☼ ब्रह्मांडातील मानवी जीवनाची सप्तवर्गीय नियंत्रण योजना ☼
(अर्थात बिझनेस मॅनेजमेंट)
ब्रह्मांडाच्या कार्यक्षेत्राचा व कार्यपद्धतीचा जर विचार केला, ब्रह्मांडातील संपूर्ण मानवजातीचा विचार केला, तर ब्रह्मांडाची ७ कार्यक्षेत्रे सांगता येतील. ती अशी :
१. पंचमहाभूते २ चार वर्ण ३ चार युगे
४. चार निजतत्त्वे ५ चार गुण ६ बारा घरांची जन्मपत्रिका
७ जगांतील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा राशींतच.
हे सर्व विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून, त्यांचा परस्पर निकडीचा संबंध आहे. जणू एका साखळीने ते असे गुरफटलेले आहेत, की ते स्वतंत्र असून, योग्य ठिकाणी ते एकमेकांत व्यवस्थित अडकलेले आहेत. असे, की ज्यायोगे त्यांचे कार्य आपोआप, स्वयंचलितासारखे चालते. ह्यासाठी पंचमहाभूतांचा जीवाच्या जीवनप्रवाहाशी कसा संबंध असतो, हे समजून घेणे अवश्यक आहे. परंतु त्यापूर्वी ब्रह्मांडाची तत्त्वप्रणाली काय आहे हे आपण पाहू.
ब्रह्मांडाचे व्यवहार ही एक तत्त्वप्रणाली आहे :
ही सर्व तत्त्वे एका विशिष्ट धर्मासाठी किंवा तो धर्म पाळणार्यांसाठी आहेत हा समज करणे पूर्णत: चुकीचे होईल. ही तत्त्वप्रणाली सर्वव्यापक आहे. ब्रह्मांडातील सर्वांनाच ती लागू आहे. ही कुणा एका जातीची, जमातीची किंवा विशिष्ट गटाची वा विचारसरणीच्या लोकांची नाही. ही धर्मनिरपेक्ष आहे. कोणत्याही एका धर्माची नाही. त्यावर कुणा एकाचा स्वामित्वाचा अधिकार नाही. सूर्य, चंद्र, नक्षत्रे, तारांगण, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हे ब्रह्मांड. हे संपूर्ण मानवजातीचे आहे. ह्यावर केवळ हिंदूंचाच अधिकार आहे, इतरांचा नाही, हा समज करणे पूर्णत: चुकीचे आहे. तसेच हे केवळ हिंदुतत्त्वज्ञान आहे, असाही समज करणे चुकीचे आहे. डॉक्टर कोणत्या जातीचा आहे,कोणत्या धर्माचा आहे, कोण आहे, ह्याच्यावर रोगी बरा होत नाही, तर डॉक्टरांनी केलेल्या परीक्षणांवर, विश्लेषणांवर, तपासणीवर, तात्त्विक परीक्षणांवर, यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असलेल्या औषधेापचारांवर रोगी बरा होतो. हे जसे आहे तसेच ब्रह्माण्डामध्ये आहे. हे ब्रह्माण्डाचे विश्लेषण, तात्त्विक परीक्षण व अनेक तर्हेचा अभ्यास केल्यावर समजू शकेल.
उपरीनिर्दिष्ट ७ विभाग हे धर्मनिष्ठ वा व्यक्तिनिष्ठ नाहीत. ही तत्त्वे आहेत. ही तत्त्वे म्हणूनच पाहणे आवश्यक आहे. ह्या तत्त्वांचा कोणत्या धर्माने उल्लेख केला आहे ह्याला महत्त्व नसून, ही तत्त्वे ब्रह्मांडातील सर्वांनाच लागू पडतात, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ब्रह्मांड व त्यातील विविध घडामोडी ही एक तत्त्वमीमांसा आहे. ती अभ्यासून, पडताळून पाहावयास हवी. ब्रह्मांडाच्या तत्त्वांना नाकारण्यासारखे आपल्या अहंकाराशिवाय किंवा आपल्या पूर्वदूषित विचारांशिवाय दुसरे काहीच नाही.
पंचमहाभूतांचा जीवाच्या जीवनप्रवाहाशी कसा संबंध असतो?
ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वानुसार आपण पाहिलेच आहे, की सृष्टीवरील संपूर्ण मानवजात ही फक्त १२ प्रकारांतच विभागली आहे. ह्या विभागांना ‘राशी’ ही संज्ञा दिली आहे. नवग्रह, नक्षत्र, सूर्ममंडळ आणि ग्रहांचा परस्परयोग ह्याचा विशेषेकरून ज्योतिषशास्त्रात विचार केला जातो. ह्याशिवाय पंचमहाभूतांचादेखील मानवी जीवनावर परिणाम होत असतो. प्रत्येक महाभूताचा म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा प्रत्येक जीवावर सतत परिणाम होत असतो. ह्या दृष्टीने आपण प्रत्येक महाभूताचा विचार करू.
पंचमहाभूते
प्रथम आपण पंचमहाभूतांचा विचार करू. ब्रह्मांडातील मानवी जीवनाचे महत्त्वाचे घटक म्हणजे पंचमहाभूते. म्हणजे पृृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश. या प्रत्येक महाभूताचे विशेष गुणधर्म आहेत. पृथ्वी, आप, तेज,वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या प्रभावाखाली सृष्टीवरील सर्व जीव असतात. ह्या प्रत्येक तत्त्वाचा प्रत्येक जीवावर सतत परिणाम होत असतो. आपले शरीर, तसेच आपला जीव हा आपण जे जे काही करतो त्याच्यावरच केवळ अवलंबून राहत नसतो, तर तो ब्रह्मांडात ब्रह्मतत्त्वावर, पंचमहाभूतांच्या परिणामावर अवलंबून राहत असतो. यत् पिंडे तत् ब्रह्मांडे| जे जे काही आपण बाहेर ब्रह्माण्डात पाहतो, अनुभवतो ते ते सर्व तत्त्वरूपाने आपल्या शरीरात विद्यमान आहे.फार काय, प्रत्यक्ष परमेश्वरदेखील तत्त्वरूपाने प्रत्येकाच्या देहात विद्यमान आहे. असे काहीच नाही, की जे तत्त्वरूपाने बाहेर आहे, पण आपल्या देहात नाही. आता आपण पृथ्वी ह्या महाभूताचा विचार करू.
पंचमहाभूतांतला पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे पृथ्वी.
सर्व प्राणी पृथ्वीच्या आधाराने राहतात. देह पृथ्वीतत्त्वाचाच बनलेला असल्याने पृथ्वीवाचून जीवांना गत्यंतर नाही. पृथ्वी सोडून पाणी कोठेच जाऊ शकत नाही. देव, दानव, मानव, सुष्ट, दुष्ट, महाबळी, दुबळे- सर्व जण या पृथ्वीवर राहतात. कोट्यवधी जीव आणि भगवंताचे अवतार हे सारे पृथ्वीवर राहतात. लोक पृथ्वीला जाळतात, पोळतात, उकरतात, नांगरतात, मल-मूत्र तिच्यावर टाकतात; अंत:काळी सर्वांचे देह पृथ्वीवरच पडतात. पृथ्वी जिकडेतिकडे अफाट पसरलेली आहे. ती सर्व फिरून पाहणे कुणालाच शक्य नाही. तसेच तिच्यावर अनेक तर्हेचे पाषाण व नाना प्रकारच्या वनस्पती पसरलेल्या आहेत. तिच्या पोटात नाना रत्ने सापडतात. लोक माझी जमीन म्हणतात. पण अखेर ती सोडून त्यांना जावे लागते. पृथ्वी जशीच्या तशी राहते. पृथ्वीचे अशा प्रकारचे वर्णन श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात केले आहे.
