☼ माणसाचे योग व भोग ☼
ब्रह्मांडातील सातवा घटक म्हणजे जगातील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा प्रकारातच म्हणजे राशींतच :-
आता १२ राशींचे विभाजन ह्या चार महातत्त्वांमध्ये केले आहे.
भूमितत्त्वात : वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे.
जलतत्त्वात : मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे.
अग्नितत्त्वात : मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे.
वायुतत्त्वात : मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश आहे.
भौगोलिक दृष्टीने विचार केला तर असे लक्षात येते, की भारतामध्ये ह्या पाच तत्त्वांची शिवलिंगे निरनिराळ्या ठिकाणी आहेत. कांचीपूरमचे लिंग हे पृथ्वीतत्त्वाचे आहे, तर आपतत्त्वाचे शिवलिंग तिरुवाणैकावल (त्रिचनापल्ली) येथे आहे.तिरुअण्णामलाई येथील लिंग हे तेजतत्त्वाचे असून, आंध्रमधील कालाहस्ती (तिरुपतीजवळ) येथे वायुतत्त्वाचे शिवलिंग आहे. तामिळनाडूतील चिदंबरम येथे आकाशतत्त्वाचे लिंग आहे.
अशाप्रमाणे भूतलावरच्या सर्व व्यक्तींवर पंचमहाभूतांचा खोलवर परिणाम झाला असून, सर्व लोकांचे वर्गीकरण हे पंचमहाभूतांच्या तत्त्वांनुसार १२ राशींत केले आहे. राशी म्हणजे त्या त्या महातत्त्वाचे जे निजतत्त्व, जे निजगुण (पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे) तेच त्या त्या राशींच्या लोकांमध्ये राहतील. म्हणजे प्रामुख्याने तेच स्वभाव त्या त्या लोकांचे राहतील. म्हणजे त्या त्या लोकांची वासनादेखील त्यांच्या राशीप्रमाणेच राहणार.
मेष – अग्नितत्व
अश्विनी, भरणी, कृत्तीका नक्षत्रे मिळून ही रास होते. कार्तिक महिना, १, ६,११, या तिथी व रविवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभूरामचंद्रांची उपासना करावी.
वृषभ – भूमितत्त्व
कृत्तिका, रोहिणी व मृग नक्षत्रे मिळून ही रास होते. मार्गशिर्ष महिना, ५, १०,१५ या तिथी व शनिवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.
मिथुन – वायुतत्त्व
मृग, आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्रे मिळून ही रास होते. आषाढ महिना, २, ७,१२ या तिथी व सोमवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. उत्तर दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. शंकर व वीर हनुमानाची उपासना करावी.
कर्क – जलतत्त्व
पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा नक्षत्रे मिळून ही रास होते. पौष महिना, २, ७, १२ या तिथी व बुधवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पश्चिम दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना करावी.
सिंह – अग्नितत्व
मघा, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी नक्षत्रे मिळून ही रास होते. ज्येष्ठ महिना, ३, ८,१३, या तिथी व शनिवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभूरामचंद्रांची उपासना करावी.
कन्या – भूमीतत्त्व
उत्तराफाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे मिळून ही रास होते. भाद्रपद महिना, ५, १०,१५ या तिथी व शनिवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.
तूला – वायुतत्त्व
चित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्रे मिळून ही रास होते. माघ महिना, ४, ९, १४ या तिथी व गुरुवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. उत्तर दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. शंकर व वीर हनुमानाची उपासना करावी.
वृश्चिक - जलतत्त्व
विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा नक्षत्रे मिळून ही रास होते. अश्विन महिना, १, ६, ११ या तिथी व शुक्रवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पश्चिम दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना करावी.
धनू – अग्नितत्व
मूळ पूर्वाषाढा, उत्तराषाढा नक्षत्रे मिळून ही रास होते. श्रावण महिना, ३, ८,१३, या तिथी व शुक्रवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभूरामचंद्रांची उपासना करावी.
मकर – भूमितत्व
उत्तराषाडा, श्रवण व धनिष्ठा नक्षत्रे मिळून ही रास होते. वैषाख महिना, ४, ९,१४ या तिथी व मंगळवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.
कुंभ – वायुतत्त्व
धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे मिळून ही रास होते. चैत्र महिना, ३, ८, १३ या तिथी व गुरुवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. उत्तर दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. शंकर व वीर हनुमानाची उपासना करावी.
