☼ आपले प्रारब्ध काय आहे? ☼
जीवाचा भोग, प्रारब्ध प्रारब्ध ह्याचा अर्थ जे जन्मोजन्मीचे संचित कर्मफळ आहे ते. गर्भ ज्या वेळी प्रस्थापित होतो त्याच वेळी त्या गर्भात सूक्ष्मरूपाने पिंड असतो. जे गुणदोष, सुख, शांती, समाधान, कष्टप्रद जीवन आदी योग आई-वडिलांचे असतात. तेच व तेवढेच योग बालकांचे असतात असे नाही, तर त्यांचे जे जन्मोजन्मीचे संचित कर्मफळ आहे त्याप्रमाणे ते प्रस्थापित होते.
आपल्या जीवनातल्या आपल्या चित्तवृत्ती- प्रवृत्तीमध्ये बदल करणे हे सोपे नाही, किंबहुना ते तर केवळ अशक्यच आहे. आपले योग, भोग, प्रारब्ध बदलणे हे केवळ अशक्य आहे. जे योग, भोग आपल्या वाट्याला आले आहेत ते भोगावेच लागतात. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात ‘काय करणार, हेच तर माझं नशीब आहे. माझं हे नशीब बदलणं शक्य नाही. काय करणार, माझा हा जन्म असाच जाणार,’ असे म्हणत राहतो.
सुरवातीला सांगितल्याप्रमाणे वाल्या कोळ्याचा जीवनप्रवाह प्रारब्धाप्रमाणे सुरू झाला होता. त्रिकालज्ञानी ब्रह्मर्षी नारदमुनी मध्ये पडले आणि स्वत:हून ब्राह्मणाचा वेष घेऊन वाल्या कोळ्याला त्याचे पूर्वसंचित लक्षात घेऊन त्याला भेटून, त्याला विवेक आणि ज्ञान दिले आणि पुढील कुकर्मापासून वाचविले. एवढेच नाही, तर त्याच्यावर कृपा करून त्याला आत्मज्ञानी केले आणि अलौकिक कार्य त्याच्याकडून करवून घेतले. हा त्याचा दैवयोग होता.
माणसाचे असले योग, भोग सहसा टळत नाहीत. ‘प्रारब्ध माझे सहसा टळेना’ ह्याची अनुभूती प्रत्येक जण घेत असतो. तो आपले दुःख वा भोग दाखवीत नाही, पण मनाने त्यातच तो गुरफटलेला असतो. यातून त्याला बाहेर पडता येत नाही. त्याचे दैनंदिन जीवन त्या प्रारब्धासह सुरू असते आणि त्यानुसारच ते संपते.
माणसाचे आचारविचार, स्वभाव, योग, भोग- हे सर्व त्याने केलेल्या पूर्वजन्मीच्या कृतींशी, कर्मांशी प्रत्यक्षरीत्या संबंधित असतात. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी तर म्हटलेच आहे की, ‘अनंत जन्मींचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे| मुख्य परमात्मा आतुडे तद्नंतरे|’ म्हणजे ह्याच एका जन्मातल्या आपल्या कृतींनी वा कर्मांनी आपले पूर्वसंचित तथा पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलणे शक्यच नाही. आपले आचारविचार, स्वभाव आदी बदलणे अतिशय धीम्या गतीने होत असून, अनेक जन्म घालविल्यानंतर आपल्या आचारविचार, प्रारब्धात बदल होऊ शकेल. आपण कल्पना करतो व अपेक्षा बाळगतो, की ह्याच जन्मात आपण हर प्रयत्न करून सर्वकाही बदलून टाकू. पण हे केवळ अशक्य आहे. आपली विचारसरणी, आपले आचार, आपली स्वाभाविक प्रवृत्ती हे कितीही प्रयत्न केले तरी एका जन्मात बदलू शकत नाहीत. स्वभावात बदल होत नाही. विचारांत बदल होत नाही म्हणून तर जीवनात अनेक वेळा अप्रिय घटना घडतात. आपल्या विकासाला मर्यादा येतात. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच प्रत्येक जन्मात थोडा थोडा बदल होत होत केव्हातरी तो जीव पूर्णपणे सदाचारी, सद्प्रवृत्त, सात्त्विक, अध्यात्मप्रवण असा पुण्यात्मा जन्माला येतो. म्हणजेच अनेक जन्मांचे सुकृत जमा करीत करीत केव्हातरी असा माणूस जन्माला येऊ शकतो. त्यानंतर तो जसे प्रयत्न करेल त्याप्रमाणे त्याला ईश्वरी कृपेचा परमलाभ घेता येईल. ‘ह्याचि देहीं ह्याचि डोळां, झालो मी परमेश्वर वेडावल्हाळा,’ हे तर केवळ अशक्य आहे. समाजामध्ये अनेक लोक स्वत:ला आध्यात्मिक, सामर्थ्यसंपन्न भासवितात. अनेक प्रकारचे चमत्कार करून दाखवितात. पण ही मंडळी पूर्णपणे सदाचारी, सद्प्रवृत्त, सात्त्विक, अध्यात्मप्रवण असा पुण्यात्मा घडवू शकत नाहीत. मानवी जीवनात आपले शरीर तथा आपले मन हे दिनप्रतिदिन कसे विकसित होते, कसे घडते, कशामुळे घडते किंवा बिघडते, हे आपल्याला कळतही नाही. दिनप्रतिदिन करीत करीत आपला जीव देहत्यागापर्यंत कसा पोचला, आपल्या जिवात काय परिवर्तन झाले, हे आपलेच आपल्याला कळतदेखील नाही. केवळ भौतिक प्रगती व भौतिक आनंदावरच आपण आपल्या जीवनाचे मूल्यमापन करतो.
आयुष्यभर आपला समज हाच राहतो, की मी माझ्या जीवनाला आकार देतो, मी प्रयत्न करून ते घडवितो. माझ्या जीवनात होणारे सर्व बदल मीच करतो. पण माझे शरीर कसे चालते? कोणाच्या सत्तेने चालते? कोणाच्या प्रभावाखाली ते सतत असते? कोणत्या तरी अज्ञात प्रभावाच्या आपल्यावर होणार्या परिणामाप्रमाणेच ते चालते, ह्याचा आपण कधी विचारही करीत नाही. तुकाराम महाराज ह्या बाबतीत म्हणतात, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्तें, कोण बोलविते हरीविण | देखवी, दाखवी एक नारायण | तयाचे भजन चुको नये|’ आजच्याही विद्वज्जनांना न सुटणारी कोडी तुकाराम महाराजांनी अति सहजतेने सोडविली आहेत. पण आपल्याला वाटणार्या आजच्या प्रगत युगात आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. आपल्याला त्याचे एवढे महत्त्व वाटत नाही. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फारच भौतिक झाला आहे. आध्यात्मिक पद्धतीने आपले जीवन सुसह्य होऊ शकते, हे आपण सहजतेने विसरायला तयार आहोत. जीवाचा त्याग करेपर्यंत मानसिक समाधान, आत्मिक समाधान मिळण्यासाठी जीव नुसता तडफडत असतो; पण ते न मिळताच आयुष्याचा कालावधी संपतो. ह्याची जाणीव ही ज्याची त्यालाच असते. इतर लोक निर्वाणानंतर त्याचे केवळ गुणगान करीत असतात.
आपल्या जीवनात अनेक तर्हेच्या प्रारब्धाचे, भोगाचे अनुभव आपण सहजतेने घेतो. आपल्याला बर्याच वेळा ह्या गोष्टी कळतात, जाणवतात, परंतु त्याचा योग्य अर्थ काढायला आपण पुरेसा वेळ देत नाही, विचार करीत नाही व समजून घेण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करीत नाही किंवा बर्याच वेळा काय उपाय करावे, हे कळतच नाही. शेवटी हा आपला योग, हेच आपले नशीब, हेच माझे प्रारब्ध- जे कधी बदलणार नाही, असे मानून आपण ह्या बाबतीत निष्क्रिय होतो. अशा काही गोष्टींचा उल्लेख पूढे करीत आहे :-
जीवनातील नैराश्य :-जीवनामध्ये घडणार्या घटना आपल्याला पूर्वजन्मीच्या कृत्याबद्दल सुचवीत असतात. आपण जीवनभर काही ना काही करीतच असतो. ज्या वेळी आपल्याला काही करण्याची इच्छा होते त्या वेळी आपण त्या दृष्टीने प्रयत्न करीत राहतो. आपले शिक्षण, आपला अनुभव, आपल्या भोवतालचे वातावरण, आपले निष्कर्ष, हे सगळे लक्षात घेऊन आपण आपले प्रयत्न विवेकबुद्धी जागृत ठेवून करीत असतो. पण हे करीत असताना आपल्याला असे लक्षात, येते की प्रयत्नांची दिशा योग्य आहे, पद्धत योग्य आहे, सर्व काही योग्य आहे, पण ती गोष्ट साध्य होण्यास काही ना काही अडचणी सतत येत राहतात, आणि परिणामतः उद्दिष्ट साधण्यास विलंब होतो. आपली बुद्धी कुंठित होते आणि काय करावे काहीच कळत नाही, काय चुकले काहीच कळत नाही. मनातील संभ्रम वाढत राहतो. वाढता वाढता आपले हे दैवी योग आहेत, कधी टळणारच नाहीत असे आपले हे भोग, असेच हे योग आहेत, अशीच समजूत होऊन हळूहळू समोरच्या व्यक्तीचा विनाकारण आपल्याबद्दल गैरसमज होतो. मनामध्ये नैराश्याचे किंवा नकारात्मक विचारांचे थैमान माजू लागते आणि सरळ होणारी गोष्टही बिकट होऊन बसते. मार्ग सापडत नाही. तेच सम परिस्थितीतील काहींना ते सहजसाध्य होते. त्यांचा आत्मविश्वास वाढत राहतो आणि नकारात्मक विचार जाऊन त्यांचा आत्मविश्वासबळावतो. ज्यांचा नकारात्मक विचार असतो त्यांचा आत्मविश्वास एवढा ओसरतो, की जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव लक्षात येतो. हा आत्मविश्वास कोणत्याही औषधोपचारांनी किंवा मानसिक उपायांनी वाढवून आणि टिकून राहू शकत नाही. त्याचे पूर्वसुकृतच असे असते, की काही केल्या त्याचा आत्मविश्वास टिकून राहत नाही आणि वाढतही नाही.
