☼ नक्षत्रांचे महत्त्व ☼
जन्मनक्षत्र हे प्रत्येकाच्या जीवनात प्रभावाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. ग्रहांना जसे महत्त्व आहे तसेच नक्षत्रांनाही महत्त्व आहे. मुळात रास ही जन्मनक्षत्राप्रमाणेच ठरते. आपल्या जन्मनक्षत्राचा मंत्र रोज जपल्याने दु:खकष्टाचे निवारण होण्यास, ज्ञान मिळण्यास खूपच मदत मिळते.२७ नक्षत्रांची माहिती आपण लक्षात घेऊ.
सूर्याचे मासवार राशिचक्र
१. अश्विनी : ह्या नक्षत्राचे हे परंपरागत चिन्ह आहे. हे घोड्याच्या डोक्याच्या आकारासारखे असते. राशीच्या चित्राची ही सुरवात आहे. याचा आकार गर्भाशयासारखा दिसतो. हे नक्षत्र बौद्धिक गुणांचे, मानी, चपळ, चंचल, उष्णप्रकृती, सडपातळ बांधा व नेतृत्वगुणाचे नक्षत्र आहे.
२. भरणी :आपमतलबी व योनीच्या आकारासारखा याचा आकार आहे. हे नक्षत्र स्वार्थी,जन्म, मृत्यू व स्थित्यंतर दर्शविणारे हे नक्षत्र आहे. परावलंबी असते.
३. कृत्तिका : तीक्ष्ण धार असलेले हत्यार- ज्याने काहीही कापता येते किंवा वेल्डिंगच्या वेळी कापल्या जाणार्या ज्योतीप्रमाणे हे दिसते. कृत्तिका नक्षत्र चिडखोर, तामसी स्वभावाचे, तीव्र गुणाचे नक्षत्र, उष्ण प्रकृती, मूळव्याध, रक्तस्राव, अग्नी व शरीरपीडा आणि अपघात निर्माण करणारे, गर्विष्ठ, उग्र, साहसी व हट्टी आहे
४. रोहिणी : हे भौतिकवादी नक्षत्र आहे. फुलाच्या चार पाकळ्यांसारखे हे दिसते. विपूलता, स्थैर्य व सुपीकतेचे हे द्योतक आहे. हे नक्षत्र उत्तम सौंदर्य, गौर व आकर्षक व्यक्तिमत्त्व, कलावंत, हौशी, विलासप्रिय, स्त्रीप्रिय, शुद्ध व स्वच्छ मनाचे आहे.
५. मृगशीर्ष : हरणाच्या शिंगासारखे, दारूच्या पेल्यासारखे हे दिसते. मृगशीर्ष वृषभ राशी विभागात असताना सामान्य गुणाचा तर मिथुन राशी विभागात असताना बौद्धिक क्षेत्रात प्रावीण्य देणारा व भोगासक्त आहे.
६. आर्द्रा : हे दिसायला हिर्यासारखे किंवा पावसाच्या थेंबासारखे दिसते. विविध गोंधळातून किंवा त्रासातून मुक्त होणे किंवा विकासाचे हे द्योतक आहे. उग्र गुणांचे, चंचल, क्रोधी व संशयी नक्षत्र आहे.
७. पूनर्वसू : पून्हा चांगले होणे, पुनर्वत होणे, पूर्ववत होणे हे ह्याचे वैशिष्ट्य आहे. गोलाकार बाणांच्या आकारासारखे हे दिसते. पूनर्वसू नक्षत्र शास्त्रविद्या, कलापारंगतता, सत्त्वगुण, सज्जन, लोकप्रिय गुणांचे आहे.
८. पूष्य : दया, क्षमा, शांतीचे हे प्रतीक आहे. कमळफुलाच्या आत दिसणारा चंद्र वा नारळासारखे दिसते. पूष्य नक्षत्र हे परोपकारी, प्रसिद्ध, ईश्वरभक्त, ग्रंथकर्ता, विचारी व उत्तम गुणाचे नक्षत्र आहे.
९. आश्लेषा : स्प्रिंगसारखे किंवा एकात एक गुंतलेल्या साखळीसारखे दिसते. उपजत बुद्धी वा आंतरिक ज्ञानाचे हे द्योतक आहे. आश्लेषा नक्षत्र हे संकटे व व्याधी उत्पन्न करणारे, तीव्र व दुष्ट गुणाचे, अविचारी, हट्टी चोर, फसवे, लबाड, नीतिभ्रष्ट व हानिकारक नक्षत्र आहे.
१०. मघा : मुकुटाला तीन टोके असावे असे दिसते. सिंहाचे गुणधर्म बाणणारा स्वाभिमानी, जबरदस्त, कर्तव्यरत, विजय संपादणारे हे नक्षत्र आहे. महत्त्वाकांक्षी, अधिकाराची हौस, कर्तृत्ववान, मानी, स्वावलंबी व भोगी असे हे नक्षत्र आहे.
