पाचव्या अध्यायात बारामल्हार नावाच्या अरण्यात वेताळाशी युद्ध केले. जपाबरहुकूम कार्य सिद्धी करण्याचे आश्वासन वेताळांकडून घेतले.
हिंगुळादेवीचे दर्शन करून निघाल्यावर मच्छिंद्रनाथ बारामल्हार नावाच्या अरण्यात आला रात्र झाली म्हणून एका देवळात रात्री मुक्काम केला. रात्री मच्छिंद्रनाथाच्या लक्षांत आले की, बरीच भूते तेथे आलेली आहेत. भूते काय करतात हे आधी पहावे म्हणून तो स्वस्थ राहून सर्व कांहि पाहत होता. संपूर्ण भूतावळीच्या शक्तिचा उपयोग पंथकार्यासाठी करावा म्हणून मच्छिंद्रनाथाने निरनिराळ्या अस्त्रांचा प्रयोग करून सर्व प्रकारच्या भुतांशी खेळचालू केला. हळू हळू सर्वच्या सर्व भूते जमा करून त्याचे प्रधान, वेताळ ह्याला बांधून जेरीस आणले. सरते शेवटी वेताळ व सर्व भूते मच्छिंद्रनाथांना शरण गेली व त्यांचेकडून मच्छिंद्रनाथाने पंथ कार्यास मंत्रा बरहुकूम सहाय्य करण्यास सांगितले. तसेच जो कोणी नाथपंथी त्याच्या कार्यासाठी मदत करायला सांगेल त्याला मंत्र म्हणताच सहाय्यभूत होण्याची आज्ञा केली व ती त्या सर्वांनी त्वरीत मान्य केली.
यावरी बोले मच्छिंद्रनाथ | साबरीविद्या मम कवित्व | त्यातें साह्य भूतांसहित | कार्यार्थीं तुम्हीं असावें ॥21॥ जो जो मंत्र जया प्रकरणीं | तरी त्या अर्थीं तुम्हीं वर्तोनि | साह्य करावें मंत्रालागुनी | कोणींतरी घोकिलिया ॥22॥ मग अष्टही म्हणती अवश्य | कार्य करूं निःसंशयास | मग साधनप्रयोग आपुला भक्ष | पृथक् पृथक् सांगीतला ॥23॥ अष्टकोटी भूतावळीसहित | भक्षसाधन सांगितलें समस्त | येणें पंथे कार्य जगांत | निश्चयें आम्ही मिरवूं कीं ॥24॥
अकोल्याच्या नाथशक्तिपीठाचे नरेंद्रनाथमहाराज, बर्याच शिष्यांसमवेत पंथकार्या निमित्ताने यवतमाळ येथे गेले होते. तेथे कार्यक्रम सुरू असतांनाच नरेंद्रनाथमहाराजांच्या सेवेत असणार्या एका शिष्येला अचानकच बाधेचा विचित्र त्रास होवू लागला. बरोबर असलेल्या कांही शिष्यांना रात्री भूतांनी ओढतओढत दूर नेले. लगेचच नरेंद्रनाथमहाराजांनी मंत्रांची योजना करून विभूती प्रयोग केला. ताबडतोब भूते शांत झाली परंतु त्यांनी एका शिष्येला खूपच त्रास दिला होता. तीची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर ते म्हणाले की हिला काहीतरी भयंकर झालेले आहे. वैद्यकीय उपचार करून तिला बरे व्हायला किमान सहामहीने तरी लागतील. परंतु एवढे करून पूर्ववत बरे होण्याची खात्री वाटत नाही. आमच्या औषधांचा परिणाम लवकर होईल असे वाटत नाही. त्यावर महाराज म्हणाले त्याची व्यवस्था आम्ही करतो ती लवकरच बरी होईल. महाराजांनी उपचार करतांच ती खरोखराच ७ दिवसांत पूर्ण बरी झाली, अगदी पूर्ववत झाली. पंथाला दिलेली वचने आज देखील, भुते पाळीत आहेत.
नरेंद्रनाथांच्या शिष्याने भूत पाहिले
सुधीर नावाच्या एका शिष्याला एका वाळलेल्या झाडावर रोज एक भूत दिवसा दिसायचे. आपले आक्राळ विक्रळ रूप दाखवून ते त्याला सारखेच भिती दाखवायचे. एक दिवस त्याने ही गोष्ट महाराजांना सांगितली. मला रोजच भिती वाटते काहीतरी उपाय करा असे तो म्हणाला. त्यावर महाराज त्याच्या बरोबर त्या ठिकाणी गेले व भूताकडे पाहून त्याला सांगितले की हा माझा शिष्य आहे ह्याला कोणताच त्रास देवू नको व भिति देखील दाखवू नकोस. त्या वेळेपासून त्याला ते भूत दिसले नाही व त्याचा कोणताच त्रास झाला नाही. शिवाय त्यानंतर ते वाळलेले झाड हळू हळू हिरवे झाले. समंध बाधा दूर केली भाग्यवंत नावाच्या एका भक्ताला अचानकाच समंधाचा त्रास झाला. भाग्यवंत एल आय सी मध्ये एका मोठ्या शहरात शाखाधिकारी होता. त्याने उत्तम कामगिरी केली म्हणून त्याचे खूप कौतुक करण्यात आले व त्याचा सत्कार आदी केला. रात्री झोपल्यावर जेव्हा सकाळी उठला तो त्याचा स्वतः वरचा पूर्ण ताबा गेलेला होता. काहीच समजत नव्हते. तो कोणालाच ओळखत नव्हता. मच्छिंद्रनाथाच काय तो स्वतःच्या बायको मुलांना देखील ओळखत नव्हता. वैद्यकीय तपासणीत तो संपूर्ण नॉर्मल आहे असा निर्वाळा निरनिराळ्या एक्सपर्ट डॉक्टर्सनी दिला. त्याला एकु जात नव्हते, समजत नव्हते भ्रमिष्टा सारखा करीत होता. त्याची ही अवस्था लक्षांत घेवून त्याला निवृत्त केले. कोणताही रोग नसल्यामुळे, कोणताही औषधोपचार सुरू नव्हता. अशा अवस्थेत ३ वर्षे लोटून गेली होती. नरेंद्रनाथमहाराजांनी जेंव्हा त्याच्यावर उपचार केले तेंव्हा तो ताबडतोब पूर्ववत झाला. अशा प्रकारे पंथाला दिलेली वचने भुते अजुनही निभवित आहेत.त्याचे प्रत्यक्ष परिणाम आपण आजही पाहू शकतो.