दुसर्या अध्यायात बद्रिकावनात मच्छिंद्रनाथांना स्वतःदत्तात्रेयांनी अनुग्रह दिला व त्याला नाथपंथाची स्थापना करण्यास सांगितले.नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थ यात्रा करीत दक्षिणे कडे निघाले. तीर्थयात्रा करीत ते सप्तश्रृंगी येथे आले.तेथे जगदंबेची प्रार्थना करून तिच्या समोर सातदिवसाचे अनुष्ठान केले. जगदंबेने त्याला मार्तंड पर्वतावर नेले व तेथे त्याच्या कडून अनुष्ठान करून घेतले. पुढे सरस्वती नामक स्त्रीला अपत्य नव्हते म्हणून सूर्यशक्ती विभूतीवर मंत्रून मुलगा होण्यासाठी तिला दिली.
पुढे एक दिवस भगवान दत्तात्रेय स्वतः तेथे आले. मच्छिंद्रनाथांना,त्यांनी स्वतःची ओळख अनुसयेचा पुत्र म्हणून करून दिली. अनुसया ही अशी पतिव्रता होती की जिची सत्ता ब्रंह्माडावर चालायची.सूर्य देखील तिच्या आज्ञे शिवाय उगवत नव्हता असे वर्णन आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिची सत्त्व परिक्षा पाहण्यासाठी गेले होते. दत्तात्रेय म्हणजे, ब्रह्मा, विष्णु व महेश मिळून झालेला अनुसयेचा अवतारी पुत्र भगवान दत्तात्रेय आहे.कवी नारायणाचा आत्मा असणार्या मच्छिंद्रनाथांनी भगवान दत्तात्रेयांना तात्काळ ओळखले. आपण मला कसे विसरलांत असे म्हणत मला आपण अनुग्रहीत करा व आपल्या चरणाजवळ सदैव ठेवा असे म्हणु लागले. भगवान दत्तात्रेयांनी देखील त्याला ओळख देवून स्वतः जवळ घेतले. त्याच्या कानात मंत्रोपदेश देवून त्याला आपला अनुग्रहीत केले आणि पंचतत्त्वाचा देह धारण केल्यामुळे, प्राप्त झालेले झालेले अज्ञान नष्ट करून त्याला सर्व जग ब्रह्ममय दिसू लागले. नंतर स्वतः दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना भगवान शंकराकडे नेले व त्यांची भेट करवून दिली.
शिवें पाहूनि मंददेहीं ॥ म्हणे हा पूर्वी नारायण कवी ॥ मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाहीं ॥ धरिला हृदयीं तत्काळ ॥44॥ मग त्रिवर्ग येऊनि त्या स्थानीं ॥ दत्तासी म्हणे पंचमूर्धनी ॥ या शिष्यातें अभ्यासोनी ॥ सकळ सिद्धी मिरवीं कां ॥45॥ वेदकारणाचें निजसार ॥ जें सर्वोपकाराचें गुहागर ॥ सकळ सिद्धींचे अर्थमाहेर ॥ निवेदीं तूं महाराजा ॥46॥
म्हणजे पूर्व जन्मीचा कवी नारायण, तो कसा होता याचे पूर्ण वर्णन सुरवातीला केले आहेच. ब्रह्माण्ड आणि आपण एकच आहेत या अनुभूतीने कवीनारायण सदैव राहत होता. त्याने मनुष्य जन्म घेताच त्याला पूर्व संस्काराची, पूर्व जन्माची, ज्ञानाची, पूर्ण विस्मृती झाली, असे येथे स्पष्ट होते, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु, भगवान शंकराने दर्शन देताच,तो कवीनारायण असतांना ज्या अनुभूतिंनी राहायचा त्याच अनुभूतींनी राहु लागला. परंतु असे असतांना देखील, कलियुगांत कार्य करावयाचे असल्यामुळे, शंकराने दत्तात्रेयांना त्याच्या कडून वेद आणि सकळ सिध्दींचा अभ्यास करवून घ्यावयास सांगितला व त्यात त्याला पारंगत करण्यास सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी, स्वतः मच्छिंद्रनाथांना कान फाट्याचा नाथसंप्रदाय निर्माण करण्याची आज्ञा केली. त्याला शिंगी, शैली, कंथा, झोळी इत्यादी भूषणे ग्रहण करण्यास सांगितले. भगवान दत्तात्रेय हे नाथपंथाचे आराध्य दैवत आहे.