माणसाच्या या अवस्थेची कल्पना त्याच्या जन्मपत्रिकेतील ग्रहदशेवरून आणि इतर स्थानांवरून येऊ शकते. याचाच अर्थ असा, की गर्भावस्थेत ज्या वेळेला पिंडाची प्रथम स्थापना होते त्या वेळी बीजरूपाने स्थापन झालेले पूर्वसुकृत अथवा कर्मदोष हे त्याच्या वाढत्या आयुष्याबरोबर वाढत राहतात. हे जे काही योग आहेत हे त्याच्या सध्याच्या जन्मात केलेल्या कृत्यांचे किंवा कर्माचे फळ नसून, त्याच्या पूर्वजन्मीच्या कृत्यांचेच असते. कारण सद्यजन्मातल्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारचे यश आलेले नसते.
समाजामध्ये आपले संबंध अनेक लोकांशी असतात. कार्यालयाच्या कामानिमित्त कार्यालयातील सर्व तर्हेच्या सर्व लोकांतून संबंध असतात. आपण अतिशय प्रामाणिकपणे, सौजन्याने आपले व्यवहार करीत असतो, परंतु नंतर आपल्या लक्षात येते, की कितीही पोटतिडकीने आपण एखादी गोष्ट केली तरी समोरच्या व्यक्तीचा विनाकारण आपल्याबद्दल गैरसमज होतो. त्याचा झालेला हा गैरसमजदेखील आपल्याला सहजतेने कळत नाही आणि काही कारण नसताना त्याचा परिणाम आपल्या व्यवहारावर, कर्तृत्वावर होऊ लागतो. लोकांचा होणारा गैरसमज याबद्दल आपली असलेली कारणमीमांसा ही कार्य करीत नाही, तर पूर्वसंचिताचे दोष गेले की ते आपोआपच दूर होतात. कसे दूर होतात, का दूर होतात, केव्हा दूर झाले, हे आपल्याला काही कळत नाही. आपलीदेखील मानसिकता अशी झालेली असते, की ते खरेच बदलले की नाही, याबद्दल आपल्याला संभ्रम असतो. परंतु ते एकदा बदलले की कायमचेच बदललेले लक्षात येतात. योग्य कर्म केल्यावर नैराश्य व नकारात्मक विचारसरणी घालविता येते, हे आता अनुभवसिद्ध आहे.
नकारात्मक विचार :-कर्तबगार आणि यशस्वी माणसामध्ये विचारांचा गोंधळ दिसत नाही. सर्व तर्हेचे निर्णय तो पटापट घेतो. त्याची कार्यक्षमता खूप असते आणि यशप्राप्तीदेखील खूप असते. परंतु हेच जर मनामध्ये विचारांचा गोंधळ असेल, अनेक प्रकारचे विचार येऊन एक एक प्रकारच्या विचाराने गोंधळून जाऊन त्या गोंधळातच डुंबून राहणारे काही लोक असतात. हे करू का ते करू, या विचारांच्या संभ्रमात ते सदैव असतात. कोणी जरी सांगण्याचा प्रयत्न केला की ‘तू अमुक एक गोष्ट कर,’ तीदेखील त्याच्या पचनी पडत नाही आणि तो त्याच्या विचाराच्या गोंधळात सतत गुरफटलेला असतो. बुद्धी असते, शिक्षण असते, अनुभवाचाही पाठिंबा मिळू शकतो, तरीही त्याच्या विचारांचा गोंधळ काही कमी होत नाही. सकारात्मक विचारापेक्षा नकारात्मक विचारांनी त्या त्या समस्येकडे पाहून अकार्यक्षम होणे, हे जास्त लक्षात येते. सकारात्मक बाजूपेक्षा निरनिराळ्या तर्हेच्या नकारात्मक बाजू विचारात जास्त येतात आणि परिणामतः चेहर्यावर किंवा वागण्यात नैराश्य दिसते. सहजता राहत नाही. निर्णयपूर्वक कार्य करणे त्याला जमतच नाही. या सर्व गोष्टींचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होऊन अपयश लवकर येऊन यशाची वाटच पाहावी लागते. सर्व तर्हेची सुबत्ता असली तरीही स्वभावदोषामुळे हाती घेतलेले कार्य बिघडते आणि त्याच्याबद्दल सर्वत्र नाराजी लक्षात येते.
अशा तर्हेचे स्वभावदोषदेखील पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे, कर्मदोषामुळे निर्माण झालेले लक्षात येतात. अशा विचारांना, स्वभावाला औषध नाही, असे कंटाळून म्हटले जाते; परंतु असे दोषदेखील दूर करता येतात, याचा अनुभव गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीमध्ये नाथ शक्तिपीठाच्या कार्यामधून अनेकांनी घेतला आहे.
गैरसमज :-बर्याच वेळा आपल्या असे लक्षात येते, की आपण पोटतिडकीने एखादी गोष्ट सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो; परंतु आपल्या हेतूसंबंधी शंका घेऊन समोरच्या व्यक्तीचा विनाकारण आपल्याबद्दल गैरसमज होत राहतो. तो आपल्याला समजून घेण्यास तयारही नसतो. ह्या गैरसमजुतीमुळे त्यांच्याशी होणारे व्यवहारदेखील यथातथाच राहतात. हे प्रमाण जेवढे जास्त, तेवढा कार्यभागदेखील विनाकारण बिकट होऊ लागतो. कार्यक्षेत्रात आपल्याबद्दलचे वातावरण दूषित व असहकार स्वरूपाचे राहते. आपल्याबद्दलचा गैरसमज जातही नाही व त्याचे कारणदेखील आपल्याला कळत नाही. काय करावे काहीच कळत नाही.
कलेक्टर ऑफिसमध्ये सीनियर क्लार्क म्हणून काम करणारी एक साधारण कुटुंबातील व्यक्ती. घरामध्ये कर्तेपणाने वागावे लागे. संपूर्ण घराची जबाबदारी ही त्याच्यावरच होती. परंतु ऑफिसमधून घरी यायला रोजच अतिशय उशीर व्हायचा. ऑफिसमध्ये कामाचा ताण तसा नव्हता, पण वरिष्ठ अधिकारी त्या व्यक्तीच्या कामावर कधीच संतुष्ट नसायचे. हा माणूस अत्यंत बाळबोध वळणाचा. जे काही काम करायचे ते अत्यंत प्रामाणिकपणे करायचे व अत्यंत सद्भावनेने सर्वांशी वागत राहायचे. पण जीवनातले योगच असे, की जे तो सांगायचा, नेमके त्याच्या विरुद्ध लोक समजायचे आणि त्याच्याबद्दल गैरसमज व्हायचा. त्याला हा प्रश्न सतत पडे, की हे असे का होते? जेव्हा नाथ शक्तिपीठातून उपाययोजना केली, तेव्हापासून त्याच्या जीवनातले सर्व प्रकारचे गैरसमज आपोआपच नष्ट झाले आणि त्याचे जीवन सुखकर झाले.
वाल्या कोळ्याचा हा आत्मविश्वास होता, की तो जी काही कृत्ये करतो ती त्याच्या कुटुंबाच्याच हिताची आहेत. कुटुंबातील सर्व व्यक्ती ह्या त्याच्या कृत्यांत सहभागी आहेत आणि त्या सर्वांना जे मी करतो ते सर्व मान्य आहे; परंतु हा आपला समज चुकीचा होता, हा आपला गैरसमज होता हे त्याला केवळ नारदमुनींमुळे लक्षात आले. अन्यथा त्याने आपल्या कृती चालूच ठेवल्या असत्या. वाल्याच्या प्राक्तनात नारदमुनींनी कर्माद्वारा बदल घडविला म्हणून हे घडले.