११. पूर्वाफाल्गुनी : सुख-शांती, आल्हाद, आनंद, अभिमान वाटावे असे हे नक्षत्र आहे. ताणरहित भौतिक आनंद देणारे हे नक्षत्र आहे. श्रद्धावान, पैसा, ऐश्वर्याची आवड, व्यापारी व कलाभिरुची असणारे नक्षत्र आहे.
१२. उत्तराफाल्गुनी : हेदेखील सुख-शांती, आल्हाद, आनंद, अभिमान वाटावे असे नक्षत्र आहे, परंतु ह्यामध्ये विद्वत्तेला महत्त्व आहे. सूर्यासारखे तळपत येणारे हे नक्षत्र आहे.
१३. हस्त : माणसाच्या हातासारखे हे दिसते. हस्तकला वा हाताच्या साहाय्याने घडणार्या कलांचे, तसेच कार्याचे हे द्योतक आहे. सुस्वभावी, ईश्वरभक्त, विद्वान, ग्रंथकर्ता, वक्ता, सुखी, शांत, धनवान गुणाचे नक्षत्र आहे.
१४. चित्रा : तारा, हिर्यासारखे दिसणारे हे नक्षत्र एखाद्या कलाकारासारखे, नवनवीन विचारांचे, नवीन गोष्टी करण्याचे, तसेच नवीन कल्पना व नवीन नमुने तयार करणारे हे नक्षत्र आहे. उग्र गुणाचे, वस्त्र, फुलांची आवड, विषयासक्त, कलावंत, गणितप्रवीण, हरहुन्नरी गुणाचे नक्षत्र.
१५. स्वाती : तलवारीसारखे दिसणारे हे नक्षत्र आहे. विरोधी गती समतोल करणारे हे चित्र दिसते. हे सामावून घेणारे, लवचिक व धूर्त स्वभावाचे नक्षत्र आहे. तूळ राशीच्या गुणधर्माचे असल्यास हा भाग शांतताप्रिय, आनंदी, ईश्वरभक्त, संयमी, नीतिमान व सत्यप्रिय गुणाचे आहे.
१६. विशाखा : वेदना होतील एवढा त्याग करणारा, एककल्ली, एखादे ध्येय धरून बसणार्या स्वभावाचे हे नक्षत्र आहे. पूर्णत्वाला जाऊ इच्छिणारे, परंतु अपूर्ण असणारे हे नक्षत्र आहे. विशाखा नक्षत्र हे लोभी, घातकी, कलहप्रिय, क्षुद्र वृत्तीचे, तीक्ष्ण, घातक, विषारी नक्षत्र आहे.
१७. अनुराधा : विशाखाच्या त्यागानंतर अनुराधा आहे. म्हणजे नंतर येणारे यश हे अनुराधाचे आहे.सखोल विचार, ज्योतिषशास्त्र व प्रवास हे ह्या नक्षत्राचे वैशिष्ट्य आहे. विशाखाची संकुचित दृष्टी ही नक्षत्राने विस्तृत होते. धनवान, गोड बोलणारा, वस्त्रप्रिय, विषयासक्त, दागदागिन्यांची आवड, सांसारिक व सद्गुणी नक्षत्र आहे.
१८. ज्येष्ठा : म्हणजे वडील हे नक्षत्र वरिष्ठता व प्रभुत्त्व दर्शविते. चित्रामध्ये दिसणार्या तीन रेघा हे भूत, वर्तमान व भविष्याचे द्योतक आहे. तीव्र, घातक, खुनशी, हट्टी, सूड घेणारा, गुप्त कारस्थाने करणारा, शूर, उपद्व्यापी, अल्पमित्र असून गुह्येंद्रियांना पीडा करणारे आहे.
१९. मूळ नक्षत्र : कोणत्याही गोष्टीचे मूळ हा ह्याचा अर्थ. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा स्वभाव. औषधीनिर्मितीची आवड दर्शविते. मूळ हे राजकारणी, प्रतापी, महत्त्वाकांक्षी, तेजस्वी, गर्विष्ठ व कर्तृत्ववान नक्षत्र आहे. हे अपघात, अग्नी व शस्त्रभय, हाडांस दुखापत दर्शविते.
२०. पूर्वाषाढा : आनंदी, उत्साही व सौंदर्यात रस घेणारे हे नक्षत्र आहे.आगलावेपणा, शांत करणे, कलेचा उपभोग घेणे वा स्वत:चा चेहरा लपविणे हे वैशिष्ट्य आहे. सुखी, धनवान, ऐश्वर्ययुक्त, संथ प्रवृत्तीचे हे नक्षत्र.
२१. उत्तराषाढा : सत्य, इच्छाशक्ती, मनाचा पक्केपणा असे विविध गुण आहेत. उगवत्या सूर्यासारखे हे दिसते. सुखकर्ता दुखहर्ता आहे. विद्वान, नम्र, धार्मिक, मध्य गुणाचे हे नक्षत्र.