पुढे देव-देवतांच्या सहाय्याने मच्छिंद्रनाथांनी बर्याच विद्या, कवच, सिध्दी, शाबरी कवित्त्व, मंत्रविद्या आदि प्राप्त केले. अनेक दैवतांना प्रसन्न करून त्यांच्याकडून पंथ कार्यासाठी अभयदान व अनेक प्रकारचे वर प्राप्त करून घेतले. पृथ्वीवर कार्य करतांना कोणत्याच गोष्टीची अडचण जाणवणार नाही, वेळ प्रसंगी ब्रह्मांडाच्या तत्त्वांमध्ये परिवर्तन करता येईल, येवढी नाथपंथाच्या, कार्याची व्यवस्था त्यांनी केली.
मच्छिंद्रनाथांनी, सप्तश्रृंगीला अंबामाते जवळ सात दिवस अनुष्ठान केले होते, त्यावर अंबादेवी प्रसन्न झाल्यावर तिने शाबरी विद्येवर काव्य करण्याच्या हेतूने दक्षिण वाहिनी नदीवर असलेल्या १०० कुंडांवर जावून वरदान मिळविण्यास सांगितले. त्यावेळी कुंडातील पाणी काचेच्या कुपीत घेवून १२ आदित्याचे स्मरण करून एशत्थवृक्षाला घालण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने केले होते. येथे साबरी काव्याचा जो संदर्भ आहे, हे शाबरी काव्य आज कोठेच उपलब्ध नाही. जे काही आपल्या वाचण्यात येते हे मूळ शाबरीकाव्य नसून ते उपलब्ध होऊ शकत नाही. जे कांहि मंत्र आपण नाथपंथाचे म्हणून पाहतो, जे शाबरी मंत्र आपण समजतो ते सहजा सहजी कामात येण्यसारखे नाहीत.बोलेल तो मंत्र करू ते प्रमाण ही विशेषता नाथांची होती. म्हणून अन्य कोणी तसे होण्याइतके सोपे ते नाही.
एशत्थवृक्षाच्या सेवेने अनेक अघटित अनुभव येवू शकतात.अनेक प्रकारचे ग्रहदोष,संकट आदी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अश्वत्थाची उपासना केल्याने जावू शकतात.एशत्थावर सर्व प्रकारच्या शक्ती या सदैव विद्यमान असतात. एशत्थ उपासना खूपच लाभदायी ठरू शकते.परंतु ती योग्य पद्धतीने गुरू मार्गदर्शनाखाली व्हावयास हवी.
अश्वत्थ महात्म्य
गुप्त नाथांच्या परंपरेतील थोर विभूतींनी चित्रकूट येथून पंथ कार्य केले होत. चित्रकूट येथे माधवनाथांनी कार्याला आरंभ केल्यानंतर तेथील स्थानमहात्म्य व पंथ महात्म्य हे देवगांवरंगारी जिल्हा औरंगाबाद येथे आणले. त्यानंतर चित्रकूट स्थानाची परंपरा बंद झाली व ते सर्व स्थान महात्म्य व पंथाचे परंपरागत कार्य व महात्म्य देवगांव येथे आणले व तेथुन ते पुढे चालू राहील. हे सर्व स्वतः माधवनाथांनी केले. माधवनाथांनंतर व्यंकटनाथांनी देवगांव येथून तेच कार्य पुढे माधवनाथांच्या आज्ञेवरून सुरू ठेवले. त्यांच्या समाधी नंतर पुढील कार्य त्यांच्याच कृपा आशिर्वादाने ह्या नाथ शक्तीपीठातून होत आहे. नाथंाची अशी ही अखंड परंपरा आज देखील सुरूच आहे. पंथाच्या सिध्दतेची अनुभूती या नाथशक्तीपीठातून अनेक जण आज देखील घेत आहेत. या सर्व गोष्टीमुळे या नाथशक्ती पीठाला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
नाथशक्ती पिठाच्या नैऋत्य दिशेला अश्वत्थ वृक्ष (पिंपळाचे झाड) देखील कृपा प्रसादाने आले आहे. पुराणांमधून तर अश्वत्थ वृक्षाला कल्पवृक्षच मानलं आहे. ह्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन पुराणां मधून विशेष प्रकारे केले आहे.
