवता आहेत, असे जन्मानुजन्म, पिढ्यान्पिढ्या आपला इतिहास आपल्याला सांगत आला. यांच्याकडे ‘देव’ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन मानवजातीने ठेवला आहे, परंतु यापैकी कुणीच स्वत:ला ‘देव’ समजले नाही अथवा त्यांनी आपली ओळख ‘देव’ म्हणून दिली नाही. त्यांच्या देवासमान सामर्थ्याची अनुभूती सदैव इतर लोक घेत आले आणि म्हणूनच लोक त्यांना ‘देव’ म्हणून संबोधू लागले. परंतु या सगळ्यांचा आपला स्वत:चा इतिहास आहे. त्यांच्या जीवनचरित्राच्या गाथा आहेत. जनसमुदायांनी त्यांना युगप्रवर्तक, युगपूरुष एक आदर्श चारित्र्यसंपन्न आदर्श अनुकरणीय सत्पुरुष आदी विचार न करता, त्यांचे गुण ग्रहण न करता त्यांना देव संबोधून बाजूला ठेवले .
समाज एवढ्यावरच थांबला नाही, तर ह्या देवांचे गुणगान करणार्या आणि त्यांच्या गुणवैषिठ्यांची अभिलाषा करणार्या भक्तजनांना अंधश्रद्धावादी म्हणून समाजामध्ये देवाला, भक्ताला व भक्ताच्या जीवनपद्धतीला हिणवू लागला. समाजामध्ये अंधश्रद्धेचा वितंडवाद सुरू केला. श्रद्धा ही मुळातच अनुभूतिपूर्ण असते. ज्या विश्वासाला प्रत्यक्षानुभूतीची जोड नसते तो केवळ विश्वास असू शकतो. परीक्षणानंतर विश्वास हा बरोबर, असा निष्कर्ष निघू शकतो किंवा चूकही निघू शकतो. श्रद्धा ही अनुभूतीच्या आधारावर असल्यामुळे ती बरोबर नाही, हे म्हणणे निखालस चुकीचे असेल. श्रद्धा ही व्यक्तिगत असते. ती सर्वसामान्य राहू शकत नाही. अनेक लोकांची एकसारखी श्रद्धा असली तरी
तिला जनतेची श्रद्धा म्हणता येणार नाही. परंतु जनतेचा अमुक एक विश्वास आहे, असे म्हणता येऊ शकेल.
समाजातील काही व्यक्तींनी स्वार्थप्रेरित होऊन विनाकारणच जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयास सुरू केला आहे. जनतेचा कौल आपल्या बाजूने असावा म्हणून राजकारणी लोकांनीही अंधश्रद्धेच्या विचारांना हळुवारपणे खतपाणी घालण्याचा निष्फळ व्याप सुरू ठेवला आहे. ज्या लोकांच्या श्रद्धेला तडा जातो ते आपला विरोध आपल्या कृतीने दाखवूनच देतील आणि हाच विरोध अनेकांना घातक ठरेल.
संपूर्ण ब्रह्माण्डाच्या ह्या खेळामध्ये जीवनचक्राच्या भोवर्यात अडकलेला माणूस सुखी कसा व केंव्हा होणार? त्यातून माणसाकडून यथायोग्य कर्म घडले नाही तर जीवन असह्य, दुख:द व कष्टप्रद होत राहणार.
कलियुग सुरू होण्यापूर्वी सामान्य माणसामध्ये ईश्वराविषयी जी भावना,भक्ती, आस्था, साधना होती, जी सत्त्वशीलतेची व अध्मात्माची जोड होती,जी अनुभूती होती ती आता काहीच राहिली नाही. मनुष्य सत्प्रवृत्त राहिला नाही. ह्या सर्वांचा परिणाम होऊन माणसाचे जीवनमान, प्रकृतिमान ढासळून त्याची आर्युमर्यादा कलियुगामध्ये कमी झाली आहे. कलियुगातील मनुष्यजीवनाची आखणी ही १२० वर्षांची आहे, परंतु एवढे आयुष्यमान सहसा पाहण्यात येत नाही. माणसाच्या जीवनातील यथायोग्य दान, धर्म व कर्माच्या कमतरतेमुळे त्याचे जीवनमान कमी होत असल्याचे लक्षात येते.