सर्व जीव अहोरात्र पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्यांच्या सान्निध्यात व नियंत्रणाखाली व संपर्कात असतात. प्रत्येक जीवावर ह्या पंचमहाभूतांचा परिणाम होत असतो. ह्या पाचही महातत्त्वांचे स्वतःचे मूळ गुणांचा प्रत्येकात भरणा असतो. पृथ्वीतत्त्व हे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर ह्या गुणांनी पूर्णपणे भरलेले आहे. ते एवढे प्रभावी आहे, की पृथ्वी ही प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षपणे संपर्कात आली, की तो संपर्क येताक्षणीच त्या जीवात ह्या गुणांचा प्रचंड आविष्कार होतो. आईच्या उदरातील मुलाचा अप्रत्यक्षपणे संबंध येतो, तरी त्या गर्भधारणेसोबतच ह्या गुणांचा प्रवेश त्या बालक जीवात होतो. ह्या तत्त्वाचे लोक अल्पसमाधानी नसून, ह्यांना संग्रहाचीच आवड जास्त असते. जेवढे जास्त प्राप्त करता येईल तेवढे प्राप्त करण्याचाच गुण ह्या तत्त्वाचा असतो. शरीरातील अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध यांचा संबंध पृथ्वीतत्त्वाशी आहे. हाड, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पाच पृथ्वी धर्माचे आहेत. वृषभ, मकर व कन्या ह्या राशी भूमितत्त्वाच्या आहेत. यांचे राशिस्वामी अनुक्रमे शुक्र,शनी, बुध आहेत. मानवी शरीरात पायांपासून गुडघ्यांपर्यंतचा भाग हा भूमितत्त्वाचा असून, चतुर्भुज ब्रह्मा हे भूमितत्त्वाचे दैवत आहे. पंचमहाभूतांतील पृथ्वीतत्त्वाचे महत्त्व सत्ययुगात विशेष होते. चतुर्वर्णांपैकी वैश्य वर्णाचे विशेष महत्त्व सत्ययुगात होते. पर्यायाने ते भूमितत्त्वाशी संबंधित आहे. भूमितत्त्वात मानवी नाडीचे प्राबल्य चंद्रनाडी असून, त्याचे निजतत्त्व सत्य आहे. ह्या तत्त्वाचे प्रभावी दैवत जगन्माता देवी असून उपासनेच्या दृष्टीने प्रभावी दिशा ही पूर्व आहे. आता पृथ्वी या तत्त्वाचा विचार झाल्यावर आपतत्त्व काय आहे हे पाहू.
पंचमहाभूतांतला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपतत्त्व :-
दासबोधामध्ये आपतत्त्वाचे वर्णन करताना असे सांगितले आहे, की आप म्हणजे पाणी हे सर्वांचेच जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे ते जीवन आहे. जगात वाहते पाणी पुष्कळ आहे. नद्या, नाले, ओढे असे त्याचे अनेक प्रकार आहेत. नद्यांचा महिमा तर अगाध आहे. कारण वसाहती, गावे, शहरे नद्यांच्या काठी असतात. पाण्याचे थंड, उष्ण झरे असतात. कितीतरी पदार्थांतून पाणी आढळते. जसे गोरस, उसाचा रस, निरनिराळ्या फळांचा रस. यांत जलाशय असतो. मोत्यांना व शस्त्रांना पाणी असते. जगात पाणी पुष्कळ आहे. कारण पुष्कळ प्रकारचे समुद्र आहेत. पृथ्वीच्या पोटातदेखील पाण्याचे डोह भरलेले आहेत. पृथ्वीवर एकाहून एक पवित्र तीर्थे आहेत. गंगा तर त्रैलोक्यात वाहते. पाणी जसे तारक आहे तसे मारकसुद्धा आहे. आपला देह आणि पृथ्वी मूळ आपापासूनच निर्माण होतात. पृथ्वीपेक्षा पाणी वरचे, पाण्यापेक्षा तेज वरचे, तेजापेक्षा वायू वरचा, वायूपेक्षा अंतरात्मा- आकाश वरचे आणि अंतरात्म्यापेक्षा परब्रह्म वरचे होय.
आप म्हणजे सर्व स्तरांतील व सर्वात असणारे द्रव्य. पाणी हे द्रव्य स्वरूपात, घन स्वरूपात, तसेच वायू स्वरूपातदेखील असते. पाऊस हा ढगातून आकाशातूनच पडतो. आपतत्त्वाचे गुणवैशिष्ट्य म्हणजे, ह्यात जीवन आहे.
जीवनावश्यक तत्त्व आहे. शरीराची वाढ होण्यासाठी, सुदृढ जीवनासाठी ह्याची गरज आहे. मानवी शरीरात आपाचे प्रमाण सर्वात अधिक आहे. ज्या ज्या घटकामध्ये आपतत्त्व आहे त्या त्या घटकातून जीवनरस मिळून जीव तथा शरीर विकसित होते. आपाचा परिणाम हा शरीरावर, इंद्रियांवर होतो. आपल्या मूळ शैलीवर, तसेच शरीरवर्धनावर होतो. आपतत्त्वामुळे विचारआचार अशुद्ध होत नाहीत. जीवनाच्या विकासाला आवश्यक असणारे तत्त्व मिळून जीव विकसित होत राहतो. जेथे जलतत्त्व आहे तेथे पाण्याचे प्रमाण हे खूपच लागते. जलतत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विशेष स्वरूपाच्या आवडी, चवी इत्यादी. जलतत्त्वाचा स्थायी गुण हा बुद्धी-ज्ञानाशी संबंधित राहतो. कोणत्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास बसत नाही. खात्री पटून घ्यायला वेळ लागतो. संशयी वृत्ती जास्त बळावते. पण स्वतःचे शंकानिरसन झाले की दृढ विश्वास बसतो. अनुभूतिपूर्ण विश्वास म्हणजेच श्रद्धा निर्माण होते. ह्याचा मूळ गुण हा सत्त्व आहे. मानवी शरीरातील चित्त, अपान, जीभ, जननेन्द्रिय आणि रस ह्यांचा संबंध हा पाण्याशी आहे, तसेच रेत, रक्त, लाळ, मूत्र व घाम ही पाच पाण्याची तत्त्वे आहेत. मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशी आपतत्त्वाच्या आहेत. यांचे राशिस्वामी अनुक्रमे गुरू, मंगळ व चंद्र आहेत. मानवी शरीरात गुडघ्यापासून नाभीपर्यंतचा भाग जलतत्त्वाचा असून, पीतांबरधारी नारायण हे आपतत्त्वाचे दैवत आहे. पंचमहाभूतांतील आपतत्त्वाचे महत्त्व द्वापारयुगात विशेष होते. चतुर्वर्णांपैकी ब्र्राह्मणवर्णाचे विशेष महत्त्व द्वापारयुगात होते. पर्यायाने ते आपतत्त्वाशी संबंधित आहे. आपतत्त्वात मानवी नाडीचे प्राबल्य चंद्रनाडी असून, त्याचे निजतत्त्व विवेक आहे. ह्या तत्त्वाचे प्रभावी दैवत विष्णू व गणपती आहेत. उपासनेच्या दृष्टीने प्रभावी दिशा ही पश्चिम आहे. आता आप या तत्त्वाचा विचार झाल्यावर तेजतत्त्व काय आहे हे पाहू.