मीन – जलतत्त्व
पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती नक्षत्रे मिळून ही रास होते. फाल्गुन महिना, ५, १०, १५ या तिथी व शुक्रवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पश्चिम दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना करावी.
बारा राशी आणि त्या राशींच्या लोकांची स्वभाववैशिष्ट्ये :-
हे स्वभाव ठोकळमानाने दिले आहेत. इतर ग्रह, त्यांची युती व पत्रिकेतील घर ह्याप्रमाणे स्वभावात बदल होऊ शकतो.
रास राशीत मोडणार्या लोकांचे ठळकमानाने स्वभाव
मेष तापट, उतावळा, महत्त्वाकांक्षी व धाडसी
वृषभ अभिमानी, हटवादी, स्वार्थी आणि रसिक
मिथुन विवेकी, समजदार, न्यायी व लोकप्रिय
कर्क निष्काळजी, निरुपद्रवी, दानी व अहंकारी
सिंह निश्चयी, पराक्रमी, चतुर व उदार
कन्या मतलबी, विद्याव्यासंगी, व्यवहारी व तर्कट
तूला शौकीन, ताठर, सरळमार्गी व शिस्तप्रिय
वृश्चिक कोपी, अभिमानी, धाडसी व हेकेखोर
धनू सत्कर्मी, विश्वासू, दिलदार व प्रामाणिक
मकर नाटकी, लहरी, हेकट व चतुर
कुंभ हट्टी, सुस्वभावी, विद्वान व सूडी
मीन उद्योगी, स्वार्थी, दिलदार व भेकड
रास आणि त्या राशीच्या लोकांनी करावयाची दाने :
जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे. सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अगर दान घेणार्याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी तिळमात्र संबंध नाही. दानाच्या महत्त्वाला शास्त्राधार आहे
* रास दानाचा प्रकार
१. मेष व वृश्चिक मसूरडाळ, गूळ, तांबे व निळे वस्त्र.
२. वृषभ व तूळ ज्वारी, बाजरी, दूध, सुवर्ण व हिरवे वस्त्र.
३. मिथुन व कन्या मूग, फळे, सुवर्ण व पिवळे वस्त्र.
४. कर्क तांदूळ, साखर, रुपे व पांढरे वस्त्र.
५. सिंह गहू, गूळ, तांबे व लाल वस्त्र.
६. धनू व मीन हळद, मीठ, सुवर्ण व पिवळे वस्त्र.
७. मकर व कुंभ तीळ, तेल, उडीद, लोखंड व काळे वस्त्र.
ग्रहांचे वैशिष्ट्य व त्याचा मानवी जीवनावर, स्वभाव वैशिष्ट्यांवर होणारा परिणाम :
प्रत्येक जीवावर ग्रहांचा स्वत:चा परिणाम असतो. सूर्यमंडळात भ्रमण करणारा हा ग्रह त्याच्या परिणामस्वरूप माणसावर काय परिणाम करतो, हे ढोबळमानाने खाली दिले आहे. अखिल ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवावर ग्रहांचा परिणाम होत असतो. तो ग्रह किती अंशात्मक त्याच्या राशीला आहे त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव दिसेल. अशा प्रकारे प्रत्येक माणसावर आपोआप परिणाम होऊन त्याचे वागणेबोलणे, स्वभाव, विचार, व्यक्तिमत्त्व आदी गोष्टी घडतात.
१ रवी ग्रह :-सूर्य किंवा रवी हा ग्रहमालिकेचा राजा आहे. सर्वच ग्रह रवीच्या अस्तंगत भ्रमण करीत असतात. रवीमुळे माणसाच्या सुखदु:खाची कल्पना येते. समाजामध्ये त्याचा असलेला मानमरातब, द्वेष, राजसन्मान, अधिकार, पराक्रम, कीर्ती आणि निरनिराळ्या उद्योगधंद्यांचा बोध होतो. माणूस निर्भय आहे, प्रामाणिक आहे, की न्याय्य वृत्तीचा आहे, ह्याचा बोध रवी ह्या ग्रहावरून होतो.
रवी अनिष्ट असल्यास रवीचा जप करणे. ११ रविवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान ज्याला पीडा आहे त्याच्यावरून दहीभात ओवाळून, पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवणे, वा स्वत:च्या वजनाएवढा गहू नित्य वेद पठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे.