बह्मांड पुराणांत अश्वत्थाचे महात्म्य विस्ताराने सांगितले आहे. स्वत; ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनीला सांगीतले आहे. नारदमुनींनी अश्वत्थाचे वर्णन करतांना सांगितले की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः बह्मदेवाचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रूद्ररूपी महादेवाचा वासअसतो. वृक्षाच्या दक्षिणे कडील पाना फांद्यावर शूलपाणी पश्चीमे कडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णू तर उत्तरे कडील पाना फांद्यावर ब्रम्हदेवाचे अधिष्ठान असते. इंद्र देवाचे अधिष्टान पूर्वे कडील शाखा पानांवर असते. अशा तर्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रम्हा विष्णू महेश व इंद्रदेवाचे अधिष्टान रात्रंदिवस अखंडपणे असते.अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवतांनी व्यापून टकला आहे. गोब्राह्मण व समस्त ऋषि गण तथा वेदादी यज्ञ यागाच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर व अखंडपणे वास करून असतात.तसेच सर्व नद्यांची तीर्थे आणि सातही समुद्रांच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वे कडील शाखेवर निरंतर वास करीत असतात.अ-कार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो, स्कंध शाखा येथे ऊ कार स्वरूप तर फळ व पुष्पे येथे म-कार वर्ण असतो. असा ‘अ’ ‘ऊ’ ‘म’ म्हणजे ॐकार स्वरूपाचे वास्तव्य येथे अखण्ड असते. आग्नेय दिशेला अश्वत्थ वृक्षाचे मुख असते. आग्नेय दिशेस एकादश रुद्रादीक असून अष्टवसू तेथे वास करतात. तेथच त्रैमूर्ती व इतर समस्त देवांचे देखील वास्तव्य असते. ह्या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीं मुळे हा वृक्ष अश्वत्थनारामण झाला असून त्याच्या महतीचे वर्णन करणे शक्य नाही आणि ह्याच कारणांमुळे ह्याला कल्पवृक्ष म्हणून संबोधिले जाते.
या कल्पवृक्षाची सेवा पूजाअर्चा करून आपले जीवन कसे सुखकर करावे; त्याचे व्रत कसे असते हे सांगतांना ब्रम्हदेव म्हणाले की हे व्रत आषाढ पौष चैत्र महिन्यात किंवा गुरु शुक्र ग्रहांचा अस्त असतांना तसेच चंद्रबळ नसतांना या व्रताची सुरवात करु नये. याव्यतिरिक्त इतर कोणत्याहि महिन्यात चांगला दिवस पाहून शुचिर्भूत होवून व उपवास करून प्रारंभ करावा. रविवारी किंवा मंगळवारी अश्वत्थाला आतळू नये किंवा स्पर्शू नये त्याच प्रमाणे भ्रुगुवारी म्हणजे शुक्रवारी किंवा संक्रांतिच्या दिवशी ह्या वृक्षाला स्पर्श करू नये. संधी रात्री किंवा रिक्ता तिथीला तसेच पर्वणीच्या वेळी व्यतिपाताच्या वेळी किंवा दुर्दीनादी वैधृतीला अपराण्ह समयी अश्वत्थ वृक्षाला स्पर्शूं नये .