शिक्षणात अडचणी येणे :-जीवनातील शिक्षण अडचणी, शैक्षणिक शाखा, शैक्षणिक दर्जा, शैक्षणिक विकास हे बुद्धीच्या कसावर, माहितीच्या आधारावर किंवा कोणाकोणाच्या सल्ल्यांचा आधार घेऊन आपण करीत असतो आणि त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते, की माझ्या प्रयत्नांनी माझे शिक्षण झाले. याच्यात ग्रहांचा काहीच संबंध नाही. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यावरदेखील पत्रिकेवरून आपण पडताळून पाहिले तर असे लक्षात येते, की ग्रहपरिस्थितीनुसारदेखील जे शिक्षण घेतले तेच योग्य होते. कधी कधी असा अनुभव येतो, की ज्या शाखेचे शिक्षण घेतले त्या ज्ञानाचा द्रव्यार्जन किंवा नोकरी-उद्योगामध्ये अर्थाअर्थी संबंध नसतो. शिक्षण एका शाखेचे असेल, तर उपजीविकेसाठी वेगळ्याच शिक्षणशाखेचा आधार घेतला जातो. हेदेखील योग जन्मपत्रिकेशी जुळतात अथवा दैवाच्या जीवनकहाणीशी जुळतात. ह्या संदर्भातील एक उदाहरण म्हणजे, इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण घेऊन चांगल्या तर्हेने पास झालेला एक इंजिनिअर मुलगा शिक्षणात मन न लागल्यामुळे, पून्हा कॉमर्स शाखेचे शिक्षण घेऊन, चार्टर्ड अकाउंटंट झाला. आज तो चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करीत आहे. इंजिनिअर म्हणून चांगली नोकरी मिळत असतानादेखील ती घेतली नाही. अशा समस्यांचे विशेष ज्ञान हे ग्रहांच्या साहाय्याने जन्मपत्रिकेच्या माध्यमातून होऊ शकते. ब्रह्माण्डाची ही योजना काय जबरदस्त आहे!
संततिदोष :-शारीरिक संबंध आल्यावर संतती होणे हे स्वाभाविक आहे किंवा नैसर्गिकदृष्ट्या हेच घडणार, हे सदैव गृहीत धरले जाते. आई-वडील मुलाला जन्माला घालतात, याचा अर्थ जन्माच्या नैसर्गिक घटनांना ते जबाबदार असतात. त्यामुळे त्यांना कायद्याच्या भाषेमध्मे नॅचरल गार्डियन, नॅचरल मदर, नॅचरल फादर असे समजले जाते. प्रत्यक्षात जन्माला आलेल्या मुलाचे अंग, रंग, रूप, भाग्य, बुद्धिमत्ता आदी आई-वडिलांकडून दिले जात नाही. कोणताही मुलगा आईला किंवा वडिलांना, तुम्ही मला असे भाग्य का दिले, असे रंग, रूप, अंग, कांती का दिली, हे म्हणू शकत नाही. आर्ई-वडील जरी जन्मदाते असले तरी मी आता मुलाला किंवा मुलीला विशिष्ट बुद्धिमत्तेचा, विशिष्ट स्वभावाचा, त्याच्या जन्मातील विशिष्ट योगांचा जन्माला घालतो, असे म्हणू शकत नाहीत. त्याचप्रमाणे पतीपत्नी हे दोघेही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असले, तरी त्यांना अपत्य होत नाही. त्या दोघांपैकी एक अक्षम आहे अशा परिस्थितीतदेखील गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा झाल्यावर वैद्यकीयदृष्ट्या गर्भधारणा झाली आहे, हे समजावून घ्यायला वेळ लागतो. तसेच मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे, हे समजायला खूप वेळ लागतो. परंतु सर्व तर्हेचे शास्त्रीय ज्ञान असणार्या सत्प्ारुषाला अशा कोणत्याच सोपस्कारांची गरज भासत नाही. ते तर गर्भधारणा होताच किती दिवसांचा तो गर्भ आहे हे सांगू शकतात. एवढे सगळे झाले तरी होणारी संतती ही कशी आहे, त्या संततीपासून आईवि डलांना, तसेच इतर नातलगांना सुख काय व किती मिळेल, हेही समजू शकते. पतिपत्नीच्या अशास्त्रीय वागण्यामुळे जन्माला येणारी संतती ही प्रखर आणि प्रचंड दोषाची राहू शकते. अशी दोषयुक्त जन्माला आलेली संतती हे आपले जन्मजन्मांतरीचे पाप आहे की काय, याची जाणीव माता-पित्यांना व नजीकच्या इतर नातलगांना होऊ लागते.
नगर जिल्ह्यातील एका जोडप्याला विवाह होऊन तीन वर्षे होऊन गेली होती, परंतु संततिसुख नव्हते. वैद्यकीय तपासणीत कोणताच दोष नजरेस आला नाही. वैद्यकीयदृष्ट्या ते पूर्ण सक्षम होते. तरीही सर्व वैद्यकीय उपाय केल्यावरही संतती होत नाही, हे लक्षांत आल्यावर डॉक्टरांनी, आता काही इलाज नाही, असे म्हणून सर्व उपाय थांबविले. ज्या वेळी कर्मदोष घालविण्याचे वैदिक उपाय झाले त्या वेळी त्यांना मुलगा झाला.
अपत्याकडून सुख :-संततीचे सर्व तर्हेचे दोष किंवा चांगली संतती हा प्राक्तनाचाच भाग आहे. विवाहानंतर होणारे अपत्य हे एक मोठे गूढच आहे. गर्भधारणा होणे हा एक पराकोटीचा नैसर्गिक चमत्कार आहे. अपत्य होणे हा नैसर्गिक भाग असला तरी सर्वच ठिकाणीं तो घडतो असे काहीच नाही. सर्व काही ठीक असूनही अपत्ययोग येत नाही. अपत्य झाले तरी ते बर्याच वेळा उशिरा होते. होणारे अपत्य हे सर्वतोपरी सुदृढ, रंगरूप, अंगकांती. तसेच त्यांच्या जीवनातील योग हे चांगले असणे, हे केवळ सुकृतावर आणि प्राक्तनावर अवलंबून आहे. जीवनामध्ये भोगाव्या लागणार्या शरीरयातना, पीडा, विविध रोगदेखील पूर्वसुकृतावर अवलंबून असतात. वेदशास्त्राप्रमाणे कलियुगात प्रत्येक जीवाची आयुर्मर्यादा ही शंभर वर्षांची आहे, पण एवढे आयुष्य फार थोड्यांच्या बाबतीत अनुभवाला येते. जीवनातील कर्मदोषामुळे, पूर्वसंचितामुळे, पूर्वजन्मीच्या दुष्कृत्यांमुळे आयुर्मर्यादा ही कमी होताना दिसते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक अशा तीन प्रकारच्या मृत्यूंचे योग असतात. यापैकी कोणत्या वेळी कोणत्या योगाने जीवन संपूष्टात येणार, म्हणजे कोणत्या तरी रोगामुळे, कोठल्या तरी अपघातामुळे होणारा मृत्यू हा केवळ पूर्वजन्मीच्या कृृत्यांचा परिणाम आहे. आधिदैविक मृत्यू हा विधिलिखित आयुर्मर्यादेनंतरच होतो. हा मृत्यू टळत नाही, परंतु योग्य ते कर्म केल्याने त्यात काही स्थित्यंतर घडू शकते. जीवनाचे राहणीमान, पैसा, सांपत्तिक स्थिती, सुख, दुःख, भय, शोक, आनंद, मंगलमय घटना, दारिद्य्र आदी गोष्टी या केवळ कर्माचाच परिणाम आहेत.
‘‘सुखं, दुःखं, भयं, शोको हर्षो मंगलमेव च |
संपत्तिश्च, विपत्तिश्च | सवर्ं भवतु कर्मणा ॥
असे शास्त्रात म्हटलेले आहे.
जीवनामध्ये होणारी संतती हीदेखील आपल्या पूर्वप्राक्तनाचा एक भाग आहे. ‘आई-बाप हे साधन जन्मा, साध्य सद्गुरु जन्मात’, असे शास्त्रकारांनी आवर्जून सांगितले आहे. अपत्य होणे हा प्रथमदर्शनी एक नैसर्गिक भाग आहे, असे वाटते, परंतु केवळ एवढेच जर तत्त्व लावाल तर जीवनामध्ये संतती न होणे किंवा संततीसाठी नवससायास आदी करणे याची गरज भासली नसती. जन्माला आलेल्या बालकाचे आई-वडील जरी जन्मदाते माता-पिता असले तरी ते निमित्तमात्र आहेत. आपल्याला होणार्या संततीचे भाग्ययोग, रंग, अंग, कांती, नीटनीटकेपणा आदी सर्वच माता-पित्यांनी बालकाला द्यायला हवे, परंतु असे कुठेच झालेले लक्षात येत नाही. जो आई-वडिलांचा योग तोच जन्मलेल्या सर्व बालकांचा योग, असे घडत नाही. एका आईला एकापेक्षा अधिक मुले असतात तरी ती सर्वच रंगरूपाने, भाग्याने, योगांनी एकसारखी असतातच असे काही आढळत नाही.