मनुष्यजन्म :-मनुष्यजन्म हा दुर्लभ आहे. जीवांचे ८४ लक्ष योनी भ्रमण झाल्यावर त्याचे पापपूण्य समान झाले, म्हणजे मनुष्यजन्म येतो. मानवयोनीतही ४ लक्ष योनी आहेत. त्याचे विविध प्रकार आहेत. मनुष्यजन्मात पूरुषार्थाच्या साधनाने ऐहिक व पारलौकिक सुखाची साधना करता येते. यासाठी व्रत,जप,नियम, तप, स्वाध्याय आदी साधनाने पूण्यसंचय करून पापरूप दुःखाचे क्षालन करता येते. त्यामुळे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पूरुषार्थाच्या साधनांनी
मनुष्यजन्माचे सार्थक करून सुखाची प्राप्ती होते. परंतु सांप्रत या काळात मानव प्रायः अर्थ व काम यांच्या मागे विशेष लागतो व परिणामतः तो दुःखात सापडतो. हे काही शारीरिक व मानसिक असू शकतात, ही कशाने उत्पन्न होतात, याचा विचार करणे योग्य आहे.
‘पूर्व जन्मकृतं पापं व्याधिरूपेण बाधते |
तच्छान्तिरौषंधैदानेः जपश्राद्धादि कर्मभिः ॥
यात पूर्वजन्माचा विचार केला आहे. आपल्या भारतखंडात पूर्वजन्माचे पूष्कळ दाखले पाहावयास मिळतात व अलीकडे पाश्चात्त्य देशांतपण याचे संशोधन चालू आहे. मनुष्ययोनी सोडून अन्य योनी या भोग योनी आहे. परंतु त्याचा विचार या ठिकाणी आपण करतो. मानवजन्मात पाप, पूण्य हे आपल्या कर्माचे फल आहे. पुन्हा मानव जन्म मिळणे हे सुखाचे फळ आहे. दुःखाचे मार्जन, जप, तप, शांती, हवन व श्राद्धादी कर्माने होते. काही शारीरिक दुःखे औषधाने दूर होतात. परंतु सर्व दुःखांचे परिमार्जन करण्याकरता मानवाने सद्धर्माचरण करून पूण्यसंचय केला पाहिजे. म्हणजे त्यास सुख मिळेल, पण सद्यःस्थिती अशी आहे.
‘पूण्यस्य फलमिच्छन्ति पूण्यं नेच्छन्ति मानवः |
न पापफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः ॥
या कलिकालात मानव पूण्याचे फल जे सुख त्याची इच्छा करतो आणि त्याकरिता पूण्यसंचय न करता पापकृत्य अधिकाधिक करतो. त्याने तो अधिक दुःखी होतो. पूर्वी कृत, ‘सत्य’, त्रेता व द्वापार युगात सद्धर्माचरण, श्रुती स्मृतीचे मर्यादा पालन, यमनियम, जप, तप, आदी अनुष्ठानादी कर्मे, ईश्वरोपासना, अग्निहोत्र, आश्रम, धर्मपालन इत्यादी कर्मांनी मानव सुखी होते. त्याला दुःख माहीत नव्हते. पण या कलियुगात आज सर्वत्र दुःखांचे जाळे पसरलेले आहे. याचे कारण अधर्म, निषिद्धाचरण, परद्रव्यहरण, परस्त्रीगमन, अशा अनेक पापकर्मांनी धर्ममर्यादापालन, पूण्यसंचय होत नाही. त्याबरोबर श्राद्धकर्माचा लोप होत असल्याने अधिकांश मानव पीडित झालेला दिसतो. श्राद्धकर्म झाले नाही, तर पितरांना प्रेतत्व येते. याकरिता योग्य कर्म अवश्य केले पाहिजे. ते जर केले नाही तर जीवनामध्ये दुःख, विघ्ने व व्याधी उत्पन्न होतात.
‘सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता |
परो ददातीति कुबुद्धि रेखा ॥
अहं करोमीति वृथाभिमानः |
स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकः॥
म्हणजे माणसाला सुख अगर दुःख देणारा असा अन्य दाता नाही. ते आपल्याला दुसरा तिसरा कुणी देतो हा भ्रम आहे. सुख-दुःख दोन्ही गोष्टी मनुष्य स्वकर्मानेच निर्माण करतो. एखादे महान कृत्य केल्यावर ‘हे मी केले’ असा अभिमान माणसाने धरणे हेही व्यर्थ आहे. कारण सर्व जग हे आपल्या कर्म फलाच्या सूत्रांनी बांधलेले आहे.