प्रदक्षिणा मारतांना आनंदी मनाने व वाचेन पुरुष सूक्त म्हणत शुध्द कर्माने व भक्ती पूर्वक अंत;करणानी असावे. पुरुष सूक्त म्हणणे शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नाम म्हणत आनंदी मनाने प्रदक्षिणा माराव्यात हे ही जमत नसेल तर मौन धरून साध्या प्रदक्षीणा माराव्यात. अशा प्रकारे प्रदक्षीणा मारल्या तर त्याचे फळ खूप मोठे मिळते. प्रदक्षीणा मारतांना कंबरेवर पाण्याने भरलेली घागर घेतलेली गर्भाशी स्त्री जशी चालते त्या प्रमाणे अगदी मंद गतीनी शुध्द भावाने प्रदक्षिणा माराव्यात, असे केल्याने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते. प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसेच प्रदक्षीणेच्या मध्यभागी नमस्कार करावा. दोन लाख प्रदक्षिणा मारल्या तर ब्रह्महत्यादी सारखे घोर पापे देखील नष्ट होतात.
वर सांगितल्या प्रमाणे ज्या ठिकाणी त्रिमूर्ती वास करतात त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारल्या असतां सर्व पापे धुतली जातात. गुरुसंबंधी वा गुरूसेवेत घडलेले पाप नष्ट होते. नाना व्याधींचे हरण होवून प्रदक्षिणा फलद्रुप होतात.अशा प्रदक्षीणा मारण्याने फार मोठया रूपयांचे ऋण देखील फिटते. जन्म मृत्यूचे भय जावून संसारातील भयाचा नाश होतो. १००० प्रदक्षीणा जर केल्या तर ग्रह दोषांतून मुक्तता होते. मनाने, कायेने व वाचेने अशी एक चित्ताने सेवा करिता आपली पुत्र कामना पूर्ण होते असे ब्रह्मवाक्य आहे.
शनिवारी वृक्षाला धरून जर मृत्यूंजयाच्या मंत्राचा विधीवत जप केला तर काळ मृत्यु ह्याच्यावर विजय मिळू शकतो. त्याला अपमृत्यूचे भय रहात नाही व तो पूर्णायुषी होतो. केवळ प्रदक्षीणेने शनिग्रहाची पीडा देखील सौम्य होते. योग्य रितीने अश्वत्थाची उपासना केली तर शनी पीडा दूर करण्यासाठी इतर काही करावयाची गरज रहात नाही.
अमावस्या व गुरुवारी अश्वत्थवृक्षा खाली छायेत पाणी ठेवून स्नान केले तर ब्रह्महत्येच देखील पाप नष्ट होत एवढा प्रभाव या वृक्षाचा आहे. अश्वत्थाच्या तळाशी ब्राह्मणांना एकदा जरी भोजन दिले तरी फार मोठे पुण्य पदरी मिळते असे बह्महदेवाने नारदास सांगितले.
अश्वत्थाच्या मुळाशी बसून मंत्राचा जप केला असता अनंत पटीने त्या मंत्रजपाचे फळ मिळते. त्याच प्रमाणे वेदाचे जर पठण केले तर अनेक गुणांनी वेद पठण केल्याचे पुण्य मिळते. जर भक्ती युक्त अंत;करणांनी अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपुल्या बेचाळीस पितरांचा उध्दार होईल, असा महिमा ब्रह्मदेवाने नारदाला सांगितला. त्याच प्रमाणे हे वृक्ष कापले तर महापाप लागेल असे सांगितले.
अश्वत्थ तळी जर यथासांग होमहवन केले तर महायज्ञ केल्याचे पुण्य मिळून आपली कामना लवकर फळते असे वर्णन ब्रह्मदेवाने नारदमुनी जवळ केले.