(२) चंद्र ग्रह :-चंद्र हा मनाचा कारक आहे. पृथ्वीचा तो उपग्रह आहे मानसिक ताणतणाव, सुखदु:ख ह्याचा विचार पत्रिकेतील चंद्र कसा आहे, ह्याच्यावरून केला जातो. परदेशगमन, जलप्रवास, उदर, स्तन आणि मेंदूवर चंद्राचाच अंमल असतो. ऐश्वर्य, सुगंधी पदार्थ, संपत्ती इत्यादींची माहिती ह्या ग्रहावरून होते. चंद्र अनिष्ट असल्यास चंद्राचा जप करणे. लघुरुद्र करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा तांदूळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे.
(३) मंगळ :-मंगळावरून लहान भावंडांच्या सुखदु:खाचा, वैवाहिक जीवनाचा अंदाज घेता येतो. हा ग्रह पूढारी, सेनापती, डॉक्टर, शास्त्रज्ञ, लोहार, कासार व सोनार ह्या व्यक्तींचा कारक आहे. ह्या ग्रहावरून युद्ध, धरणीकंप, अग्निप्रलय आदींचा अभ्यास होऊ शकतो. जीवनातील फौजदारी खटले, तुरुंगवास, मरण इत्यादी गोष्टींचे ज्ञान देतो. मूत्राशयावर, रक्तस्रावावर, साथीच्या रोगावर मंगळाचा अंमल असतो. भूमीवर ह्याचा विशेष प्रभाव आहे. मंगळ अनिष्ट असल्यास मंगळाचा जप करणे. सप्तशतीचे पठण करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा गूळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. मंगळवारचे उपवास करणे. गणपतीची आराधना करणे.
(४) बुध:-मुळात हा ग्रह नपूंसक आहे. तसा जात्याच बुद्धिमान आहे. बुद्धिमत्ता, लेखनकार्य, गणिती क्षमता, न्यायव्यवस्था आदी बुद्धिमत्तेचे मूल्यांकन ह्या ग्रहावरून करतात. ज्ञानतंतू, मज्जातंतू, फुफ्फुसे, आतडी आणि जीभ ह्यांच्यावर बुध ग्रहाचा अंमल असतो.
बुध अनिष्ट असल्यास बुधाचा जप करणे. निळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा मूग नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. बुधवारचे उपवास करणे. कृष्णाची आराधना करणे.
(५) गुरू :-हा आनंद व समाधान देणारा आहे. वेदान्त, तत्त्वज्ञान, गणित, शास्त्र, विविध कला आदींचे ज्ञान होऊ शकते. यश, कीर्ती, शांती आदींचे मोजमाप करता येते. कावीळ, मधुमेह, रक्तदाब, देवी, गोवर आदी व्याधींचे ज्ञान ह्या ग्रहावरून होऊ शकते.
गुरू अनिष्ट असल्यास गुरूचा जप करणे. पिवळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढी हरभराडाळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. गुरुवारचे उपवास करणे. दत्ताची आराधना करणे.
(६) शुक्र :-स्त्री, चैन व विलासयोग ह्या ग्रहावरून कळू शकतात. प्रापंचिक सुख, गायन, चित्रकला, साहित्य, मंत्रतंत्रविद्या, वाहनसौख्य, अमली पदार्थ, जुगार, वेश्याव्यवसाय, उधळपट्टीची वृत्ती, अत्तरे, अलंकार, वीर्यविकार, मासिक पाळी आदींचे ज्ञान ह्या ग्रहामुळे होते.
शुक्र अनिष्ट असल्यास शुक्राचा जप करणे. पांढर्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा तांदूळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. शुक्रवारचे उपवास करणे. देवीची आराधना करणे.
(७) शनी :-व्यवहारदक्ष, तडकाफडकी निर्णय घेणे, गंभीर वृत्ती, चिकाटी हे विशेष गुण आहेत. वकील, शास्त्रज्ञ, गणित, गूढ विषय, नैराश्य हे विशेष आहेत. शरीरातील सांधेदुखी, दमा, अर्धांगवायू, हृदयविकार, मूळव्याध आदी शारीरिक त्रास शनीमुळे होऊ शकतात.