संततीकडून मिळणारे सुख हादेखील नशिबाचा भाग आहे. जी आपल्या घराण्याची परंपरा असते त्याप्रमाणेच तो मुलगा असेल, असे काही सांगता येत नाही, परंतु ढोबळमानाने घराण्याचे गुणदोष हे त्या बालकामध्ये उतरलेले दिसतात.
कोणता जीव कुठे आणि कोणाकडे जन्माला यायला हवा हे ते अतिगुह्य ज्ञान आहे, पण साधारणपणे असे सांगता येईल, की मुलाच्या पत्रिकेतील गुणदोष हे बरेचसे ज्या कुटुंबात तो जन्माला आला त्या कुटुंबासारखे असतात.
घसरती आयुर्मर्यादा :-पूर्वसंचितांचे दोष इतके जबरदस्त असतात, की त्याचा परिणाम जन्माला आलेल्या मुलावर जन्मतःच झालेला दिसतो. जसजसा तो जीव विकसित होतो तसतसे त्याच्या आचरणावरून, वागण्याबोलण्यावरून, स्वभाव गुणदोषांवरून किंवा त्याच्या जीवनात घडणार्या विविध गोष्टींवरून हे पूर्वजन्मीचे संस्कार लक्षात येऊ शकतात.
एखाद्या कुटुंबामध्ये असे लक्षात येते, की पणजोबा ८० ते ९० च्या वयात गेलेले असतात तर, आजोबा ६० ते ७० च्या घरात गेलेले असतात, वडील ४० ते ५० च्या वयात गेलेले असतात, तर नातू वयाच्या ४० शीतच गेलेला असतो. कुटुंबामधली ही घसरती आयुर्मर्यादा ही जीवनमानाची उतरती कळा, कौटुंबिक तथा व्यक्तिगत कर्मदोष दर्शविते.
अगदी आध्मात्मिक कार्याला वाहून घेतलेल्या घराण्यातल्या वंशपरंपरागत कार्य करणारेदेखील केवळ ते आध्यात्मिक कार्य करतात, म्हणून त्यांच्या आयुर्मर्यादेवर त्याचा परिणाम होत नाही, असे काहीच नाही. आध्यात्मिक ज्ञान हे वारसाहक्काने येत नाही. कार्य करणारे काहीही समजोत, परंतु ‘मृत्यू न म्हणे हा अग्निहोत्री | मृत्यू न म्हणे हा श्रौत्री | मृत्यू न म्हणे हा मंत्रतंत्री | पूर्णागमी॥ मृत्यू न म्हणे हा संत | मृत्यू न म्हणे हा महंत | मृत्यू न म्हणे हा गुप्त होतसे ॥ मृत्यू न म्हणे हा पूण्य पूरुष | मृत्यू न म्हणे हा हरिदास | मृत्यू न म्हणे विशेष | सुकृती नर ॥ असे रामदास स्वामींनी स्पष्टपणे ‘दासबोधा’मध्ये सांगितले आहे.अशा प्रकारे जीवनामध्ये जे विविध प्रकार चालू असतात हे सर्वच्या सर्व त्या जीवाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यांशी, प्राक्तनाशी किंवा सद्यजीवनातील कर्मदोषांशी संबंधित असतात. हे विविध कर्मदोष काय आहेत आणि याला नेमका काय उपाय आहे, हे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण केलेल्या प्रयत्नांना यश आलेले दिसणार नाही आणि जीवन अधिकच बिकट होऊ लागेल. या कर्मदोषांची छाननी करून नेमके काय करायला हवे हे सांगणारा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तो एक आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे, हे माझे नशीब असे म्हणून आंधळेपणाने आपण जीवनामध्ये काही न कळता पूढे पूढे जात असतो. जे काही चांगले किंवा विपरीत घडायचे असेल ते घडू दे, आपण काय करणार, या समजुतीने जीवनक्रम पूढे पूढे चाललेला असतो.
म्हणजे ब्रह्मांडाची जी काही रचना आहे आणि कार्यपद्धती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला तरच हे समजू शकेल. नाहीतर हे काय गौडबंगाल आहे, असे वाटेल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते अति सहजतेने कार्यरत असलेली दिसतात. जणू ‘हाच निसर्ग’ असे आपण समजतो. सर्वांना मिळणार्या शक्तीचे साधन म्हणजे सूर्यनारायण. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा, त्या ऋतूंचा परिणाम सर्वांवरच होतो आणि नवनवीन स्थित्यंतर हे सतत घडत असते. ह्या ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या सतत आपले कार्य करीत असतात. त्यांची कार्यपद्धती आपल्याला माहीत नसते, पण त्याचा होणारा परिणाम दृष्टोत्पत्तीस येतो किंवा अनुभवास येतो. मानवी जीवावरदेखील या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन माणसांचे शरीर, मन, बुद्धी ही त्या त्याप्रमाणे आकार घेऊ लागते. कृतीची योजना व त्याचे परिणाम यामध्ये जो वेळ जातो त्याचे भान न राहिल्यामुळे किंवा ते दृश्य स्वरूपात न दिसल्यामुळे अदृश्य शक्ती कार्यरत आहेत, असे बर्याच वेळा वाटते.
आकाशात दिसणारे ग्रह, नक्षत्रे ही सतत सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीदेखील स्वतःभोवती फिरते आणि फिरत फिरत सूर्याभोवती, तसेच ग्रहमंडळाभोवती फिरते. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये असलेल्या प्रत्येक जीवाचा संबंध या निरनिराळ्या शक्तींशी येतो आणि हा एक ईश्वरीय खेळ वाटू लागतो.
यश न येणे :-अनेक वेळा प्रयत्न करूनदेखील यश येत नाही किंवा अपेक्षित यश येत नाही. प्रयत्नांची शिकस्त करावी तेव्हा कुठे अत्यल्प यश पदरीं पडते. ‘माझे नशीब असे का’ हा प्रश्न सतत पडत राहतो. जन्मतःच जे ग्रह आपल्या वाट्याला आले आहेत, ज्या योगाने ज्या वेगवेगळ्या युतींनी ज्या निरनिराळ्या जन्मपत्रिकांतील घरात ते आले आहेत, त्याचाच हा परिणाम आहे.
जन्मपत्रिकेतील रिकामी घरे किंवा ग्रहस्थिती ही सदैव आपल्याला मार्गदर्शन करीत असते, पण ब्रह्मांडाच्या या खेळाचा उलगडा आपण करून घेतच नाही. आपल्या बुद्धीप्रमाणे लोकांच्या सांगण्यावरून, आपल्या वाटण्यावरून, आपल्या काल्पनिक ध्येयाप्रमाणे व भोवतालच्या वातावरण व परिस्थितीवरून आपण जीवनात काही कल्पना करतो व त्या साध्य करण्याकरिता आपण आपले प्रयत्न करतो. परंतु ते साध्य झाले नाही की शेवटी आपण आपल्या नशिबालाच दोष देतो. अपयशांचा हा योग व भोग जन्मभर चालूच राहणार, असे गृहीत धरून आपले जीवन व्यतीत करतो.
गतजन्मात केलेल्या कृत्यांचे फळ म्हणून ह्या जीवनात घडणार्या वाईट किंवा अप्रिय गोष्टी घडतात, असे आपण मानून राहतो. वाल्या कोळ्याचेच पाहा ना. पूर्वजन्मीच्या कृत्यांचे परिणाम म्हणून सत्कर्माचा डोंगर असताना ह्या जन्मामध्ये लुटमारीसारखा व्यवसाय करण्याची बुद्धी त्याला झाली. केवळ नारदमुनींमुळे त्याचा जीवनप्रवाह बदलला.
मूल जन्माला आल्यावर ते जसजसे वाढू लागते तसे तसे आपल्याला त्याच्या भविष्याबद्दल काही समजत नाही. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे स्वप्ने रंगवीत असतो. स्वत:वरच्या विश्वासाने आपण त्याला असे घडवू, उच्च शिक्षण देऊ, अशा निरनिराळ्या कल्पना करून आपण जास्तीत जास्त काय चांगले करू शकतो, ह्याच विचारात सदैव असतो, आपल्या सार्या कल्पना त्याला वाढविता वाढविता त्याच्यावर लादत असतो व आपण स्वतःही तसाच विचार त्यांच्याबद्दल करीत राहतो.
परंतु हा तान्हा मुलगा कसा राहतो, कसा खेळतो, काय काय करतो, कुठे लक्ष देतो, आपल्या इशार्यांना कसा प्रतिसाद देतो, वगैरेकडे आपण बोधात्मक दृष्टीने पाहत नाही. लहान मूल म्हणून आपल्याच कल्पनेने ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हे मूल समजूतदार होईपर्यंत आपल्या जन्मपत्रिकेतील ग्रहपरिस्थितीप्रमाणे वागत असते व प्रतिसाद देत असते.
मूल मोठे होऊन शाळेत जाऊ लागले की आपल्याला तशा बर्याच गोष्टींचे आकलन होऊ लागते. तो आळशी आहे, सावध आहे, अभ्यासू आहे की काय हे त्याच्या वागण्यावरून आपल्याला कळू लागते. विद्यार्थी म्हणून, विद्यार्जन करून तो पूढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे का, हे आपल्या लक्षात येऊ लागते.