अश्वत्थ वृक्षांच्या महात्म्याचे वरील वर्णन हे ब्रह्मपुराणातले आहे. हे अती पुरातन काळचे आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. या शक्तीपीठांत देखील अश्वत्थवृक्षाच्या महतीची अनुभुती अनेकांनी घेतली आहे. या पुरातन काळातील अश्वत्थ वृक्षाच्या महात्म्याचे वर्णन हा केवळ इतिहास नसून आजही येथे यथासांग कर्म केले तर त्याची अनुभुती आपण घेऊ शकता. नाथ शक्ती पिठातील या नैसर्गिक वृक्षाबरोबर येथील अधिष्ठीत देवतांची कृपा शक्ती कार्य करीत आहे. उपासना, पूजाअर्चा, हवन, दानादी कर्म करुन आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातील व्यथा, अडचणी जीवनात भेडसावणारे प्रश्न इत्यादींचे निराकरण करून मन;शांतीचा अनुभव घेवू शकता.
औदुंबर महात्म्य
नाथ पंथांच्या परंपरेतील थोर विभूतींनी चित्रकूट येथून पंथ कार्य केल होत. चित्रकूट येथे माधवनाथांनी कार्याला आरंभ केला आणि नंतर तेथील स्थानमहात्म्य व पंथ महात्म्य हे देवगांवरंगारी जिल्हा औरंगाबाद येथे आणले. त्यानंतर चित्रकूटच्या स्थानाची परंपरा बंद झाली. ते सर्व कार्य व महात्म्य देवगांवरंगारी येथून सुरू केले. माधवनाथां नंतर व्यंकटनाथांनी कार्य केले. त्यांच्या समाधी नंतर पुढील कार्य त्यांच्याच कृपा आशिर्वादाने ह्या नाथ शक्तिपीठातून होत आहे. या संबंधीचा इतिहास या पूर्वी वाचकां समोर सादर केला आहे.पंथाची अशी ही अखंड परंपरा अजून कार्यरत आहे. पंथाच्या सिध्दतेची अनुभूती या नाथ शक्तिपीठातून अनेक जण घेत आहेत. या सर्व गोष्टीमुळे या नाथ शक्तीपीठाला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
या शक्तिपीठाच्या गाभार्याच्या मागे भगवान दत्तात्रेयाच्या अत्यंत प्रितीचे औदुंबर वृक्ष स्वयंभू पणे प्रस्थापीत झाले आहे. भगवान श्री दत्तात्रेयांच्या गुरुचरित्रात औदुंबराचे महत्व विशेष प्रकाराने सांगितले आहे गुरूचरित्रांत वर्णन केलेल्या कथानका प्रमाणे असे सांगीतले आहे की हिरण्यकश्यपु हा एक थोर भक्त होता त्याचा मुलगा हा विष्णुचा महान भक्त होता. आपला मुलगा प्रल्हाद हा एक थोर विष्णु भक्त आहे हे हिरण्यकश्यपाला सहन होत नव्हते. त्याचा द्वेष एवढा वाढत गेला की रागाच्या भरांत त्याने प्रल्हादाचा छळ करायला सुरवात केली आणि सरते शेवटी प्रल्हादाला मारून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले.
आपल्या भक्ताचे संरक्षण करण्यासाठी विष्णुने नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वराचा भंग न होवू देता आपल्या पंजाच्या नखांनी त्याचे पोट फाडून जीव घेतला. या गोष्टीं मुळे नृसिंहाच्या नखांची अतीव आग होवू लागली. नृसिंहाचे हे दु;ख दूर करण्यासाठी आणि हाताच्या नखांची शांती करण्यासाठी महालक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणली व नृसिंहाची नखे या औदुंबराच्या फळांत खुपसून ठेवण्यास सांगितली. त्यामुळे अती उग्र, क्रोधायमान झालेला नृसिंहदेव शांत झाला. त्यानंतर नृसिंह देवाने महालक्ष्मी व औदुंबरास वर दिला व म्हणाले की तू सदैव फुलत राहशील.आणि कल्प वृक्ष म्हणूनच प्रत्येक ठिकाणी राहतील. जे जे लोक भक्तिभावनेने औदुंबराची पुजा करतील त्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येईल. त्यांच्या पापांच क्षालन होईल.पूर्ण भक्ति भावनेने औदुंबराची आराधना केली तर ज्यांना पुत्र प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांची देखील कामना पूर्ण होईल असा ह्या औदंबराचा महिमा आहे.ज्यांना भू संपत्ती आदींची अपेक्षा आहे ती देखील पूर्ण होवू शकते असा हा कल्पवृक्ष आहे.
