नाथपंथाचे महत्त्व व वैशिष्ट्‌य काय

सृष्टिरचनेचे कार्य झाल्यावर ब्रह्मदेवाने प्रत्येक युगप्रमुखाला बोलावून आपआपल्या युगाची महती काय व ते कसे असतील हे वर्णन करण्यास, एकेकाला पाचारण केल्यावर चारही युगे कशी असतील? व सृष्टी रचनेतील दोष लक्षांत आल्यावर हे प्रामुख्याने लक्षांत आले की कलियुगांतील जनजीवनात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सृष्टी रचना होवून गेली होती त्यामुळे कलियुगाची जी घडण झाली तिच्यामध्ये बदल करणे शक्य नव्हते म्हणून ब्रम्हा, विष्णु व महेश ह्यांनी मिळून त्यावर तोडगा काढण्यासाठी सृष्टी रचनेतल्या महत्त्वाच्या शाक्ति ज्या नवनारायणांच्या रूपाने ब्रम्हांडात वावरत होत्या त्यांच्या आधाराने कलियुगाच्या घटनेत बदल करण्याचा प्रयत्न केला. युगपरिवर्तन हे शक्य नाही म्हणून असा आटापिटा केला तरी तो विशेष स्थित्यंतर करू शकला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणजे तसं पाहिलं तर नाथपंथाची योजना ही युगनिर्मितीचाच एक अविभाज्य भाग असे समजण्यास हरकत नाही. त्यामुळे जेवढे कलियुगाला महत्त्व आहे तेवढेच महत्त्व नाथपंथाला आहे. ह्या नाथपंथामुळेच चारही युगांना आधार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे कलियुगाचा इतर युगांबरोबर समतोल राखण्यास मदत झाली आहे.

नाथपंथाचं वैशिष्ट्‌य हे आहे की ज्यांचा त्रिभूवनाला आधार आहे अशा नवनारायणांनी ह्या पंथाची सुरवात केली आहे. सृष्टी निर्मात्यांनीच हा पंथ सुरू केला आहे.त्यांनी पंथ पद्धती लावून दिल्या आहेत.जे देवादिकांना, अध्यात्मिक गुरूंना, मार्गदर्शन करतात त्यांनी स्वतः नाथपंथाची धुरा हाती घेतली. पंथाचे नियम, सिद्धांत, सिद्धता, उपचार पद्धती, देवदेवतांची अबाधित आश्वासने व फलश्रुती आदिंमुळे हा एक प्रभावशाली सिद्ध व शिस्तबद्ध पंथ झाला आहे. भूतप्रेत पिशाश्च, डाकिणी, शंखिणी, यक्षिणी आदि सर्वच शाक्ति नाथपंथियांना वश होत्या.ह्या शिवाय संपूर्ण ब्रम्हांडावर त्यंाचे अधिपत्य होते. त्यामुळे तो कडक व शिस्तबध्द पंथ आहे. येथे केवळ गुरूपरंपराच कार्य करते. प्रत्येक कार्यकर्त्याला गुरूंच्याच सान्नीध्यात,सेवेत व शिस्तित रहावे लागते. गुरू हे सजीव स्वरूपातच असावेत. गुरू कृपेने, सेवेने, सान्नीध्याने व गुरू इच्छेनेच पंथ कार्य होते. कार्यावर परमगुरूंचे नियंत्रण सततच असते. गुरूंनी सांगितलेल्या कर्मकांडाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण पंथाच नियंत्रण पाठीशी असते, त्यामुळे कर्माची फलश्रृती देखील त्वरीत असते.केवळ अशक्य वाटणार्‍या गोष्टी देखील सहज साध्य होतांना दिसतात.