मुलाच्या प्रत्येक स्वाभाविक कृतीवरून तो आपल्या पिंडाचे मूळ तत्त्व सतत दाखवीत असतो. मुलामध्ये केव्हा आणि कसा बदल होईल, हे समजणे फारच अवघड आहे, परंतु एवढे मात्र निश्चित सांगता येईल, की मुलामध्ये होणार्या स्थित्यंतराला त्याच्या जन्मपत्रिकेतील ग्रह हे मूलतः जबाबदार आहेत; तसेच त्याच्या भोवतालचे वातावरण, त्याच्यावर होणारे संस्कार व तो स्वतः होऊन आत्मसात करीत असलेल्या गोष्टी ह्यामुळे पत्रिकेतील ग्रहांना, त्यांच्या परिणामांना फाटा देऊन तो मुलगा अपेक्षेपेक्षा चांगला होऊ शकतो. परंतु अशा तर्हेने केलेले संस्कार हे त्याचे योग बदलत नाहीत, तर त्याला विवेकी करतात. केवळ विवेकी झाल्यामुळेदेखील त्याच्या जीवनात फार मोठा चांगला बदल घडू शकतो.
पूण्याच्या एका व्यावसायिकाची गोष्ट सांगतो. व्यवसायामध्ये त्याला विशेष प्रकारचे यश येत नव्हते. धंदा हा भगीरथ प्रयत्नांनी चालू ठेवावा लागे. व्यवसायात काम करणारे कामगार आणि आप्तेष्ट, नातलग, मित्र यांच्या मनधरणीमध्ये बराच अवधी जायचा. आप्तेष्टांकडून आर्थिक कुचंबणा झाली होती. व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा सुरळीतपणा, व्यवस्थितपणा नसायचा. सर्वच गोष्टींना विलंब खूप लागायचा. योग्य वैदिक कर्माच्या उपचारांनंतर सर्वच परिस्थिती बदलली. व्यवसायामध्ये नियमितता, शिस्त, सुव्यवस्थितपणा येऊन कामे भराभर होऊ लागली. माल परदेशी जाऊ लागला आणि अल्पावधीतच यशस्वी व्यावसायिक म्हणून तो पूढे आला.
कमी यश मिळणे :-वास्तविक पाहता मूल मोठे होताच ते जे काही निरनिराळे प्रयत्न करताना दिसते त्यावरूनच त्याचे मूल्यमापन करता येते. शिक्षण संपेपर्यंतदेखील आपल्या असे लक्षात येते, की अभ्यास वारंवार करूनदेखील अभ्यासात प्रगती दिसत नाही. केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळणे, अभ्यास चांगला असताना नापास होणे, अनेक वेळा कारण नसताना नापास होणे, हे जरी विद्यार्थ्याचे दोष असले तरी त्या दोषांचा संबंध हा त्याच्या बुद्धिमत्तेशी नसून, त्याच्या योगांशी असतो.एम. एस.च्या अंतिम वर्षाला बसलेला औरंगाबादचा एक विद्यार्थी सहा वेळा नापास झाला. प्रत्यक्षात निष्णात डॉक्टरांच्या तोडीची त्याची सर्जरी असायची.वडीलही निष्णात सर्जन होते.स्वत:चे खासगी हॉस्पिटल होते. परंतु ऐन परीक्षेत काय व्हायचे हे कुणालाच काही कळेना. वडिलांचा सर्जरीचा व्यवसाय अनेक वर्षार्ंपासून होता.वडिलांपेक्षाही मुलगा ऑपरेशन चांगले करायचा.परंतु परीक्षा पास नसल्यामुळे ‘सर्जन’ म्हणून त्याला व्यवसाय करता येत नव्हता. परीक्षेतील त्याचे हे अपयश त्याच्या बुद्धिमत्तेशी संबंधित नसून, जीवनातील ग्रहयोगांशी संबंधित होते. म्हणजे जीवनात पूर्वसंचिताप्रमाणे ज्या गोष्टी घडायला हव्या तशाच त्या घडण्याचा योग होता.हा कुयोग दूर केला गेल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला यश येऊ लागले.
आपण प्रयत्न करतो, पूर्ण विचार करून प्रयत्न करतो, परंतु प्रयत्न करता करता केव्हा तरी सहजतेने पण नकळत अशी काहीतरी कृती आपल्याकडून घडतात, की ज्याचा परिणाम होऊन अपयश पदरी येते. आपल्याला असे पूष्कळ वेळा जाणवते, की आपल्यासारखेच प्रयत्न करणारा आपल्यापेक्षा कमी प्रयत्नांत सहजतेने यश प्राप्त करतो, तर तेच आपल्याला साध्य करायला प्रयत्नांची शृंखला करावी लागते. हाच भाग जसजसा माणूस उद्योगधंद्याला, कामधंद्याला लागतो तेव्हा त्याच्या अनुभवाला अशा गोष्टी अधिकच येतात. वारंवार चिकाटीचे, अविश्रांत प्रयत्न करूनदेखील आपल्याला अत्यल्प यश मिळते किंवा यश मिळत नाही. परिणामतः जीवन जसेजसे पूढे जाऊ लागते तसे तसे जीवनातल्या अपयशाची जाणीव खूप जास्त होऊ लागते. ती इतकी जास्त होते, की काळाच्या ओघामध्ये माणूस हे माझे प्रारब्ध आहे, असे समजून जीवनातील अपयश मान्य करून, आपले नैराश्य वाढवितो आणि त्याचा नाकर्तेपणा वाढू लागतो.
मानवी जीवनातील हे दोष हे केवळ त्याच्या पूर्वसंचितामुळेच आलेले असतात, याचा अंदाज आपापल्या जन्मपत्रिकेवरून ज्याचा त्याला येऊ शकतो. हा व्यक्तिगत दोष मानला जातो आणि त्याला नाही नाही त्या समजुतीने नाही नाही ती कारणे दिली जातात. जोपर्यंत त्याच्या या पूर्वसंचिताच्या दोषांवर उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत जीवनामध्ये त्याला वाढते अपयश येत असते, असा त्याला अनुभव येतो. याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांना यश येऊ लागलं म्हणून आपण अधिक नेटाने आणि लक्षपूर्वक प्रयत्न करू लागतो. आपल्या प्रयत्नांत किंवा प्रामाणिकपणात काहीच खोट नसते. बुद्धीच्या कसावर, अनुभवाच्या जोरावर आणि निरनिराळ्या प्रभुत्वाच्या सहकार्यावर आपले प्रयत्न सुरू असतात. आता यश आपल्या पदरीं पडणार, अशा प्रयत्नांच्या उच्चतम शिखरावर आपण जातो आणि अचानकच, कारण नसताना ते यश हातून निसटून जाते. अशा घटनेचा एकदा नाही तर वारंवार निरनिराळ्या कारणांवरून आपण अनुभव घेत असतो. आपल्या जीवनात आपल्याकडून असे काही घडते आहे हे कळायलादेखील आपले बरेचसे आयुष्य निघून जाते.परिणामतः जीवनाच्या चढाओढीमध्ये ज्या वेळी आपण खूप मागे राहिलेले दिसतो किंवा खूप पूढे जायला हवे, पण ते दिसत नाही, याचे कारणदेखील आपल्या जीवनातील योग हेच आहेत.
स्वभावदोष :-बर्याच वेळा आपल्याला असे लक्षात येते, की घरातल्या इतर सदस्यांपेक्षा एखाद्याचा स्वभाव हा वेगळा आणि विचित्रच वाटतो. अकारण चिडचिड करणे, अकारण रागावणे, अकारण भांडणाला उद्युक्त करणे किंवा भांडणे, असे निरनिराळ्या स्वभावाचे भाग लक्षात येतात. एखादी गोष्ट करायला सांगितली, की विनाकारणच हट्टीपणा करायचा. जे करायला सांगितले त्याच्या विरुद्ध करायचे. जेवण, खेळणे, अभ्यास हे करताना स्वभावातला विचित्रपणा जाणवतो. लहरीपणा वाढतो. वेळ-काळ याचा विचार न करता एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करणे, नादिष्टासारखे वागणे, वगैरे. काही मुले विनाकारणच भ्रमिष्टासारखी वागतात. आई किंवा वडिलांशी विनाकारणच वाद घालणे, सांगितलेले न ऐकणे हे स्वभावदोष या कर्माच्या त्रुटींमुळे, पूर्वसंचिताच्या दोषांमुळे होतात. जन्मपत्रिकेतील ग्रहांचा अभ्यास केला तर हे ग्रह असे स्वभावदोष वाढविण्यास कारणीभूत ठरतात, असे लक्षात येईल. विनाकारणच लाजणे किंवा आत्मविश्वासाचा अभाव दाखविणे, काहीएक कारण नसताना काल्पनिक भीती बाळगून राहणे; अस्वस्थ, अस्थिर, चंचलतेने वागणे हे दोष कोणत्याही बाह्य कारणांनी निर्माण झालेले किंवा हे परिस्थितिजन्यही नसतात. योग्य कर्म केल्याने हे सर्व दोष जाऊ शकतात. म्हणजेच आपल्या स्वभावात योग्य कर्म करून पूर्वसंचितावर मात करून आपण अशा तर्हेचे दोष घालवू शकतो. जे काही सद्यजीवनामध्ये घडते त्याला मूलतः आपल्या जन्माबरोबर आलेले ग्रह हे जबाबदार आहेत. आपल्या पिंडाची, जीवाची घडण कशी झाली आहे, याचा अंदाज जन्मपत्रिकेतील ग्रहांवरून आणि रिकाम्या घरांवरून समजू शकते. लबाडी करणे, खोटे व्यवहार करणे, फसवेगिरी करणे, दुसर्याच्या वस्तू त्याच्या नकळत घेऊन जाणे, विघ्नसंतोषी चित्तवृत्तीने वावरणे यासारखे दोष मंत्रतंत्रांनी किंवा औषधाने जाऊ शकत नाहीत, तर योग्य उपासनेच्या माध्यमातून सत्प्ारुषाच्या मार्गदर्शनाखाली व्यवहार करून अशा प्रकारचे दोष जातात. मेल्याशिवाय माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही, असे आपण म्हणतो. कारण नेमके काय केले असता, कोणते कर्म केले असता हे दोष जातील हे सांगणारा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे दोष जाऊ शकत नाहीत. यासाठी हे दोष निर्माण का झाले, कोणत्या कर्मदोषामुळे झाले, हे कर्मदोष दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे, हे माहीत नसते म्हणून, आपले हे प्रारब्ध म्हणून, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. परंतु हे बरोबर नाही.