शनी अनिष्ट असल्यास शनीचा जप करणे. काळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा उडीद वा तेल नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. शनिवारचे उपवास करणे. ‘पंचमुखी हनुमाना’ची संध्याकाळी उपासना करणे.
(८ व ९) राहू व केतू :-हे मुळात ग्रह नाहीत. ह्यांना छेदनबिंदू म्हणून मानले आहे. जन्मकुंडलीत ह्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. हे विषारी प्राण्याचे कारक आहेत. ह्यांच्यामुळे अघोरी विद्या, स्मृतिनाश, अंधत्व, नैराश्य, पंगुत्व, वेडेपण, विषप्रयोग, आत्महत्या, भूतबाधा आदींचा बोध होतो. कुंडलीत हे जर चांगल्या स्थितीत असतील तर अमाप पैसा व यश देतात. मानवी शरीरावर मंगळ व शनी ह्या ग्रहांचे परिणाम सांगितले आहेत, तसे होतात.
(८) राहू : अनिष्ट असल्यास राहूचा जप करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढे सप्तधान्य जिथे नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. पंचमुखी हनुमानाची संध्याकाळी उपासना करणे. लघुरुद्र करणे.
(९) केतू : अनिष्ट असल्यास केतूचा जप करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढे सप्तधान्य जिथे नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. पंचमुखी हनुमानाची संध्याकाळी उपासना करणे. लघुरुद्र करणे.
ग्रह उपासनेची दिशा व वस्तीचा तक्ता
प्रभावी उपासनेच्या दृष्टीने ग्रह, त्यांच्या उपासनेच्या योग्य वेळा, कोणत्या दिशेला तोंड करून बसावे, तसेच त्यांची वस्ती कोठे आहे, हे पूढील तक्त्यावरून कळेल.
ग्रह वेळ तोंड करण्याची वस्ती कोठे आहे?
दिशा
१ रवी दु. १२ ते ३ पूर्वेकडे रुईच्या झाडाखाली
२ चंद्र रा. १०.३० ते १२.३० उत्तरेकडे पळसाच्या झाडाखाली
३ मंगळ पहाटे ३ ते ५ पूर्वेकडे खैराच्या झाडाखाली
४ बुध पहाटे ४ ते ६ दक्षिणेकडे तांबडा आघाडा
५ गुरू पहाटे ४ ते ६ पश्चिमेकडे औदुंबराखाली
६ शुक्र पहाटे ३ ते ६ उत्तरेकडे पिंपळाखाली
७ शनी सूर्यास्त ते दक्षिणेकडे शमीच्या झाडाखाली
सूर्योदयापर्यंत
उपासनेच्या दृष्टीने तसे सातच ग्रह महत्त्वाचे आहेत. राहू व केतू ह्यांना तसे ठराविक महत्त्व नसल्यामुळे त्यांचा येथे उल्लेख केला नाही.
राशी आणि वनस्पती
कोणत्या राशीला कोणत्या वनस्पतीचे महत्त्व आहे, हे पूढील तक्त्यावरून लक्षात येईल. वनस्पतीची पूजाही परिणामकारक असते. आटोकाट प्रयत्न करून पूजा, जप आदीही झाडाखालीच करावी. झाडाखाली पूजा करणे त्रासदायक असले तरी तो त्रास सहन करणे चांगले. तसे न केल्याने होत असलेला त्रास, कष्ट आदी हे जास्त असल्याचे जाणवते. परंतु झाडाखाली अशी उपासना करणे केवळ अशक्य असेल तर शक्य असेल त्या पद्धतीने त्या वनस्पतीचे खोड, छोटी काडी, पान, फूल, मूळ ह्यापैकी जे साधेल ते सदैव जवळ ठेवावे. त्याची रोज पूजा करावी. हे करणे त्या त्या राशींच्या लोकांना हितावह आहे. म्हणून ती ग्रहण करणे, वापरणे वा जवळ ठेवणे हे अपेक्षित आहे. वनस्पती ह्या भूमीतच उगवलेल्या असतात. वनस्पतीचा भूतत्त्वाच्या माध्यमातून व पंचमहाभूतांच्या माध्यमातून प्रभावी परिणाम होत असतो, म्हणून शक्य तोवर भूमीतून उगवलेल्या वनस्पतीची पूजाअर्चा करावी.