पंचमहाभूतांतला तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे तेजतत्त्व :-
पंचमहाभूतांचे तिसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे तेज किंवा अग्नितत्त्व.अग्नी हा सीतेचा पिता आणि रामाचा सासरा आहे. घर्षणाने अग्नी प्रगट होतो. तो अंधार, थंडी व रोग ह्यांचे निवारण करतो. अग्नीमुळे सृष्टी चालते. त्याच्यामुळे लोक जिवंत राहतात व तृप्त होतात. अग्नी विश्व व्यापून आहे. तो जगाचे व जीवांचे पोषण करतो. ईश्वराचे तो मुख आहे. तो अति पवित्र आहे. सर्व यज्ञयाग हे अग्नीमुळेच चालतात. ऋषींना तपश्चर्येचे फळ तोच देतो. पृथ्वी ही त्याच्यापासून झाली आहे. देहाच्या सर्वांगांना तो व्यापून राहतो. त्याच्यामुळेच भूक लागते. दिवे त्याच्या साहाय्याने लागतात व जळतात. रात्रीच्या अंधारात व थंडीत तोच उपयोगी पडतो. त्याच्या जोरावर शत्रूस जिंकता येते. उष्ण औषधाने रोग हरण होतात. महारोगदेखील बरा होतो. लग्नसमारंभात शोभेची दारू म्हणजे अग्नी शोभा आणते. अग्नी जसा उपाय करतो तसा अपायही करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. जिवंतपणी जसे तो रक्षण करतो तसे मेल्यावर देहाचे भस्म करतो. अग्नी सर्वसंहार करतो. जगात अग्निदिव्य प्रसिद्धच आहे. अष्टधा प्रकृती आणि तीन लोक त्याने व्यापले आहेत.
अग्नी हा मुळातच तेजाचे प्रतीक. तेजात किंवा अग्नितत्त्वात दडलेले तत्त्व म्हणजे प्रचंड शिस्त, नियमबद्धता. सुंदरता ही त्यात अंगभूतच असते. तेजाच्या- अग्नीच्या अनुभूतीशिवाय तो न मानणे हा गुणधर्म. प्रत्यक्षानुभूतीशिवाय विश्वास न ठेवणे हा मूळ गुण. विविध मोहक रंगांविषयी आकर्षण व आवड,विविध रंगांचा विविध परिणाम लक्षात घेण्याचे ज्ञान अग्नितत्त्वात आहे. अग्नितत्त्व दुःखांधार दूर करण्याची प्रवृत्ती ठेवते. शुद्धता, पावित्र्य, शुद्ध वातावरणनिर्मिती,तसेच सत्त्वप्रवृत्त असणे, होणे वा करणे हा स्थायीभाव ह्या अग्नितत्त्वाचा असतो. दुष्ट प्रवृत्तींचा, गोष्टींचा नाश करणे. एखाद्याचे अस्तित्वच नष्ट करणे हे त्या तत्त्वाचे गुणधर्म आहेत. घर्षणाने उष्ण प्रवृत्त होते. शांतता ही सहजप्राप्त नाही. विनाकारण विविध विषयांच्या विचारावरून अस्थिर होणे, भडकविणे,तसेच स्वतः भडकणे, आपण स्वयंनिरंतर शुद्ध हीच मूळ भावना असणे, हा गुणधर्म आहे. विविध वादविवाद निर्माण करणारे हे तत्त्व आहे. ह्या तत्त्वाचा हा अवगुण आहे व स्थायीभाव हा शील म्हणजे स्वरूपाचे रक्षण करणे हा आहे. भूक, तहान, आळस, झोप, मैथुन हे पाच तेजाचे गुण आहेत.
मेष, सिंह व धनू ह्या राशी तेजतत्त्वाच्या आहेत. यांचे राशिस्वामी अनुक्रमे मंगळ, रवी व गुरू आहेत. मानवी शरीरात नाभीपासून हृदयापर्यंतचा भाग हा अग्नितत्त्वाचा आहे. त्रिलोचन महारुद्र हे तेजतत्त्वाचे दैवत आहे. पंचमहाभूतांतील तेजतत्त्वाचे महत्त्व त्रेतायुगात विशेष होते. चतुर्वर्णांपैकी क्षत्रिय वर्णाचे विशेष महत्त्व त्रेतायुगात होते. पर्यायाने ते तेजतत्त्वाशी संबंधित आहे. तेजतत्त्वात मानवी नाडीचे प्राबल्य सूर्यनाडी असून, त्याचे निजतत्त्व शील आहे. ह्या तत्त्वाचे प्रभावी दैवत भगवान दत्तात्रेय व राम हे आहे. उपासनेच्या दृष्टीने प्रभावी दिशा ही दक्षिण आहे, तेज ह्या तत्त्वाचा विचार झाल्यावर आता वायुतत्त्व काय आहे हे पाहू. |
पंचमहाभूतांतला चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे वायुतत्त्व :-
वायूचा स्वभाव फार विचित्र आहे. वायूच्या योगाने पंचभूते एके ठिकाणी येतात आणि एकमेकांमध्ये मिसळतात. आता त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे सोपे नाही. वायू मोठा कारभारी आहे. तो अत्यंत व्यापक आहे. प्रथम तो ब्रह्माण्डामध्ये प्रगटला. मोठमोठ्या देवता निर्माण झाल्यावर मग तो पिंडामध्ये उतरला. ह्या विश्वात जेवढे प्राणी आहेत ते सारे वायूमुळे जगतात व हालचाल करतात. देव, दानव, मानव, बलाढ्य पुरुष, जलचर, वनचर, श्वापदे ह्या सवार्ंत वायू खेळतो. शेष वारा पितो व पृथ्वी डोक्यावर तोलतो. कूर्म व वराह अवतारांना वायूमूळे शक्ती प्राप्त झाली. विश्वामधील सार्या देवदेवता, भुते वगैरे वायुरूप आहेत. हनुमान हा वायूचा मुलगा. बापलेकांचा पराक्रम सारखाच आहे. हनुमान हा ईश्वरी अवतारच होय. देवांना त्याचा आधार वाटला. त्याने देवांना सोडवले व प्राणिमात्र सुखी केले.
पंचमहाभूतांतील चौथे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे वायुतत्त्व हे निराकार आहे. पृथ्वीतत्त्वाला स्वतःचाच निसर्गदत्त आकार आहे. आपतत्त्वाला परिस्थितिजन्य आकार आहे. तेज वा अग्नितत्त्व हे निर्गुण-निराकार आहे. अतिशय सूक्ष्म रीतीने दुःखाचा विचार हा तत्त्वात दडलेला आहे.
प्रत्येक माणसाच्या ठिकाणी पंचप्राण असतात. हे पाचही प्राण वायूचेच आहेत. १) प्राण, २) अपान, ३) व्यान, ४) उदान, ५) समान प्राण. वायू हा तोंडात आणि नाकात असतो. अपान वायू गुदस्थानी वस्ती करतो. व्यान वायू हा सर्वांग व्यापून असतो. उदान वायू कंठामध्ये असतो, तर समान वायू नाभीच्या ठिकाणी असतो.
मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्वचा, हात, स्पर्श व रूप ह्यांचा संबंध वायुतत्त्वाशी आहे. चलन, वलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे पाच गुण वायुतत्त्वाचे आहेत.