औदुंबराच्या छायेत बसून जपानुष्टान केले. तर अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होवून जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागिरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. या कलियुगा मध्ये हा कल्प वृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल असा हा कल्पवृक्ष आहे. धन, धान्य, भू संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होते. सोम सूर्य ग्रहणाला अथवा संक्रांती च्या महिन्यात भक्तीयुक्त अंत:करणानी स्नान केले असता अश्वमेधाचे अनंत पुण्य मिळते. सोमवारी, अमावास्येला, व्यतीपातादी पर्वणीला असे स्नान केले असता सुरनदीतीरीं ब्राह्मणांला सोन्याने मढवलेल्या १००० कपीला गाईचे दान दिले असता जे पुण्य मिळते ते पुण्य मिळेल असा या औदुंबराचा महिमा आहे.
अशाच भक्ती भावाने औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षातळीं निर्मळ मनाने जप करिता अनंत गुणांनी त्याची फळें मिळतात. तसेच औदुंबर वृक्षातळीं निर्मळ मनाने हवन केले असता अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळीं निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशनी रूद्र केला असता अतिरूद्र केल्याचे फळ मिळते. मंदगतीने प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठे पुण्य पदरी पडते असा याचा महिमा आहे. एक लक्ष प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगा सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. सर्व दिशेकडून संरक्षण देणार्या नृसिंहांची उपासना औदुंबरा खाली करतात. त्यांचा वास सदैव औदुंबरी असतो.
वरील प्रमाणे औदुंबर वृक्षांचे महात्म्य वर्णन केले आहे. हे पुराणातले आहे, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. या शक्तिपीठांत देखील औदुंबर व अश्वत्थवृक्षाच्या महतीची अनुभुती अनेकांनी घेतली आहे. या पुरातन काळातील औदुंबर वृक्षाच्या महात्म्याचे वर्णन हा केवळ इतिहास नसून आजही येथे यथासांग कर्म केले तर त्याची अनुभुती आपण घेऊ शकता. नाथ शक्ती पिठातील या नैसर्गिक वृक्षाबरोबर येथील अधिष्ठीत देवतांची कृपा शक्ती कार्य करीत आहे. उपासना, पूजा अर्चा, हवन, दानादी कर्म करुन आपण आपल्या व्यक्तिगत जीवनातील व्यथा, अडचणी जीवनात भेडसावणारे प्रश्न इत्यादींचे निराकरण करून मनःशांतीचा अनुभव घेवू शकता.
नाथ शक्ती पिठातील ह्या औदुंबराच्या छायेत गुरुचरित्राचे पारायण करुन तसेच एशत्थाखाली मंत्र आदी उपासना करुन, प्रदक्षिणा घालून व आमच्या मार्गदर्शनाखाली साधना करुन आपले इप्सीत व मनःशांतीचा अनुभव बर्याच लोकांनी घेतला आहे.आज नाथशक्तिपीठातून जे कार्य होते ते भारताच्या कोणत्याही भागातून होत नाही, असे येथे येवून जाणारे जाणकार सांगतात. शक्तिपीठाच्या या कार्याला गुरूंच्या आशिर्वादा बरोबर सामर्थ्य संपन्न साधु संतांचेही आशीर्वाद मिळाले आहेत. वेद मंत्राच्या माध्यमातून भाग्याचे पुनरूज्जीवन ही पुस्तिका नाथशक्तिपीठाने प्रकाशीत केली आहे. या शक्तिपीठाच्या माध्यमातून आपल्या भाग्याचे पुनरूज्जीवन झाल्याची अनुभूती बर्याच लोकांनी घेतली आहे. ही संस्था गेल्या १८ वर्षा पासून कार्यरत आहे. गुरू कृपेच्या अखंड परंपरेच्या छत्रा खाली आपले जीवन सत्शील, सत्प्रवृत्त व सद्भक्त करून रामदास स्वामींनी म्हटल्या प्रमाणे -तरीच परमार्थ घडे | मुख्य परमात्मा आतुडे | अनुभवेसी | याची अनुभूती आजच्या काळात देखील घेतल्याची उदाहरणे आहेत.