२२. श्रवण : सदाचारसंपन्न, ईश्वरभक्त, विद्वान, उत्तम गुणाचे नक्षत्र.
२३. धनिष्ठा : दुष्टगुण नक्षत्र, हिंसक, निर्लज्ज, शूर, अविचारी, पराक्रमी, पण उथळ व दुष्ट.
२४. शततारका : कल्पक, धूर्त, विषयासक्त, व्यसनी, सौंदर्य पण बुद्धि कमी.
२५. पूर्वाभाद्रपदा : विद्याव्यासंगी, शोधक, शास्त्रज्ञ, चतुर, धूर्त, निपुण.
२६. उत्तराभाद्रपदा : अस्थिर, भाषाचतुर, विद्वान, गौरवर्ण, अल्प केसांचा.
२७. रेवती : धनवान, बुद्धिवान, निःस्वार्थी, सत्कर्म करणारा,सत्यप्रिय.
नक्षत्र योनी
सर्व नक्षत्रांच्या मिळून १४ योनी आहेत. त्या व त्यांचे गुणधर्म
१. घोडा :स्वभाव उमदा असून, त्याच्यामध्ये वेग असतो, स्वामिनिष्ठा, कार्यतत्परता, शौर्य आढळते.
२. कुत्रा : स्वामिनिष्ठ असून मालकाबरोबर कुठेही जाऊ शकतो, कुत्रे वासाने मार्ग शोधतात.
३. मांजर : क्रौर्य, भटकेपणा, एकलकोंडेपणा, स्वार्थी वृत्ती, राहते घर सोडून जाण्यास तयार नसते. कुत्र्यामांजरामध्ये स्वजन विरोध असतो.
४. सर्प : सूडबुद्धी असून संधिसाधूपणा असतो.
५. हत्ती : दिलदार, उदार व दीर्घद्वेषी असतो.
६. हरिण : चपल, राहत्या घरावर विशेष प्रेम करणारे असते. कळप करून राहते.
७. वानर : खोडकर, अस्थिर व भटके.
८. वाघ : क्रौर्य, लपवाछपवी, साहस असते.
९. सिंह : औदार्य, अधिकार, सत्ताभिलाषा असते.
१०. गाय : ममताळूपणा व स्वामिनिष्ठ असून, वात्सल्य व स्वच्छता.
११. मेंढा : धडक मारण्याची वृत्ती, अविचार, गतानुगतित्व.
१२. म्हैस : आळशी, गलिच्छपणा.
१३. उंदीर : वृत्तीने विध्वंसक व भेकड असतो.
१४. मुंगूस : चपळ असून भित्रे असते.
नक्षत्रमंत्र
आपल्या जन्मनक्षत्र मंत्राची एकूण जपसंख्या जीवनामध्ये एकदा तरी पूर्ण करावी. नंतर रोज निदान १०८ वेळा तरी आपला जन्मनक्षत्र मंत्र म्हणावा.
नक्षत्र मंत्र जप संख्या
This portion is not available in this Free E-Book. Please contact Nath Shakti Peeth for details.
जन्मनक्षत्र व त्रासदायक योग
खालील ६ नक्षत्रांवर जन्मलेल्या बालकांचे कसे त्रासदायक योग असतात हे लक्षात येईल. प्रत्येक नक्षत्राला ४ चरण असतात. प्रत्येक नक्षत्राचा परिणाम हा भिन्न आहे. पंचमहाभूतांत असलेल्या नक्षत्राचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत असतो, हे दाखविण्यासाठी ही सर्व माहिती दिली आहे.
नक्षत्र चरण जीवनावर परिणाम
१. अश्विनी १ वडिलांना त्रास होतो.
२ मूल ऐश्वर्यवान होते.
३ उच्चपदाची प्राप्ती होते.
४ राजकीय सन्मान मिळतो.
२. आश्लेषा १ बालकासाठी शुभ फल देणारे.
२ बालकाची धनहानी.
३ आईस व सासूस कष्टकारी
४ वडिलांना कष्टदायक.
३. मघा १ आईस कष्ट व दु:ख.
२ वडिलांना दु:खदायक.
३ सुखसमृद्धी.
४ शुभफलदायी.
४. ज्येष्ठा १ मोठ्या भावास कष्ट.
२ लहान भावास कष्ट.
३ आईस दु:खदायक.
४ आत्मघात, स्वत:स कष्ट, दु:ख.
५. मूळ १ वडील, सासरा यांना दु:ख.
२ आईस दु:खदायक.
३ बालकाला धनहानी.
४ बालकास सुखदायक.
६. रेवती १ पराक्रमात वृद्धी.
२ राज्यद्वारा सुखप्राप्ती.
३ बालकास सुखदायक.
४अनेक प्रकारचे कष्ट, दु:ख, आर्थिक,शारीरिक, मानसिक क्लेश.