कुंभ, तूळ व मिथुन ह्या राशी वायुतत्त्वाच्या आहेत. यांचे राशिस्वामी अनुक्रमे शनी, शुक्र व बुध आहेत. मानवी शरीरात हृदयापासून भ्रुकुटीपर्यंतचा भाग हा वायुतत्त्वाचा आहे. सर्वशक्तिमान ईश्वर हे वायुतत्त्वाचे दैवत आहे. पंचमहाभूतांतील वायुतत्त्वाचे महत्त्व कलियुगात विशेष आहे. चतुर्वर्णांपैकी शूद्र वर्णाचे विशेष महत्त्व कलियुगात असते. पर्यायाने ते वायुतत्त्वाशी संबंधित आहे. वायुतत्त्वात मानवी नाडीचे प्राबल्य सूर्यनाडी असून, त्याचे निजतत्त्व समता आहे. ह्या तत्त्वाचे प्रभावी दैवत भगवान शिव व मारुती आहेत. उपासनेच्या दृष्टीने प्रभावी दिशा ही उत्तर आहे.
वायुतत्त्वाचा मूळ गुण हा समता आहे. त्यामुळे सर्वांशीच समतेने वागणे हे ह्या युगात दिसून येईल. प्रत्येकालाच ईश्वरप्राप्तीचा अधिकार आहे, ह्या तत्त्वाने धार्मिक, आध्यात्मिक कार्य घडताना ह्या युगात दिसतील. वायू या तत्त्वाचा विचार झाल्यावर आता आकाशतत्त्व काय आहे हे पाहू.
पंचमहाभूतांतील पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे आकाशतत्त्व :-
पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचे मूळ अग्नी, अग्नीचे मूळ वायू, तसे वायूचे मूळ अंतरात्मा होय. अंतरात्मा म्हणजे परब्रह्मातील प्रथम स्फुरण होय. त्याच्यापासून तीन गुण झाले. त्याच्यापासून पंचभूते झाली. त्यापैकी आकाश हे मुख्य आहे. झालेल्या सर्व वस्तूंमध्ये अंतरात्मा सर्वांत वडील किंवा मोठा असल्याने तो खर्या अर्थाने महद्भुत आहे. अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म व चपळ असल्याने तो येतो-जातो तरी दिसत नाही.
वेद-श्रुतींना त्याचे रूप कळत नाही. तो पिंड आणि ब्रह्माण्ड व्यापून राहतो. मानवी शरीरात तोच विलास करतो. विवेकी पुरुषाला तो जगदांतरात अनुभवास येतो. इंद्रियांचे सारे व्यापार तोच चालवितो. प्रपंच व परमार्थ तोच करतो. माणसाचे सर्व व्यवहार त्याच्या योगाने घडतात. विश्वातील सर्व व्यापार तोच घडवून आणतो. तो मोठा बहुरूपी आहे. अनेक देहांत तो नटतो. देहात्मयोगाने सारे अनुभव येतात. त्याच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे. स्थूलांत स्त्रीपुरुष असा भेद असतो. सूक्ष्मांत असा भेद नसतो. द्वैत इच्छा मुळात झाली. तिच्यातून सर्व विश्व प्रगट झाले. पिंडातील आत्मा ओळखावा. पिंडावरून ब्रह्माण्ड ओळखावे. प्रचितीने प्रचिती घ्यावी.
आकाशतत्त्व हे केवळ पोकळीने भरलेले असल्यामुळे ते शून्य समजले जाते. ते सर्व तत्त्वांवरच ब्रह्मांड स्वरूपाने शून्य भावनेने राहते. परंतु सर्वच तत्त्वांवर ते अतिउंचीवरून नियंत्रण ठेवून असते. कुणाच्याही आधाराशिवाय ते कसे उभे आहे ते पाहा. जे हातात येत नाही, ज्याचा आरंभ कळत नाही, शेवटही कळत नाही, असे हे अनंत, नील नील आकाश! याचे मोजमाप कोण करणार? सूर्य, चंद्र, नक्षत्रे, चांदण्या, ढगांची वर्दळ, वृष्टीचे तांडव हे आकाश सहजतेने बघते. दहा दिशा या दिक्कन्या व दशदिग्पाल या आकाशमंडपाचे रक्षक आहेत.पृथ्वी ही शय्या, आकाश पांघरूण व दिशा हे वस्त्र समजणारे ज्ञानी सत्पुरुष या विश्वमंडपात आनंदाने राहतात. वादळ झाले, भूकंप झाले तरी आकाश हादरत नाही, कंपित होत नाही, विजेचे त्याला चटके बसत नाहीत,असे हे आकाश आहे.
‘दासबोध’ ह्या ग्रंथाच्या १७ व्या दशकातील ८ व्या समासामध्ये सांगितल्याप्रमाणे अंत:करण, व्यान, कान, वाणी व शब्द यांचा संबंध हा आकाशतत्त्वाशी आहे. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय या पाच गोष्टी ‘आकाश’तत्त्वाच्या आहेत.
कोणत्याही राशी आकाशतत्त्वाच्या नाहीत. आकाशतत्त्व हे इतर सर्व तत्त्वांसमवेत असून, त्याचा परिणाम हा सर्व तत्त्वांवर समान आहे. त्यामुळे इतर महाभूतांच्या तत्त्वाप्रमाणे ह्याचे परिणाम नसतात. मानवी शरीरात भ्रुकुटीपासून शेंडीपर्यंतचा भाग हा आकाशतत्त्वाचा आहे.
‘आकाश’ हे ब्रह्मतत्त्व असल्यामुळे ते शून्य म्हणजे पूर्णबह्म आहे. हेच त्याचे स्वरूप आहे. प्रकाश, प्रेम ही ह्याची अज्ञात शक्ती आहे. मूळ ज्ञान येथेच आहे. ह्या तत्त्वातून घोष, ध्वनी, नाद हे प्रसृत होत असून, ते अतिसूक्ष्म रीतीने प्रत्येक महाभूतात विराजमान होतात. अशा प्रकारे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ह्या तत्त्वांचा काय व कसा परिणाम होतो, हे आपण पाहिले.
ज्योतिषशास्त्राच्या तत्त्वानुसार, सृष्टीवरील संपूर्ण मानवजात ही फक्त १२ प्रकारांतच विभागली आहे. म्हणजे सृष्टीवरील सर्व माणसे फक्त बारा राशींतच मोडतात.त्याप्रमाणेच माणसाचे वैशिष्ट्य, स्वभाव, रंग, रूप, अंग, कांती व त्याची क्रियाशीलता समजण्यासाठी संपूर्ण मानवजात ही चार वर्णांमध्ये विभागली आहे. ब्रह्माण्डाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील दुसरा घटक म्हणजे चार वर्ण. ह्याचा आता आपण विचार करू.
२. ब्रह्माण्डाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील दुसरा घटक म्हणजे चार वर्ण :-
ब्रह्मांडातील संपूर्ण मानवजातीची विभागणी ही फक्त चार वर्णांत केली आहे. म्हणजे कोणताही माणूस हा ह्या चार प्रकारांतच मोडणार.चार प्रकारांना ‘वर्ण’ हे नाव दिले आहे. चार वर्ण म्हणजे – १. वैश्य, २. ब्राह्मण, ३. क्षत्रिय, व ४. शूद्र. ह्या प्रत्येक वर्णाचे, प्रकाराचे वेगळे स्वतंत्र वैशिष्ट्य असून,ह्या प्रत्येक वर्णाच्या माणसांत विशिष्ट प्रकारची कला, युक्ती व शक्ती असते. त्यांचे ते वैशिष्ट्यच असते. ह्या सर्वांचा परिणाम त्यांच्या अंगकाठी, चेहरा व त्यावरचे भाव ह्यांच्यावर होतो.