अश्वत्थ वृक्षा खाली साधना केल्या नंतर मच्छिंद्रनाथ, पुढे तीर्थाटनाला निघाले. बंगालमधील चंद्रगिरी गावातून जात असता एक ब्राह्मण स्त्री, त्यांच्या दर्शनासाठी आली. तिला सर्व प्रकारच सुख होत. परंतु अपत्य सुख नव्हत. तिची जीवन कहाणी ऐकून मच्छिंद्रनाथांना करूणा आली. तिच दुःख दूर करण्याच्या हेतूने तिला मदत करण्याचे ठरविले.
ऐसी वदतां वाग्भगवती ॥ प्रेमा उदेला नाथचित्तीं ॥ मग आदित्यनामें मंत्रविभूती ॥ महाशक्ती निर्मीतसे ॥142॥ भस्मचिमुटी ॥ तेथें वीर्य करी राहाटी ॥ मग तें भस्म तपोजेठी ॥ तिये हातीं वोपीतसे ॥43॥ माय वो शुभाननी ॥ हे भस्मचिमुटी करीं कवळुनी॥ घेईं सेवीं आपुले शयनीं ॥ निशीमाजी जननीये॥44॥ भस्म नोहे पूर्ण गभस्ती॥ हरिनारायणउदयो कीर्ति ॥ प्रभा मिरवोनि त्रिजगतीं ॥ मोक्षमांदुसा मिरवेल ॥45॥ तूं सहसा हळवटपणीं ॥ कामना न वरीं भस्मासनीं ॥ म्यांही पुढील भविष्य जाणोनी ॥ चिद्भवानी वदविली ॥46॥ भस्माची प्रतापस्थित ॥ तव उदरीं होईल तो सुत ॥ तयातें अनुग्रह देऊनि स्वतः॥ करीन सरस ब्रह्मांडीं ॥47॥ तो सुत न म्हणे माय ॥ सकळ सिद्धींचा होईल राय ॥ जैसा खगीं नक्षत्रमय ॥ शशिनाथ मिरवेल ॥48॥ तो न माय ब्रह्मांडभरी ॥ कीर्तिरश्मीचे तेजविवरीं ॥ आणि वंद्य होईल चराचरीं ॥ मानवदानवदेवदिकां ॥49॥ तरी माये संशयो न धरितां ॥ भक्षीं भस्म सांडोनि चिंता ॥ ऐसी सांगोनि सकळ वार्ता ॥ऩाथ उठे तेथूनी॥150॥
त्यांनी सिध्द सूर्यमंत्रांनी, वीर्ययुक्त विभूति मंत्रून तिला दिली व साक्षात हरीनारायण तुझ्या उदरी जन्माला येईल असे सांगितले. तू ही विभूति रात्री झोपण्यापूर्वी खाऊन घे असे सांगितले. पुढे जन्माला येणारा मुलगा हा सिध्द पुरूष असेल त्याला १२ वर्षानी मी घेवून जाईन असे सांगितले.पूर्वीच सागितल्या प्रमाणे नवनारायणांना कोण केंव्हा व कसे जन्म घेवून प्रगट होणार हे माहीत होते.गोरक्ष म्हणून हरीनारायण येणार हे कवी नारायणाला माहीत होते. म्हणूनच ते म्हणाले साक्षांत हरीनारायण तुझ्या उदरी जन्म घेईल.असे म्हणून तो निघून गेला.
सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फारच आनंद झाला. तिने ते भस्म आपल्या पदरात बांधून ठेवले. मग ती त्याच आनंदात शेजारणीकडे बसायला गेली. तेथे दुसर्याही कांही बायका गप्पा मारायला जमल्या होत्या. तेव्हा तिने आनंदाने नुकतीच घडलेली ही सर्व हकीकत सांगितली. नंतर सरस्वती म्हणाली, ‘त्या गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय?’ तिचा हा भोळा प्रश्न ऐकून सगळया बायकांनी तिला वेड्यातच काढले. एक बाई म्हणाली, ‘अगं, भस्म खाल्याने पोरे होतात कां? तू कशी वेडी आहेस. हे गोसावी लोक जादूटोणा करीत असतात.