१ मेष खैर ५ सिंह रुई ९ धनू औदुंबर
२ वृषभ पिंपळ ६ कन्या अघाडा १० मकर शमी
३ मिथुन आघाडा ७ तूळ पिंपळ ११ कुंभ शमी
४ कर्क पळस ८ वृश्चिक खैर १२ मीन औदुंबर
आता आपण प्रत्येक प्रकारच्या राशीचे गुणविशेष आणि त्या राशीमध्ये मोडणार्या लोकांनी उपासना कशी करावी, हे पाहू.
पंचमहाभूते आदींचा परस्परसंबंध दर्शविणारा तक्ता :
आकाशतत्त्वाचा विचार स्वतंत्रपणे केला आहे.
पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू
युगाचे महत्त्व सत्य द्वापार त्रेता कली
चार वर्ण वैश्य ब्राह्मण क्षत्रिय शद्रू
* रास वृषभ मीन मेष कुंभ
राशिस्वामी शुक्र गुरू मंगळ शनी
* रास मकर वृश्चिक सिंह तळू
राशिस्वामी शनी मंगळ रवी शुक्र
* रास कन्या कर्क धनू मिथुन राशिस्वामी बुध चद्रं गुरू बुध
* नाडीप्राबल्य चंद्रनाडी चंद्रनाडी सूर्यनाडी सूर्यनाडी निजतत्त्व सत्य विवेक शील समता
प्रभावीदैवत देवी विष्णू गणपती दत्त,राम-शिव मारुती
प्रभावी दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर
देवतेची उपासनारा. १०.३० सं. ५.३० दु. १ स. ७.३०
(वेळा) ते रा.२ रा.१०.३० ते सं. ५ दु. १२.५०
ब्रह्मांडामधील पंचमहाभूते मानवी शरीरात कुठे असतात?
शरीराचा भाग पंचतत्त्वे दैवत कोणते
१ पायापासून गुडघ्यापर्यंत भूमितत्त्व चतुर्भुज ब्रह्मा
२ गुडघ्यापासून नाभीपर्यंत जलतत्त्व पीतांबरधारी नारायण
३ नाभीपासून हृदयापर्यंत अग्नितत्त्व त्रिलोचन महारुद्र
४ हृदयापासून भ्रुकुटीपर्यन्त वायुतत्त्व सर्वशक्तिमान ईश्वर
५ भ्रुकुटीपासून शेंडीपर्यंत आकाशतत्त्व गौरवर्ण महादेव
आमच्या अनुभवावरून ज्योतिषशास्त्रातील ग्रह, नक्षत्र, रास व जन्मपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेऊन सामान्यपणे लोकांनी कशा प्रकारे उपासना केली तर त्याला दैनंदिन जीवनात समाधान व आनंद मिळू शकेल, हे ठोकळमानाने येथे सांगत आहे. जीवनातील अडसर ह्याने पूर्णपणे दूर होतील ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. लवकर परिणाम व्हावयास हवे, ही आपली अपेक्षा, शिस्तबद्ध नियमित उपासनेचा अभाव व गुरुमार्गदर्शनाचा अभाव ह्यामुळे हा उपाय नैराश्य निर्माण करू शकतो. तथापि राशीप्रमाणे कोणी कोणती उपासना करावी, हे आता पाहू.
राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना
सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे. म्हणजे भूमितत्त्वात वृषभ, मकर व कन्या ह्या राशी, जलतत्त्वात मीन, वृश्चिक व
कर्क ह्या राशी, अग्नितत्त्वात मेष, सिंह व धनू ह्या राशी व वायुतत्त्वात मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश होतो, असे आपण ह्यापूर्वीच पाहिले आहे.आता ह्या प्रत्येक महातत्त्वामध्ये मोडणार्या राशींच्या लोकांनी काय व कशी उपासना करावी, हे आपण पाहू. म्हणजे वृषभ, मकर व कन्या; मीन, वृश्चिक व कर्क; मेष, सिंह व धनू व मिथुन, तूळ व कुंभ अशा चार प्रकारांचे गट पद्धतीने विवेचन करू.
This portion is not available in this Free E-Book. Please contact Nath Shakti Peeth for details.
**************************************************
जीवनातील दु:ख, व्याधी, असफलता, असमाधान आदींचा जो सतत अनुभव येतो, त्याचा नाश कसा करता येईल, काय केल्याने असा त्रास दूर होईल, हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे.
**************************************************