१. वैश्य वर्ण : साधारणपणे वैश्य वर्णाच्या जाती म्हणजे सोनार,शिंपी, न्हावी, धोबी वगैरे. पूर्वीच्या काळी जात व व्यवसाय ह्यांना बरेच महत्त्व होते. व्यवसायांवरून जातींचे ज्ञान होत असे. परंतु जग जसजसे प्रगत होऊ लागले तसतसे व्यवसायावरून जात पाहणे, हा विचार बदलला. आज कोणीही कोणताही व्यवसाय करतो. ह्या वर्णाची सर्व माणसे ही भूमितत्त्वाची असतात. सत्य हे त्यांचे निजतत्त्व असते. ही माणसे ‘रजो’ गुणी असतात. साधारणत: ही माणसे लोभी प्रवृत्तीची असतात. हे सर्व लोक वृषभ, मकर किंवा कन्या ह्याच राशींचे असतात. ह्यांच्यात स्थिरता कमी असते. ही मंडळी सदैव नवनिर्मितीच्या कार्यात मग्न असतात. प्रत्येक माणूस हा पाच घटकांचा बनलेला आहे. परंतु हे पाचही घटक प्रत्येकामध्ये समप्रमाणात नसतात. एखादा घटक हा जास्त प्रमाणात असतो. त्याचा परिणाम माणसाच्या नाकात, चेहर्यात, वर्णामध्ये किंवा स्वभावात दिसतो.
२. ब्राह्मण वर्ण :-साधारणपणे संकुचित प्रवृत्तीचा माणूस म्हणजे ‘ब्राह्मण’ असे चुकीचे समज समाजामध्ये असतात. ह्या लोकांची संशयी वृत्ती असते. ही मंडळी सदैव शक्ती व निर्मितीच्या सारासार कार्यात मग्न असतात. प्रत्येक माणूस हा पाच घटकांचा बनलेला आहे. परंतु हे पाचही घटक प्रत्येका मध्ये सम प्रमाणात नसतात. एखादा घटक हा जास्त प्रमाणात असतो. अनुवंशिकता हे ह्यांचे वैशिष्ट्य आहे. याचा परिणाम माणसाच्या नाकात, चेहर्यात, वर्णामध्ये किंवा स्वभावात दिसतो.
३. क्षत्रिय वर्ण :- साधारणपणे शूर, वीर प्रवृत्तीचा माणूस म्हणजे क्षत्रिय, असा समज क्षत्रियांबद्दल आहे. युद्धामध्ये लढणारा तो क्षत्रिय असा चुकीचा समज समाजामध्ये आहे. ह्या वर्णाची सर्व माणसे ही अग्नितत्त्वाची असतात. आपल शील हे त्यांचे निजतत्त्व असते, तर ही माणसे रक्षणकार्यात विशेषेकरून गुंतलेली असतात. हे सर्व लोक मेष, सिंह किंवा धनू या राशींचे असतात. ह्या लोकांची संरक्षण देण्याची वृत्ती असते. ही मंडळी सदैव संरक्षणकार्यातच मग्न असतात. प्रत्येक माणूस हा पाच घटकांचा बनलेला आहे. परंतु हे पाच घटक प्रत्येकामध्ये सम प्रमाणात नसतात. एखादा घटक हा जास्त प्रमाणात असतो. अनुवंशिकता हे ह्यांचे वैशिष्ट्य आहे. याचा परिणाम माणसाच्या नाकात, चेहर्यात, वर्णामध्ये किंवा स्वभावात दिसतो. म्हणजे ‘तेज’तत्त्वाची सर्व माणसे ही क्षत्रिय असतात.
४. शूद्र वर्ण :-साधारणपणे कनिष्ठ प्रकाराचा समजला जातो. परंतु हा अर्थ चुकीचा आहे. ‘दयेने व सेवाभावनेने काम करणारा’, मातापिता/पृथ्वी अशी सर्वांची शुश्रूषा करणारा, हा खरा ‘शूद्र’चा अर्थ आहे. पूर्वीच्या काळी शूद्र म्हणजे दलित/मागास वगैरे समजायचे. पूर्वीच्या काळी व्यवसायावरून जातीचे ज्ञान होत असे. परंतु समाज, जग जसजसे विकसित व प्रगत होऊ लागले तसतसे व्यवसायावरून जात पाहणे हा विचार बदलला. आज कोणीही कोणताही व्यवसाय करतो. त्यामुळे व्यवसायावरून जातीचा अंदाज घेणे चुकीचे ठरेल. या वर्णाची सर्व माणसे ही ‘वायु’तत्त्वाची असतात. दया हे त्यांचे निजतत्त्व असते तर ही माणसे ‘समता’ गुणाची असतात. हे सर्व लोक मिथुन, तूळ किंवा कुंभ या राशींचे असतात. ह्या लोकांना वाकडेतिकडे बोललेले आवडत नाही. प्रत्येक माणूस हा पाच घटकांचा बनलेला आहे; परंतु हे पाचही घटक प्रत्येकामध्ये समप्रमाणात नसतात. एखादा घटक हा जास्त प्रमाणात असतो. त्याचा परिणाम माणसाच्या नाकात, चेहर्यात, वर्णामध्ये किंवा स्वभावात दिसतो. अशा प्रकारे मानवजातीची, प्रत्येक माणसाची ढोबळमानाने चार निरनिराळ्या तत्त्वांत विभागणी केली आहे.
‘क्षत्रियाणां बलं तेजो, ब्राम्हणांनां क्षमा बलं |
क्षमागुणोऽ’ह्य शक्तांना, शक्तांना भूषणं क्षमा ॥
म्हणजे क्षत्रियांचे बळ तेजांत आहे. ब्राह्मणांचे बळ क्षमेत आहे. दुर्बलांकडे क्षमा हा गुण आहे, तर बलवानांना क्षमा हे भूषण आहे. आता आपण प्रत्येक वर्णाचा किंवा तत्त्वांचा विचार करू.
चारी वर्णांची गुणविभागणी पुन्हा चार गुणांमध्ये केली आहे. सत्त्व,रज, तम आणि समता असे चार प्रकार आहेत. ह्याचे विवेचन आपण पुढे ब्रह्माण्डाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील पाचवा घटक म्हणजे निजगुण ह्या शीर्षकाखाली पाहू.
ब्रह्मांडातील घडामोडींची चार युगांत विभागणी केली आहे. सत्य, त्रेता, द्वापार व कलियुग. प्रत्येक युगाची विशिष्ट कालगणना आहे. अशी चारी युगे मिळून एकूण ४३,२०,००० वर्षे होतात. अशी १००० चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचे असे १००० दिवस म्हणजे विष्णूची १ घटका. विष्णूच्या १००० घटका म्हणजे ईश्वराचे १ पळ. ईश्वराची १००० पळे म्हणजे शक्तीचा अर्धा पळ. म्हणजे ४३,२०,००० वर्षे गुणिले १००० गुणिले १००० गुणिले १००० गुणिले १००० एवढ्या वर्षांची संपूर्ण ब्रह्माण्डातील सर्व कामे पाहण्यास ईश्वरी शक्तीला केवळ अर्धा पळ लागतो, एवढे प्रचंड सामर्थ्य ईश्वरी शक्तीचे आहे.
आता ब्रह्मांडाच्या नियंत्रण योजनेत ह्या चार युगांचे आणि प्रत्येक युगाचा मानवी जीवनावर, पूर्वसंचितावर व त्याच्या प्रारब्धावर कसा व काय परिणाम होतो, ते आता आपण पाहू.
३. ब्रह्माण्डाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील तिसरा घटक म्हणजे चार युगे.
चार युगे म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार व कलियुग. या चार युगांचे गुणवैशिष्ट्य आता पाहू.