कामामध्ये अडथळे :-आपण काय करीत असतो, आपण ज्या तर्हेच्या कामात असतो त्याच प्रकारच्या कामामध्ये इतरही लोक असतात. इतर लोकांची कामे पटापट होताना आपल्याला दिसतात, तर आपल्या कामांमध्ये निष्कारण फाटे फुटत फुटत मूळ काम बाजूला राहते. काम करणार्याच्या मनातील स्थित्यंतरांनी कामाला वेगवेगळी दिशा मिळालेली दिसते. काम सरळ न होता घुमून फिरून होताना दिसते. काही कारण नसताना वैचारिक किंवा अन्य प्रकारचे अडथळे निर्माण होऊन काम होण्यास विलंब लागतो. कामात येणारे अडथळे हे सतत उद्विग्नता वाढवितात आणि कामातला उत्साह कमी कमी होत काम अजूनच लांबणीवर पडते. अशा प्रकारचे अडथळे हे एकच नाही, तर त्या व्यक्तीकडून होणार्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये येत असताना दिसतात. असे स्पष्टपणे जाणवू लागते, की या व्यक्तीचाच हा दोष आहे, की ज्याच्यामुळे कामामध्ये अडथळे येतात आणि काम होत नाही किंवा नैराश्य वाढत राहते. हेच काम दुसर्या कोणा व्यक्तीने केले तर ते सरळ होताना दिसते. हे ग्रहांचेच योग असे असतात, की याचा परिणाम होऊन विचारांचा गोंधळ, विविध अडचणी आणि खोळंबा होऊन त्या व्यक्तीला कामामध्ये अनेकविध अडचणींना तोंड द्यावे लागते. या निरनिराळ्या अडचणींमुळे अनेक तर्हेचे नुकसानही होऊ शकते, तर क्वचितप्रसंगी फायदाही होऊ शकतो.
विवाहयोग :-जीवनामध्ये घडणारे विवाहयोगदेखील विविध प्रकारचे असतात. कधी विवाह अपेक्षेपेक्षा लवकर होतो, तर कधी प्रयत्न करून थकला तरी कधी योगच येत नाही. कधी प्रेमविवाह, तर कधी चालीरितीप्रमाणे विवाह होतो. विवाहाचे हे योगदेखील आपल्या प्राक्तनाशी संबंधित असतात. ज्या जीवाशी सद्यजन्मात विवाहसंबंध झाला आहे त्याच जीवाशी येणार्या सात जन्मांत हाच संबंध असतो, ही आपली कल्पना चुकीची आहे.‘घडे भोगणे सर्वही कर्मयोगे |’ जीवनातील सर्वच गोष्टींना कर्माच्याच सिद्धान्ताचा आधार आहे. विवाहाबरोबरच निर्माण होणारे नातेसंबंध हादेखील योगाचा आणि भोगाचाच भाग आहे. विवाहाबद्दल हा आपला पक्का समज आहे, की आपण जसे ठरवू तसेच होईल. मुलगा किंवा मुलगी आपल्या मनाप्रमाणे काही ठरवतील, पण तसेच घडेल असे योग कमी असतात. विवाहाच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. आपण व्यक्तींशी संपर्क साधून रीतसर विवाहप्रस्ताव द्यायचा आणि उभय पक्षांना मान्य असेल तर तो निश्चित करायचा. मुलगा आणि मुलीचा परस्परसंबंध येऊन प्रेमविवाह करण्याचा प्रयत्न करायचा. कधी तो यशस्वी होतो, तर कधी मुलाकडून किंवा मुलीकडून जमत नाही. मुला-मुलीची, दोघांची इच्छा असली तरी आई-वडील त्याला संमती देत नाहीत. काही ठिकाणी तर तो समाजाला हे मान्य असेल की नाही हा संभ्रम मनामध्ये असते. त्यामुळे तो होत नाही. आई-वडिलांना गाफील ठेवून परस्पर लग्न करायचे, पळून जाऊन लग्न करायचे, असे इतरही निरनिराळ्या प्रकारांनी विवाह होतात, पण जीवनामध्ये प्रत्येकाला केव्हा ना केव्हा ‘मॅरेजेस आर सेटल्ड इन हेवन’ म्हणजे विवाहयोजना पूर्वनियोजितच असते याची जाणीव होते. दोन भिन्न वातावरणांत वाढलेल्या व्यक्ती कळत्या वयात एकत्र येऊन विवाहबद्ध होणे, ही तर संसारी जीवनाची सुरुवात आहे. ह्या सुरुवातीतच अनेक तर्हेच्या अडचणी मनुष्य अनुभवतो. वय वाढून गेले तरी विवाहयोग येतच नाही. विवाहाचा मनात विचार नसताना विवाहयोग येणे आणि घडणे, चारचौघांसारखा विवाह न होता वेगळ्याच पद्धतीने विवाह होणे, पळून जाऊन परजातीच्या किंवा अमान्य जातीच्या व्यक्तीशी विवाह होणे, विवाहानंतर निरनिराळ्या तर्हेचे प्रश्न उद्भवणे, दुःख,असमाधान येणे, समस्त नातेवाइकांमध्ये विवाहामुळे भयानक प्रश्न निर्माण होणे, विवाहामुळे मृत्युयोग किंवा लक्ष्मीप्राप्तीचे योग येणे, अशा निरनिराळ्या तर्हेच्या गोष्टी लक्षात येतात. हे सर्व प्रकार निश्चितपणे पूर्वजन्मीच्या कृतींशीच संबंधित असतात.
पतिपत्नीचे नाते :-पतिपत्नीचे नाते जे सामान्यतः गृहीत धरले जाते त्याप्रमाणे सर्वांचे नसते. समाजाच्या दृष्टीने पतिपत्नी एक असले तरी प्रखर वैचारिक मतभेद असतात. सतत वाद होतात. त्यामुळे एकमेकांना अनादराने वागविणे, सांसारिक जीवनामध्ये वेळप्रसंगी आवश्यक असलेले सामंजस्य न दाखविणे, एकमेकांवर प्रेम असून सांसारिक सुख न मिळणे, घरातील इतर नातलगांबरोबर किंवा उभय पक्षांच्या नातलगांबरोबर सामंजस्यपूर्ण किंवा प्रेमाचे संबंध नसणे, एकमेकांबद्दल सदैव साशंकता असणे, आर्थिक व वैषयिक बाबीबद्दल असमाधान असणे किंवा कारण नसताना व्यक्तिगत जीवनामध्ये दुःख निर्माण करणे, अशा प्रकारचे योग विवाहानंतर अनुभवास येऊ लागतात. सकृत्दर्शनी हे जरी प्रासंगिक किंवा नैमित्तिक वाटत असले तरी ते पूर्वजन्मीच्याच कृतीशी संबंधित असतात. गेल्या १७ वर्षांत अशी अनेक प्रकरणे हाताळली, की जेथे पतिपत्नीचे परस्परसंबंध हे चांगले नव्हते. अचूक कर्म केल्यावर हे दोष निघून जातात.