मानवी जीवनाचा उद्देश :-संपूर्ण ब्रह्माण्डामध्ये म्हणजे पृथ्वी, आप,तेज, वायू, आकाश ह्यामध्ये अनेकविध घटना सततच घडत असतात. त्या आपल्या आत्म्याच्या पलीकडील आहेत. ह्या ब्रह्माण्डामध्ये माणूस हा एक अती लहान घटक आहे, परंतु माणसाला असलेली बुद्धी अनेकविध आश्चर्यकारक घटना करून दाखवीत आलेली आहे. हे जरी सत्य असले तरी अनेकविध विषय माणसाच्या, विज्ञानाच्या आकलनाच्या बाहेर आहेत. माणूस जीवनामध्ये असा का वागतो, त्याच्या जीवनात घडणार्या घटना अशा का घडतात माणसाचे जीवन हे कीर्ती, पैसा, स्वर्गीय उपभोग्य गोष्टी मिळविण्यासाठी माणसाचा जन्म आहे का? गतजन्मीच्या कर्माचे फळ भेागीत भोगीत जीवन कंठण्याकरिता त्याचे जीवन आहे, याचा विचार क्रमाक्रमाने पूढे गेलेला आहे. माणसाचे जीवन हे केवळ कर्म करून आत्मा उन्नत करून परमात्म्यात विलीन होण्याकरिता मिळालेली संधी आहे आणि जीवनामध्ये मिळणारे सुख, समाधान हे गतकर्माचे फळ आहे. हे समजून या उद्देशाने मानवी जीवनाला प्रेरित करून, साह्यभूत होऊन आपले जीवनकार्य करावे ही माणसाची त्याच्या जीवनाकडून अपेक्षा आहे. याचा ऊहापोह पूढे केला आहे. सामान्य माणसासाठी ज्योतिषाचा अभ्यास न करता किंवा कुठल्याही ज्योतिषावर विसंबून न राहता त्याच्या जीवनात त्याने काय करावे, ह्याचा उहापोह ह्या पूस्तकात केला आहे. तिषशास्त्राप्रमाणे सृष्टीमध्ये जेवढी काही माणसे आहेत किंवा पूढे होणार आहेत, या सर्वांची विभागणी १२ भागांत केली आहे. म्हणजे सृष्टीवरील कोणताही माणूस हा या १२ विभागांपैकी एक असणार. ह्या प्रत्येक विभागाला ‘रास’ (राशी) म्हणून संबोधले आहे. म्हणजे संपूर्ण मानव जात ही बारा राशींमध्ये विभागली आहे. आपल्या राशीला कोणती उपासना करावयास पाहिजे त्याचा ऊहापोह या पूस्तकात केला आहे. आपल्या राशीप्रमाणे अपेक्षित उपासना केली तरी आपल्या जीवनातले योग हळूहळू बदलताना लक्षात येतील. उपासनेला आणि त्याच्या परिणामाला कालावधी किती लागेल याला इतर काही प्रमाण नसून जो जितकी प्रभावी उपासना करेल तितकेच स्थित्यंतर त्याच्या जीवनात होत असल्याचा अनुभव तो घेईल. परंतु याला बराच कालावधी लागू शकतो. याचप्रमाणे कमी कालावधीमध्ये स्थित्यंतर घडवून घेण्याची जर अपेक्षा असेल तर ते कार्य ‘नाथ शक्तिपीठ’, अकोला येथून होत असते. जीवनातले दोष सहन करून राहणे हेच आपले प्रारब्ध मानून राहणे असा विचार ठेवला तर आयुष्याचा खूप मोठा कालावधी हा त्रासातच घालवावा लागेल. जितक्या लवकर आपण प्रभावी उपाय करू तेवढे हे दोष लवकर दूर होऊन उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे व पूर्वीपेक्षा भरभराटीचे जाईल. या प्रभावी उपासनेबद्दल पूढे माहिती दिली आहे.
आई-बाप हे साधन जन्मा | साध्य सद्गुरू जन्मात |
गुरुविण गवसे काय जीवाला | ज्ञानमूर्ती गुरूविश्वांत |