१. सत्ययुग :
सत्य किंवा कृतयुग. शास्त्राप्रमाणे हे युग १७ लक्ष २८ हजार वषार्ंचे आहे. ह्या युगामध्ये माणूस सरासरी १६ हातांचा होता. ह्या युगामध्ये ‘भू’ तत्त्वाचा विशेष जोर होता. बहुतांश लोक सत्यप्रिय व सत्यवचनी होते. या युगामध्ये ‘वामन’ अवतार होऊन गेला. बहुतांश मंडळी ही रजोगुणी होती. वृषभ, मकर व कन्या राशींचे प्राबल्य या युगात होते. या युगातील प्रभावी दैवत हे देवी भगवती हे होय. या युगातला राज्यकारभार हा ‘भूमी’ ह्या महाभूताच्या तत्त्वाचे होते. निजतत्त्व ‘सत्य’ ह्या तत्त्वावर चालायचे. भूतत्त्वाची सर्व माणसे सत्य ह्या निजतत्त्वाची असतात आणि ती रजोगुणी असतात.
२. त्रेतायुग :
शास्त्राप्रमाणे त्रेतायुग हे १२ लक्ष ९६ हजार वषार्र्ंचे आहे. या युगामध्ये माणूस सरासरी १२ हातांचा होता. ह्या युगात सत्य, जप, तप व ज्ञान यांचा महिमा मोठा असतो. त्यांची प्रतिष्ठा असते. यज्ञापेक्षा तपाला जास्त महत्त्व दिले आहे. तपापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा कैवल्याची प्राप्ती श्रेष्ठ मानली आहे, असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे. ह्या युगामध्ये अग्नितत्त्वाचा सत्ययुग विशेष जोर होता. अग्नितत्त्वाचा निजगुण शील आहे. बहुतांश लोक हे शील जपणारे होते. या युगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी अवतार धारण केला होता.
बहुतांश मंडळी ही तमोगुणी होती. मेष, सिंह व धनू या राशींचे प्राबल्य या युगात होते. या युगातले प्रभावी दैवत हे भगवान दत्तात्रेय व प्रभू रामचंद्र हे होत. या युगातला राज्यकारभार हा अग्नी या महाभूताचे निजतत्त्व ‘शील’ ह्या तत्त्वावर चालायचा.
३. द्वापारयुग
शास्त्राप्रमाणे द्वापारयुग हे ८ लक्ष ६४ हजार वर्षांचे आहे. ह्या युगामध्ये माणूस सरासरी ८ हातांचा होता. त्रेतायुग क्षीण झाल्यावर द्वापारयुगास प्रारंभ होतो. द्वापारयुगात वर्णाश्रम व्यवस्था छिन्नभिन्न होती. ह्या युगामध्ये ‘आप’तत्त्वाचा विशेष जोर होता. आपतत्त्वाचा निजगुण विवेक आहे. बहुतांश लोक विवेकप्रिय व विचारी होते. या युगामध्ये लोक राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह आदी दोषांच्या अधीन होतात, असे ‘ब्रह्मांड’ पुराणात सांगितले आहे. या युगात श्रीकृष्णावतार होऊन गेला. बहुतांश मंडळी ही सत्त्वगुणी होती. मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचे प्राबल्य या युगात होते. या युगातील प्रभावी दैवत विष्णू व गणपती हे होत. या युगातला राज्यकारभार हा ‘आप’ या महाभूताचे निजतत्त्व ‘विवेक’ या तत्त्वावर चालायचा. आपतत्त्वाची सर्व माणसे ही विवेक तत्त्वाची असून, सत्यगुणी असतात.
४. कलियुग
शास्त्राप्रमाणे कलियुग हे ४ लक्ष ३२ हजार वषार्र्ंचे आहे. या युगामध्ये माणूस सरासरी ४ हातांचा आहे. युगाची स्थिती अत्यंत दारुण व विषम असते. या युगात भूकंप, उल्कापात, अनावृष्टी इत्यादी दैवी उत्पात होतात. पारंपरिक संघर्ष वाढीस लागतो. वेदशास्त्राची कलीयुग (कलंकी) प्रामाणिकता समाप्त होते. लोक अकाली मृत्यूला सामोरे जातात. कोणी गर्भातच, तर कोणी बालपणी, कोणी यौवनात तर कोणी वृद्धावस्थेत पूर्ण आयुष्य न भोगताच काळाच्या स्वाधीन होतात. प्रजा गुणहीन बनते. वेदशास्त्राच्या अध्ययनाची परंपरा, अध्यापनाची परंपरा उच्छिन्न होते. शूद्र ब्राह्मणत्वाचा स्वीकार करतात, ब्राह्मण शूद्र बनतात. राजे चांडाळासारखे आचरण करतात. पुरुष आचारहीन होतात, स्त्रिया असत्यभाषणी व मद्यमांस सेवन करणार्या होतात. सर्व वर्णार्ंचे स्त्री-पुरुष धनाचा लोभ करणारे असतात. धर्माचा विक्रय होतो. चोरी, डाका, हत्या, द्रोह, अग्निसंकट हे सतत होतात. या युगात अल्पमात्र धर्माचरण केल्यास सिद्धी प्राप्त होते. त्रेतायुगात १ वर्षापर्यंत साधना केल्याने, द्वापारयुगात १ महिना साधना केल्याने जे फल मिळते ते कलियुगात १ दिवस धर्माचरण केल्याने होते, असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे.
या युगामध्ये ‘वायु’तत्त्वाचा विशेष जोर आहे. ‘वायु’तत्त्वाचा निजगुण दया आहे. बहुतांश लोक हे दयेने प्रभावित होतात. या युगामध्ये कलंकी अवतार धारण करणार आहे. बहुतांश मंडळी ही समतागुणी आहेत. निंदा किंवा हेवेदावे, हा या युगाचा दुर्गुण आहे. मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचे प्राबल्य या युगात असणार. या युगातले प्रभावी दैवत हे ‘शिव किंवा मारुती’ हे होय. या युगातला राज्यकारभार हा आप या महाभूताचे निजतत्त्व समता ह्या तत्त्वावर चालतो.
ब्रह्मांडातील घडामोडींची चार युगांत कशी विभागणी केली आहे हे आपण पाहिले. ह्या प्रत्येक युगाची विशिष्ट निजतत्त्वे आहेत. आता ब्रह्मांडाच्या नियंत्रणयोजनेत या प्रत्येक चार युगांच्या निजतत्त्वांचा मानवी जीवनावर, पूर्वसंचितावर व त्याच्या प्रारब्धावर कसा व काय परिणाम होतो हे आपण आता पाहू.
४. ब्रह्माण्डाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील चौथा घटक म्हणजे निजतत्त्वे :
पंचमहाभूतांतील म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ह्या प्रत्येक महाभूताला स्वत:चे स्थायी स्वरूपाचे म्हणजे त्याचे निजतत्त्व आहे. ही निजतत्त्वे कोणती आणि मानवी जीवनावर, पूर्वसंचितावर व त्याच्या रब्धावर, काय परिणाम होतात, हे आपण आता पाहू.
१. भूमीचे निजतत्त्व स्थायीभाव, सत्य हा आहे. म्हणून सत्ययुगात भूमितत्त्वाचेच प्राबल्य होते. सृष्टीतील भूतत्त्वाची सर्व माणसे ही सत्य ह्या निजतत्त्वाची असतात आणि ती रजोगुणी असतात.
२. जलतत्त्वाचा स्थायी गुण हा विवेक आहे. भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगी विवेकाची परिसीमा गाठली. संपूर्ण युगात संपूर्ण राज्यात आणि जनमानसामध्ये प्रत्येकाचा विवेक जागृत करण्याचे कार्य केले. एवढेच नाही, तर येणार्या युगासाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून विवेकामृत ठेवले. आपतत्त्वाची सर्व माणसे ही विवेक तत्त्वाची असतात आणि ती सत्वगुणी असतात.