माणसाच्या जीवनातील आधिदैविक, आधिभौतिक, अध्यत्मिक हे त्रिविधताप नाथपंथाच्या सिध्दतेनुसार सहजतेने घालविता येतात. जन्मतः कुंडलीत असलेले हरतर्‍हेचे ग्रहदोष, अरिष्ट तिथी, वार, नक्षत्र दोष वा अन्य प्रकारचे कोणतेही दोष, प्रत्यक्षपणे जीवनात भोगत असलेले हरतर्‍हेचे दोष घालविण्याचे सामर्थ्य ह्या पंथामध्ये आहे. शरीरात उत्पन्न झालेले साध्य, असाध्य हर तर्‍हेचे रोग, पीडा आदी घालविण्याचे सामर्थ्य या पंथात आहे. मृत्यु, अपमृत्यु घालविण्याचे, दीर्घायुरोग्य देणे, अपमृत्यू वा मृत्यूवर विजय मिळविणे हे या पंथीयांना सहज साध्य आहे. कोणालाही असणारे शत्रू, गुप्तशत्रू, हितशत्रू, मित्ररूप शत्रू, व्यवसायीक शत्रू, ज्ञात असलेले अज्ञात असलेले, दूरून

 त्रास देत असलेल्या सर्वच प्रकारच्या शत्रूंचे निवारण नाथपंथीय करू शकतात. जे तंत्रमंत्र, जारणमारण, परविद्या आदिंचा उपयोग करून त्रास देतात त्यावर प्रभावि उपाय हा पंथ करू शाकतो. सर्व तर्‍हेच्या कृत्यांमध्ये, विद्यार्जना मध्ये, कार्यामध्ये जो बाधा निर्माण करतो त्यापासून नाथपंथीय लोक बाधामुक्त करू शकतात. सर्व प्रकारच्या व्यवहारिक, व्यावसायिक उन्नती, तथा अध्यात्मिक उन्नतीत जो विघ्ने निर्माण करतो तो त्रास सहजतेने दूर करता येतो. मनस्थैर्य, सामाजीक स्थैर्य, जीवन स्थैर्य अध्यात्मिक उन्नती ते सहजतेने साध्य करून देवू शकतात. आपल्या कुलामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही बाधा कोणी निर्माण करत असेल तर त्यापासून हे निवृत्ती देवू शकतात. सर्व प्रकारचे पितृदोष, कालसर्पदोष, ग्रहग्रहण दोष, चांडाल दोष, वा अन्य कोणत्याही प्रकारचे दोष नाथ पंथिय दूर करू शकतात. विवाह आदी मंगल कार्ये तथा यश, कीर्ती, विपूल धनधान्य हा पंथ देवू शकतो. हर पृकारचे वास्तुदोष दूर करून सुखनिवास, स्वर्निवास हा पंथ देवू शकतो. परस्पर मतऐक्य, सुसंवाद, मैत्रीप्रवण संबंध घरातील व इतर कोणाशीही प्रस्थापित करून देवू शकतात. असे काहीच नाही की जे जीवनात कुणाला आवश्यक आहे आणि ते हा पंथ देवू शकत नाही. फक्त्त त्याला योग्य कर्माची जोड पाहीजे. कोणते योग्य कर्म केले असता हे प्राप्त होवू शकते हे आपल्याला त्यांच्या कडूनच समजू शकते.

नवनाथांच्या संपूर्ण ग्रंथावरून लक्षांत येईल की प्रत्येक’ नाथमहाराजांची वस्ती ही रानावनात नव्हती,जंगलात नव्हती, ते कोणत्यातरी गांवाच्या, वसाहतीच्या सिमेला गुहेत किंवा आडजागेत रहात असत. तेथेच आपला नित्यकर्मविधी ते करीत असत. त्यांचे सर्व कार्य हे समाजात व समाजासाठीच होत. त्यामुळे ते लोकांपासून दूर राहिलेच नाहीत.

या सर्व गोष्टींवरून नाथपंथाचे महत्त्व व वैशिष्ट्‌य लक्षात येईल.

 

 ***************************

 जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसर्‍याचे, असा भेदभाव मानीत नाही, सर्व पदार्थांमध्ये सम स्वरुप अशा परमात्म्याला पाहत असतो व त्यामुळे शांत राहतो, तो भगवंताचा उत्तम भक्त होय ही धारणा सत्य, त्रेता व द्वापार युगातील लोकांची होती.

 ***************************


Leave a Reply