अंधत्व :-आजकाल डोळ्याला चष्मा लागणे ही एक सामान्य बाब आहे. चाळिशीनंतर चष्मा लागणे, वयाच्या साठीनंतर डोळ्यांचे ऑपरेशन हे सर्वसामान्यपणे दिसून येते. आजकाल लहान वयातच चष्मे लागतात किंवा डोळ्यांचे विकार लक्षात येतात. दृष्टी अतिशय क्षीण असणे किंवा अजिबात नसणे, हे प्रमाणदेखील बरेच वाढलेले आहे. दृष्टीचे निरनिराळे प्रकार कसे आणि का होतात, हे वैद्यकीयदृष्ट्या सांगणारे लोक बरेच आहेत. वैद्यकीय दोष जाऊ शकत नाही, असा एक समज आहे, परंतु दृष्टी नसणे, कमी असणे किंवा डोळ्यांचे विविध विकार याला आपल्या पूर्वजन्माच्याच कृती जबाबदार आहेत. नेमका कर्मदोष काय आहे, हे जर लक्षात आले तर त्याला साजेसे कर्म करून दृष्टी सामान्यतः चांगली होऊ शकेल, एवढा परिणाम आपण सहजतेने अनुभवू शकतो. कोणत्याही तर्हेची वैद्यकीय कृती न करता केवळ धार्मिक, आध्यात्मिक आणि वैदिक उपचारांनी हा दोष दूर करता येतो. वेदांमधले सूक्त किंवा परंपरेने अवगत असलेले पारंपरिक ज्ञान ह्यांच्या आधारावर कर्म केले असता अशा प्रकारचे दृष्टिदोष जाऊ शकतात. आपल्या जन्मपत्रिकेवरूनदेखील दृष्टिदोषाचे संभाव्य ज्ञान आपल्याला होऊ शकते. ऋग्वेदामधील सूक्तांच्या आधारे डोळ्यांचा पंधरा नंबरचा चष्मा हा वर्षभराच्या कालावधीमध्ये दीड नंबरवर आला. कोणतेही वैद्यकीय औषध नाही किंवा शस्त्रक्रिया न करता केवळ वैदिक उपचार पद्धतीने हा दोष घालविता आला. संततीचे सर्व तर्हेचे दोष घालविणे किंवा चांगली संतती होणे हा तर प्राक्तनाचाच भाग आहे. ह्यासाठी लागणारे कर्म हे बर्याच कालावधीपर्यंत करावे लागते. पण केलेले कर्म वाया जात नसून, कामासच येते. मंद दृष्टी, प्रकाशाचा होणारा असह्य त्रास, रात्री डोळ्यांना होणारा त्रास, अग्नीसमोर बसले असता डोळ्यांना होणारा त्रास, डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी, आदी विविध गोष्टी या केवळ बाह्य कारणामुळे झालेल्या आहेत असे नसून, त्या कर्मदोषामुळे झालेल्या असतात. ग्रहणामध्ये उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहिल्यावर डोळ्याला होणारा त्रास, हादेखील योग्य कर्म केले असता दोषरहित झालेले लक्षात येते. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये माणूस कसा राहतो, वागतो, कसा जीवनकार्य करतो, काय कर्म करतो ह्यावर त्यांचे जीवन आणि जीवनातील सुख अवलंबून असते.
बहिरेपण :-बहिरेपण हादेखील केवळ बाह्य कारणाने निर्माण झालेला दोष आहे, असे वाटते; परंतु श्रवणेंद्रियांचा संबंध हादेखील आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीशी निगडित असतो. संपूर्ण शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच महातत्त्वांचे बनलेले आहे. ज्या कर्मदोषांचा संबंध हा या तत्त्वांच्या विरोधात असतो, त्याविरोधी कर्माचा ज्या शारीरिक इंद्रियांवर परिणाम झालेला आहे, त्यामुळे ही इंद्रिये सक्षम राहत नाहीत. परंतु यथायोग्य उपचारकर्म केले तर त्याचा परिणाम होऊन शरीरातील कमजोर झालेली इंद्रिये पुन्हा पूर्ववत् काम करू लागतात.
दानधर्म :-दानधर्माला जीवनामध्ये सहसा विशेष महत्त्व दिले जात नाही. दानधर्म करण्याची वृत्ती ही उपजतच असावी लागते. केलेल्या दानधर्माच्या प्रकारातून कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मोबदला परत घ्यायचा, हा विचार जास्त लक्षात येतो. ह्यामुळे केलेल्या दानधर्माचा उपयोग होत नाही. जो दानधर्म करताना उदार अंतःकरणाने दिला जातो, परंतु दिल्यावर मनाला विलक्षण आनंद आणि समाधान मिळू लागते तो दानधर्म योग्य होय. दुःखी, पीडित आदी व्यक्तींना दान देणे हे सामाजिक दृष्टीने फार मोठे आणि महत्त्वाचे काम वाटते,परंतु अशा व्यक्तींना सत्पात्र व्यक्ती म्हणून दान दिले तर त्या दानाच्या मोबदल्यात परमेश्वर आपल्याला चांगले आचारविचार आदी देईल असे वाटते. परंतु प्रत्यक्षात अशा अपात्र व्यक्तींचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर आणि व्यवहारावर झालेला दिसतो. कोणी आणि कोणत्या प्रकारचे दान दिल्याने मानसिक सुखशांती, समाधान मिळू शकते, याविषयीचे शास्त्र आहे. कोणत्या व्यक्तींनी कोणाला कसे दान द्यावे, याचा उल्लेख शास्त्रात केलेला आहे. आपल्या मनात येईल ते दान देऊन आपल्या भाग्यावर काही परिणाम होत नाही. प्रत्येक जीवाचे जीवनकार्य लक्षात घेऊन, त्या त्या पतिपत्नीचे योग लक्षात घेऊन, कोणते आणि कशा प्रकारचे दान दिले तर फायदेशीर ठरेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दानधर्म हा पैशांच्या स्वरूपात, विविध प्रकारचे धान्य, विविध प्रकारचे खाद्य किंवा कोणत्या प्रकारचे रसायन असावे, हे निश्चित करता येते. घरातली एक व्यक्ती दानशूर असली म्हणजे इतरही असतील असे सांगता येत नाही. परंतु योग्य वस्तूचे दान दिले तर जीवनामध्ये विविध प्रकारचे आपले भाग्य फळफळल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. जीवनामध्ये दानाचे विशेष महत्त्व असून, जपतप, आध्यात्मिक ज्ञान, योगसाधना, नामस्मरण, तीर्थाटन या सर्वांपेक्षा सत्पात्री दानाला महत्त्व जास्त आहे. योग्य व्याधीसाठी योग्य वस्तूचे दान योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात केले तर व्याधीचा दुष्परिणाम जाऊ शकतो, एवढे त्या दानाला महत्त्व आहे.
पीडा :-शारीरिक पीडा या सर्वांनाच होत नाहीत. निरनिराळ्या व्याधी, पीडा या काही लोकांना जीवनभर त्रस्त करतात. गतजन्मीच्या, पैशाच्या किंवा आर्थिक गैरव्यवहारामुळे इसब, त्वचारोग, शुक्रधातूचा अभाव आदी प्रकारच्या पीडा होतात. जो काही गतजन्मीचा व्यवहार असेल, तो ज्या दोन व्यक्तींमध्ये झाला त्या जरी समोर येणे शक्य नसले तरी गुणात्मक रूपाने त्याचा परिणाम झालेला असतो. कितीही दवाखाने धुंडाळले, कितीही विविध प्रकारचे औषधोपचार केले, नवससायास आदी केले तरी या प्रकारचे दोष जात नाहीत. योग्य उपचार, कर्म केल्याने अशा प्रकारचे दोष जातात, ही कल्पना जरी विचित्र वाटणारी असली तरी मानवी जीवन हे मानवनिर्मित यंत्र नसून ब्रह्मांडाच्या तत्त्वांवर, पंचमहाभूतांच्या तत्त्वांवर युगानुयुगे चालणारे हे ईश्वरी यंत्र आहे. ते ईश्वरी तत्त्वानेच चालते. मानवी बुद्धीला मानवाच्या विचारसरणीनुसार प्रतिसाद देणारे हे मानवी यंत्र नसून, हे ईश्वरी तत्त्वांनाच प्रतिसाद देणारे यंत्र आहे. पण मानवी जीवनाचा मूळ उद्देश हा सत्कर्म करीत ब्रह्मांडाचे ज्ञान आणि अनुभूती घेत ईश्वरीय शक्तीशी समरस होणे हा आहे.
आर्थिक व्यवहार :-निरनिराळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना आपल्या अनुभवाला येते, की काहीही कारण नसताना प्रयत्न होतो. व्यवहार करण्याकरिता योजना या कार्यान्वित होतच नाहीत. ऐन वेळेवर काहीतरी असे घडते, की आकस्मिक खर्च येतो आणि आलेला पैसा नकळत हातातून निघूनही जातो. कितीही प्रमाणात पैसा आला तरी तो शिल्लक पडत नाही आणि अनपेक्षित खर्चामुळे पैसा भरपूर मिळूनही पैशांची चणचण भासतच राहते. बर्याच वेळा प्रयत्न करूनही पैसा मिळत नाही. ऋण फेडले जात नाही, तर ते वाढतच राहते. नियोजित मिळणारा अपेक्षित पैसा हा नियोजनाप्रमाणे मिळत नाही आणि विनाकारणच आर्थिक संकटात आपण पडतो. एखाद वेळेला इस्टेट विकून आलेला पैसा हा योग्य तो विनियोग करण्यापूर्वीच नाही त्या कारणासाठी खर्च होतो आणि पैसा पूर्ण हाती लागतही नाही. देवधर्मासाठी योजलेला पैसा हा वेळेवर उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे अपेक्षित उपचार कर्मदेखील घडत नाही.अशा विविध प्रकारच्या अडचणींचे मूळ हे माणसाच्या प्राक्तनात आणि पूर्वसंचितात रुजलेले आढळते.