३. अग्नितत्त्वाचे निजतत्त्व हे ‘शील’ आहे. त्रेतायुगात रामाने अग्नितत्त्वाच्याच धोरणाने कार्य केले. रामराज्य म्हणूनच हे ओळखले जाते. या युगामध्ये शील जतन केलेले आहे.अग्नितत्त्वाची सर्व माणसे ही शील जोपासणारी असतात. ती संरक्षण देणार्या गुणाची असतात. अग्नी किंवा तेजतत्त्वाची माणसे ही क्षत्रिय वृत्तीची असून, शील किंवा स्वरूपाचे रक्षण हा त्यांचा स्थायीभाव असतो. ते तमोगुणी असतात. हे त्रेतायुगातील तत्त्व आहे.
४. वायुतत्त्वाचा सहज सिद्धभाव म्हणजे दया आहे. दयेचा भाव लक्षात घेऊन कलियुगात सर्व कार्ये होत आहेत. ह्या युगात दया भाव हा जास्त प्राबल्याने दिसून येतो. दया भाव म्हणजे सर्व काही सात्त्विक प्रवृत्तीनेच होईल, असे नसून, दयेच्या आधाराने, दयेच्या ढालीखाली पाहिजे त्या प्रवृत्तीने राहणे वा कार्य करणे, असे लक्षात घ्यावे. दया भाव हा साधन म्हणून वापरून पाहिजे ते साध्य करणे, असेदेखील लक्षात येऊ शकेल. वायुतत्त्व हे शूद्र वर्णीयांमध्ये आढळते. ते समतत्त्वाचे असून ते कलियुगातील तत्त्व आहे.
वैश्य वर्ण, ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण व शूद्र वर्ण ह्या चारी वर्णांची गुणविभागणी पुन्हा चार गुणांमध्ये केली आहे. सत्त्व, रज, तम आणि समता हे आपण पूर्वी पाहिले आहे. आता ह्या चार गुणांच्या निजगुणांचा मानवी जीवनावर, पूर्वसंचितावर व त्याच्या प्रारब्धावर कसा व काय परिणाम होतो ते आता आपण पाहू.
५. ब्रह्माण्डाच्या सप्तवर्गीय नियंत्रण योजनेतील पाचवा घटक म्हणजे निजगुण :
प्रत्य क पंचमहाभूताचे तत्त्व आणि त्याचे निजतत्त्व ह्यांचा एक निजगुण असतो. म्हणजे निजगुण हे चार प्रकारचे आहेत. सत्त्व, रज, तम आणि सम असे चार निजगुण आहेत.
सत्ययुगातील अर्थातच ‘भू’तत्त्वाच्या प्रभावाखाली असणार्या सर्वांचाच न्यूनगण्ड, अवगुण किंवा त्यांच्यातील कमकुवतपणा म्हणजे त्यांच्यात निर्माण होणारा लोभ हा होय. लोभावर जर नियंत्रण ठेवता आले तर रजोगुणी असूनदेखील आध्यात्मिक उन्नती विशेष साधणे शक्य आहे. रजोगुणाचे प्रतीक ब्रह्मदेव आहे, त्याचप्रमाणे ‘जल’तत्त्वाचा प्रभाव अर्थातच द्वापारयुगातील सर्वांचाच अवगुण व्यभिचार हा आहे. ह्या अवगुणावरचा ताबा हा विवेक वाढवून आत्मिक उन्नतीकडेच नेईल. सत्त्वगुण देखील वृद्धिंगत होऊन त्रास होणार नाही. त्त्वगुणाचे प्रतीक विष्णू आहे. त्रेतायुगातील माणसांवर अग्नितत्त्वाचा प्रभाव असून, सामान्यतः ती तमोगुणाची असत. तमोगुणाचे प्रतीक ‘शिव’ आहे. क्रोध हा त्यांचा अवगुण असून, शील सांभाळणे हे त्यांचे निजतत्त्व आहे. सत्त्व, रज व तम हे तीन गुण दुसर्याला प्रेरित करतात. ते एकदुसर्यास उपयोगी पडतात. कलियुगातील माणसे ही सामान्यतः वायुतत्त्वाच्या प्रभावाखाली असून, दया हा स्थायीभाव असतो व समता ही वृत्ती असते. वेडावाकडा विचार हा घात करतो. बिकट वाटेने जाण्याची प्रवृत्ती टाळणे गरजेचे असते.
ह्याप्रमाणे चारी युगांतील माणसे ही चार निरनिराळ्या वर्णांची असून, युगांप्रमाणे चारही महाभूतांचा त्या त्या युगात अंमल जास्त असतो. अशा प्रकारे संपूर्ण ब्रह्माण्डाची मूळ योजना असून, मानवी जीवनावर त्याचा आपापल्या गुणांनी परिणाम सतत होत असतो.
जीवनामध्ये आपण अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतो. जग हे कोणाही एकाचे, एका गटाचे, एका जातीचे, एका गुणाचे, एकाच शक्तीचे, एका तत्त्वाचे, एका विचाराचे, एका परिणामाचे नसून, अनेकविध गोष्टींनी जग भरलेले आहे. अनेक तर्हेची माणसे, त्यांची अनेक प्रकारची तर्हा, अनेक तर्हेचे स्वभाव, जीवनातील कार्यपद्धती, दैनंदिन जीवन व जीवनाची दिशा ही वेगवेगळी असते.
ब्रह्माण्डाच्या बिझनेस मॅनेजमेंटचा तक्ता
पंचमहा चार युगाचे निजतत्त्वाचा चार वर्णाचा
भूत तत्त्व यगु निजतत्त्व गुण वर्ण अवगुण
————————————————–
१. भूमी सत्य सत्य रज वैश्य लोभ
२. जल द्वापार विवेक सत्त्व ब्राह्मण व्यभिचार
३. अग्नी त्रेता शील तम क्षत्रिय क्रोध
४. वायू कली दया समता शूद्र आडवीचाल
ब्रह्माडातील मानवी जीवनाच्या नियंत्रण पद्धतींचा विचार करता असे लक्षात येईल, की पंचमहाभूतांचा, चारही युगांचा, प्रत्येक युगाच्या निजतत्त्वाचा, निजतत्त्वांच्या गुणांचा व चार वर्णांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे. ह्या प्रत्येकाचा अवगुण हादेखील लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजे मानवी जीवनावर याही सर्व घटकांचे प्रत्यक्ष परिणाम होतात व त्या घटकांचा माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो आणि म्हणूनच प्राक्तनाचा व पूर्वसंचिताचा, नशिबाचा, प्रारब्धाचा विचार करताना ह्या सर्वांचा अभ्यासपूर्वक विचार करणे जरूर आहे.
आपण ज्याला नशीब समजतो ते काय आहे?
जीवन हा विधात्याचा एक खेळ आहे. पूर्वजन्मी केलेल्या कृतीचा जीवन हा खेळ आहे. यातूनच आपल्या जीवनाची जन्मोजन्मीची कहाणी घडते. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाकडे जर आपण पाहिले तर आपल्या असे लक्षात येते, की आपल्यापेक्षा इतरांचे जीवन हे सुलभ व सुखी आहे. बर्याच वेळा असे लक्षात येते, की आपल्याला कमी काहीच नाही.
