☼ दुसर्या आवृत्तीच्या निमित्ताने ☼
प्रथमावृत्ती १५-१-२०११ रोजी काढली होती. अवघ्या ४-५ महिन्यातच पहिली आवृत्ती संपली. ८-२-२०११ रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे झाला होता. प्रकाशन समारंभाला डॉ रघुनाथ शुक्ल अध्यक्ष म्हणून लाभले होते, तर ‘प्रसाद’ मासिकाचे मुख्य संपादक मनोहर उपाख्य बापुसाहेब जोशी यांच्या हस्ते ‘हा खेळ प्राक्तनाचा कि पूर्वसंचिताचा’ याचे प्रकाशन झाले. आपल्या भाषणातून बोलतांना बापूसाहेब जोशी म्हणाले, की जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की जी पूर्ण दुःखात आहे. प्रत्येकाचे जीवन हे सुख दुःखाने भरले आहे. आज पर्यंतची हीच धारणा होती की आपले प्रारब्ध बदलू शकत नाही.
माझ्या जीवनांत नरेंद्रनाथमहाराज ही दुसरी व्यक्ती आहे की ज्यांनी लोकांचे भाग्य बदलवून त्यांचे जीवन बदलले. मला फार पूर्वी एक व्यक्ती भेटली होती की जिला अथर्वणऋषींनी स्वतःदर्शन देऊन हवनाच्या माध्यमातून भाग्याचे पुनरूज्जीवन करण्याची प्रक्रिया सांगितली होती. आज अकोल्याच्या नाथशक्तिपीठाचे नरेंद्रनाथमहाराज हवनादि विधीच्या माध्यमातून तेच कार्य करीत आहेत. हे तर केवळ असामान्य ईेशरी कार्य आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अनेक लोकांचे प्रशंसापर फोन आले. प्रकाशनानंतर नाथशक्ती पीठात येणार्या लोकांचा ओघ बराच वाढला आहे. पुस्तकांमध्ये वर्णन केलेल्या पुजांचा लाभ सतत घेतला जात आहे. बरेच लोक, पुस्तकांत सांगितलेले प्रयोग-उपासना, घरी बसून करीत आहेत व आनंद घेत आहेत. अनेकांच्या मागणी वरून हिंदी भाषांतर झाले आहे व इंग्रजी भाषेतून भाषांतरीत पुस्तक काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ब्रह्मांडातील मानवी जीवनाची सप्तवर्गीय नियंत्रण योजना, पुस्तकांत वर्णन केलेली आहे त्यातील,युग, ब्रह्मांड व पंच महाभूतांशी निगडीत असलेला नाथपंथा विषयी सखोल माहिती देणारा नव नाथ बोधामृत हा ग्रंथ लवकरच प्रकाशीत करीत आहे. हा ग्रंथ देखील वाचकाला मार्गदर्शक ठरेल. आज ‘हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा’ यापुस्तकांची दुसरी आवृत्ती काढतांना आनंद होत आहे.
लेखक – नरेंद्र चौधरी
कर्कसंक्रमण, १६-०७-२०११ नाथशक्तिपीठ अकोला