हा सर्व प्रकार जो पोथी मधून वर्णन केला आहे तो त्या काळातल्या स्त्री स्वभावाचे देखील दर्शन घडवितो. आपल्या संभ्रमामुळे, लोकांच्या बोलण्यामुळे, आत्मविेशासाच्या कमतरतेमुळे सरस्वती कमी पडली.त्यावेळेच्या काळातल्या व आजचा काळातल्या स्त्री स्वभावात विशेष फरक लक्षांत येत नाही. कलीयुगाची सुरवात झालेली होती. त्यामुळे सामान्य स्थरावर ही संभ्रमावस्ता झालेली दिसते.
पुढे तिने ती विभूती साशंकते मुळे घेतली नाही आणि एका उकिरड्याच्या खड्डयात टाकून दिली. बारा वर्षानंतर ज्या वेळी ते पुन्हा आले त्यावेळी तिला मुलगा झालाच नाही असे तिने सांगितले. परंतु सर्व प्रकार लक्षांत आल्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या उकिरड्याच्या खाचेतून १२ वर्षाचा तेजःपुंज मुलगा बाहेर काढला; हाच गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला. या प्रसंगाचे रसभरीत वर्णन पोथीतून केलेले आहे त्यामुळे आवश्यक तेवढाच भाग येथे नमूद केला आहे. अशा प्रकारे गोरक्षनाथांचा जन्म झाला.
मच्छिंद्रनाथांनी अशा प्रकारे सूर्यतेजाच्या वीर्याचा उपयोग सूर्यमंत्रांच्या माध्यमातून विभूतीवर केला व हरीनारायणाने, गोरक्षनाथ म्हणून जन्म घेतला. केवढा अघटीत प्रसंग आणि पंथसामर्थ्य. अयोनी संबंधातून उत्पत्तीस आलेला हडामासाचा माणूस एका जीवाने, माणूस म्हणून या जगात, या पृथ्वीवर, अवतारी कार्य केले कोणत्याही स्त्री पुरूषाचा संबंध न येता केवळ विभूतीच्या माध्यमातून जन्माला आलेला जीव म्हणजे साक्षात गोरक्षनाथ होय. विभूतीचे केवढे हे सामर्थ्य?
विभूतीच्या माध्यमातून मुलगा झाला
सन २००४ची गोष्ट आहे. अहमदनगर भागातील देशमुख कुटुंब आपली नित्य कालक्रमणा करीत होते. प्रपंच चांगला सुरू होता परंतु आपत्य सुख नव्हत. सर्व प्रकारच्या डॉक्टरी तपासण्या झाल्या होत्या अपत्य होणारच नाही असे डॉक्टरांनी सांगितल्या मुळे जीवनांत खिन्नता होती. सर्व प्रयत्न करून झाले होते कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता. अशीच कालक्रमणा सुरू असता श्री समर्थ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांचे शिष्य नरेन्द्रनाथ महाराज प्रवासातून येत असता श्री व सौ देशमुख अहमदनगरला दर्शनासाठी आले. त्यांनी आपली व्यथा महाराजांना सांगितली. महाराजांना त्यांची कहाणी ऐकून दया आली म्हणून त्यांनी विभूती अभिमंत्रित करून नारळ दिला व तो दोघांना खाण्यास सांगितले. त्यानंतर गर्भधारणा होवून सन २००५ मध्ये त्यांना मुलगा झाला.
आजची राहणी, कार्य पध्दती व वावरणे, यात पूर्वीच्या मानाने पंथ कार्यकर्त्यां मध्ये फरक दिसतो परंतु पंथकार्य आजही त्याच प्रखरतेने व तत्त्वांनी सुरू आहे