ब्रह्मांडाच्या ह्या खेळाचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल, की निरनिराळे जीव निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने जन्माला येतात आणि जन्माला आल्यापासून ते जीवन संपेपर्यंत आपापल्या योगाप्रमाणे आणि विचारसरणीप्रमाणे दैनंदिन जीवनक्रम घालवितात.
ज्या वेळी गर्भस्थापना होते त्याच वेळी जीव प्रस्थापित होतो. म्हणजे जो जीव विकसित होऊन जन्माला येणार आहे त्याच्या पूर्वसंचिताच्या कर्माचा पिंड तेथे प्रस्थापित होतो, हा अतिसूक्ष्म असतो… ज्याप्रमाणे आपण एखादे बीजारोपण करतो. उदा.- अंाब्याची कोय. ही कोय पेरल्यावर त्यातून एक रोपटे बाहेर येते. ते वाढत वाढत त्याचा वृक्ष होतो; पानाफुलांनी, फळांनी बहरून येतो. या नवीन झाडाच्या फळाची कोय रोवली की पुन्हा असाच प्रकार झाल्याचे आपल्या लक्षात येईल आणि विशेष म्हणजे नवीन झाडाची पाने, फुले, फळे- सर्व काही पहिल्या झाडासारखेच असते. म्हणजे ‘कोय’ जे ‘बीज’ आहे, त्या बीजामध्ये वृद्धिंगत झालेल्या झाडांच्या पानाफुलांची फळे, त्यांचा रस इत्यादी सर्व गोष्टींची सूक्ष्म रूपाने पिंडशक्ती प्रस्थापित झालेली असते. वास्तविक पाहता आंब्याचेदेखील कितीतरी प्रकार आहेत. पण कोयीमध्ये त्या त्या प्रकाराचे सूक्ष्म बीज आलेले असते. त्याचप्रमाणे जीवाच्या जीवनप्रवासात संचित झालेली चांगली-वाईट कर्मे ही अतिसूक्ष्म रीतीने त्या मानवी बीजामध्ये स्थित असतात.
हे मानवी बीज मातेच्या उदरात जन्म घेते, तर वनस्पती आदींचे बीज जमिनीत अंकुरते. जमिनीतील बीजांचा उत्पत्तिकाल हा अल्प असतो, परंतु मानवी जीवनाचे ‘बीज’ हे २७० दिवस घेते. २७० दिवसांत ते पूर्ण विकसित होऊन जन्म घेते. जन्मलेला बालक हा पुढे पालनपोषणाने विकसित होत होत माणूस म्हणून वावरू लागतो.
जे जन्माजन्माचे पूर्वसुकृत, पूर्वसंचित असेल, त्याचप्रमाणे हा जीव घडताना व घडलेला दिसतो. गर्भधारणेच्या वेळी प्रस्थापित झालेला पिंड हा त्याचे पूर्वसंचितांचे निर्देश देत असतो. हे सर्व समजण्याचे ज्ञान हे कुणालाच नसते. आजचे प्रगत वैद्यकीय शास्त्रदेखील ह्या संबंधात काहीच सांगू शकत नाही. मुळात गर्भधारणा झाली असावी, हा निष्कर्ष काही वैद्यकीय तपासणीने गर्भधारणेच्या काही कालावधीनंतर सांगू शकतात.परंतु त्या गर्भाच्या रंग, रूप, अंग, कांती, भाग्य आदीबद्दल ते काहीच सांगू शकत नाहीत. त्यांचे ते शास्त्रदेखील तेवढे प्रगत नाही आणि म्हणून ह्याविषयी वैद्यकीय व इतर मंडळींना हे कळणे व त्यांनी हे सांगणे केवळ अशक्य आहे. ते बर्याच वेळा चुकीचे सांगून समाजाची दिशाभूल करतात.
गर्भधारणेच्या वेळी प्रस्थापित झालेला पिंड हा त्याचे पूर्वसंचिताचे निर्देश देत असतो. ह्या संदर्भात सद्गुरूंच्या सान्निध्यात मी अनुभवलेला एक प्रसंग असा आहे. १९६७ साली माझी एकदा पत्नी आणि मी आमचे सद्गुरू योगाभ्यानंद व्यंकटनाथ यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. पत्नीने सद्गुरूंच्या पायांवर मस्तक टेकवून नमस्कार करताच महाराज म्हणाले, ‘‘बाळ, चार दिवसांचा गर्भ आहे. मुलगा जन्माला येणार आहे.’’ जन्माला येणार्या मुलाचे रंग, रूप, अंगकांती व त्याच्या भाग्याविषयी सांगितले व लिहून ठेवण्यास सांगितले. पुढे ज्या वेळी प्रसूती होईल त्या वेळी होणारे संभाषणदेखील सांगितले. काय आश्चर्य! जसे सांगितले तसेच घडले. नऊ महिन्या नंतर मुलगा जन्माला आला. सर्व काही सांगितले तसेच घडले. कोणत्या अनाकलनीय मानसिक पातळीवर त्या चार दिवसाच्या गर्भाचे आणि महाराजांचे संभाषण झाले, ह्याचे विवेचन हा एक स्वतंत्र विषय आहे. येथे एवढेच लक्षात घेणे जरुरीचे आहे, की योगी सत्पुरुष जे सहजतेने सांगू शकतात ते आज आधुनिक विज्ञानदेखील सांगू शकत नाही.
योगी लोक त्यांच्याजवळील अंतर्ज्ञानाच्या आधारावर मानवाला न समजणारी अशक्यप्राय गोष्टदेखील सहजतेने सांगून जातात. या मुलीची गर्भधारणा होऊन चार दिवस झाले, वगैरे गोष्टी गर्भात प्रस्थापित झालेल्या पिंडावरूनच तर त्यांनी सांगितल्या. चार दिवसांचा गर्भ काय बोलू शकतो? चार दिवसांचा गर्भ हा वैद्यकीयदृष्ट्या पाहिले तर तो गर्भ आहे हे समजण्याच्या स्थितीतदेखील नसतो. कोणत्याही दृष्टीने तो विकसित झालेला नसतो. त्याचे सद्यजीवन हे सुरूच व्हायचे असते. अशा परिस्थितीत तो जीव जे काही सांगतो हे त्याच्या पूर्वजन्माचेच नसते का? म्हणजे स्थापित पिंडावरून किंवा झालेल्या गर्भधारणेवरून स्थापित झालेल्या जीवाने आपली माहिती योगी सत्पुरुषाला सांगितली. म्हणजेच पिंडरूपाने स्थापित झालेला जीव आपली कहाणी सत्प्ारुषाला, योग्याला सांगतो, म्हणजेच जीव हा पूर्वसंचित घेऊनच जन्माला येतो, असेच म्हणावे लागेल.
**********************************************************
ज्याप्रमाणे सूर्यापासून निघालेली किरणं सर्वत्र प्रकाशमान होतात, त्याप्रमाणे नरेंद्रनाथांनी आपल्या गुरूपासून प्राप्त केलेल्या दैदिप्यमान स्वयंसिद्ध मंत्रांचा ज्यांनी संकल्प केला त्यांच्या जीवनावर यथायोग्य संकल्पित परिणाम करू लागले. जप, तप, अनुष्ठान व हवन यांचा गुरुंनी सांगितल्याप्रमाणे मंत्राचा विनियोग करून समाजातील कोणताही घटक आपल्या व्यावहारिक, प्रापंचिक समस्या जीवनामध्ये वारंवार येणारे अपयश, मनाची अस्थिरता, अशांतता, घबराहट किंवा आत्मविेशासाची कमतरता या सर्वांवर प्रभावीपणे उपाय योजना आश्रमाच्या माध्यमातून होणार्या हवनाद्वारे होऊ लागली.
*********************************************************