नोकरीमधील त्रास :-अनेक लोक नोकरी करतात, परंतु नोकरीमध्ये असह्य त्रास फार थोड्यांना होतो. नोकरीमध्ये मन रमत नाही. नोकरीच्या ठिकाणी जाऊन स्थिर वृत्तीने काम करता येत नाही, काहीही कारण नसताना सहकार्यांशी आणि वरिष्ठांशी वाद आणि मतभेद होऊ लागतात. आपली कार्यक्षमता कमी झालेली असते आणि कामापेक्षा नाही त्या गोष्टीतच आपण अडकलेले असतो. चारचौघांबरोबर वावरता येत नाही आणि स्वतंत्रपणे एकट्याला भेटता येत नाही, अशी आपली गत होते. बर्याच वेळा कारण नसताना नोकरी बदलत राहावे लागते. बर्याच लोकांना असा अनुभव येतो, की दर सात ते दहा वर्षांमध्ये आपण वरच्या जागेवर बसतो आहोत. स्थिर होत आहोत असे वाटता वाटताच नोकरी सोडण्याची वेळ येते आणि पून्हा जीवनाला खालच्या स्तरावर, हुद्द्यावर सुरुवात करावी लागते. असे प्रकार त्याच्या जीवनात का घडतात, अशा योगांची कल्पना त्याच्या जन्मपत्रिकेतील ग्रहांवरून येऊ शकते.
शत्रूंचा त्रास :-प्रत्येक माणसाला शत्रू असतात, अन् हे शत्रू बर्याच वेळा मित्ररूपाने असतात किंवा आपल्या हिताची चिंता दाखवून आपल्याबद्दल सहानुभूती दाखविणारे असतात. असे शत्रू कधीच कळत नाहीत. तसेच त्यांचे शत्रुत्व आपल्याशी आहे हेदेखील आपल्याला सहजतेने कळत नाही. हे लोक सदैव आपल्या प्रगतीच्या आड येत असतात. त्यांचे शत्रुत्व न कळल्यामुळे आपणदेखील नाही नाही त्या गोष्टींचा आटापिटा त्यांच्याबरोबर करतो. परिणामतः आपणच आपल्या शत्रूंना माहिती करवून देऊन, आपणच आपल्या प्रगतीच्या आड येतो. हे आपल्याला कळायला खूप वेळ लागतो. ऋण, वैर, हत्या या सर्व गोष्टींचा संबंध हा मागील जन्माच्या कृतींशी असतो. त्यामुळे बुद्धीच तशी होऊन अशा घटना घडू लागतात.
कठोर परिश्रम :-कठोर परिश्रमांची सगळ्यांची तयारी नसते. सकारात्मक विचारांनी अव्याहत, अविश्रांत प्रयत्न करत राहणे हे सर्वांनाच जमत नाही. शरीररचना, आपली इंद्रिये, मन, ग्रह आदी जेव्हा आपल्याला साहाय्यभूत असतात, तेव्हाच ते शक्य होते. शक्ती आहे, बुद्धी आहे, परिस्थिती आहे तरी अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचे विचार किंवा बुद्धी होत नाही. उलट बेफिकीर वृत्ती झालेली दिसते. ती एवढी, की आपली अशी वृत्ती झाली हे आपल्याला समजतही नाही. जाणीव दिल्यावर ती तेवढी मान्यही होत नाही.
मानसिक असंतुलन :-सर्व व्यवहार चांगले चालू असताना एकाएकी विचारांमध्ये, मानसिकतेमध्ये फरक पडून आपले पूर्ण परिवर्तन घडल्याचे इतरांच्या लक्षात येते. सर्वतोपरी चांगला वागणारा माणूस एकाएकी वेड्यासारखा का वागू लागला, हे कळत नाही. त्याचा विवेक गेलेला असतो. तो आप्तेष्टांना ओळखायला तयार नसतो. एक प्रकारची क्रूरता त्याच्यात दिसते आणि वेड्यांच्या इस्पितळात त्याच्यावर उपचार करावे लागतात. तिथेदेखील अति क्रूरतेने त्याच्यावर उपचार केले तरी त्याची त्याला जाणीव नसते. पूर्वीचा समतोल पूर्णपणे हरवलेला असतो. जीवाच्या जीवनप्रवासामध्ये कोणत्या जन्मात काय झाले, याचा कोणालाही अंदाज घेता येत नाही. परंतु नाथ शक्तिपीठातून त्याच्यावर जे काही वैदिक उपचार केले गेले, त्यामुळे असा होरपळलेला जीवदेखील शांत होऊन पूर्ववत झाला. मानसिक असंतुलनामुळेच तर ‘वाल्या कोळ्या’ला आपल्या प्रवृत्तीचा अर्थबोध झाला नाही. मानसिक संतुलन असते, तर चांगले-वाईट ह्याचे ज्ञान ताबडतोब त्याला झाले असते.
वाल्या कोळ्याच्या घटनेवरून हे लक्षात येते, की एकदा कुकर्माला सुरवात झाली की केवळ आध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर किंवा योग्य मार्गदर्शक भेटल्यावरच त्या जीवनात चांगला बदल घडू शकतो. अन्यथा ते संपूर्ण जीवनच व्यर्थ जाईल.
‘लिहिले न भाळीं त्याने, वात्सल्य, प्रेम विधीने |
पण दोष ना कुणाचा, हा भोग संचिताचा ॥
पितरांचा संबंध :-मनुष्य जन्माला आला की केव्हा ना केव्हा तो मरणारच. घराघरांतून हेच होणार. हे जर खरे आहे तर मेलेल्या लोकांचा, पितरांचा सद्यजीवित लोकांच्या जीवनावर काही परिणाम होतो का? काही लोकांच्या जीवनात तो परिणाम चांगला होतो, तर काही लोकांच्या जीवनात तो परिणाम वाईट होताना दिसतो. प्रत्येकाच्याच जीवनात गेलेल्या आप्तेष्टांचे काही ना काही महत्त्व असते. मेलेल्या व्यक्तींच्या आशाआकांक्षा, इच्छा ह्या एवढ्या प्रभावी असतात, की त्यांचा मागे राहणार्या लोकांच्या जीवनावर एवढा प्रभाव असावा, की सद्यजीवन हे विचलित होऊन जावे.
जीव जन्माला आल्यावर त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याच्या जीवनाबद्दल अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढणे हे एक स्वतंत्र ज्योतिषशास्त्र आहे. या ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ग्रहांचा, पूर्वजन्मीच्या कृत्यांचा, ग्रहांच्या एकमेकांच्या परस्परसंबंधांचा, नक्षत्र-तारांगणाचा, नक्षत्र तथा ग्रहभ्रमणांचा, तसेच चंद्र-सूर्यमंडलाच्या भ्रमणाचा, खगोलशास्त्राचा आपल्या जीवनावर खरोखरच परिणाम होतो काय?
पितर :-श्रद्धेने पितरांना उद्देशून विधिवत हविर्युक्त पिंडप्रदानकर्म करणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धाद्वारे पितरांना जे संतुष्ट करतात त्यांना पितरांचे आशीर्वाद मिळतात, ते असे :
‘आयु:कीर्ति बलं तेजो धनं पुत्रं पशुं स्त्रिया:| ददन्ति पितरस्तस्य आरोग्यं नात्र संशय:॥
आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पूत्र, पशू, स्त्री व आरोग्य हे सर्व काही जर आपले पितर आपल्याविषयी संतुष्ट झाले तरच आपल्या पुत्रादिकांना देतात. आपले पितरच आपल्या कुलाचे रक्षण करतात. म्हणून त्यांना श्राद्धादी कर्मांनी संतुष्ट केले पाहिजे. जर श्राद्ध केले नाही तर हे पितर अनेक प्रकारांनी उपद्रव देतातम ग ते पितर पितृलोकातील असोत अथवा प्रेतयोनीतील असोत. ते पंचमहाभूतांतील वायूरूपानेच असतात. आपला हविर्भाग घेण्यास ते वायूरूपानेच येतात.
पितरांना संतुष्ट केले नाही तर भूत, प्रेत, यक्ष, गंधर्व, राक्षस, शाकिणी, रेवती आदींच्या स्वरूपात पीडा उत्पन्न होतात. हे कसे समजते, तर घरात अशांतता निर्माण होते. थंडी वाजून एक दिवसाच्या, तीन दिवसांच्या, पंधरा दिवसांच्या अंतराने ताप येतो. घरात निरनिराळे वाद अकारणच निर्माण होतात. घरातील सुखशांती ढळते. विवाह आदी मंगलकार्यांत विनाकारण विलंब होतात. व्यवसायात अपयश येऊ लागते. मृत व्यक्ती स्वप्नात येतात. समृद्धीला उतरती कळा लागते. हे सर्व टाळण्याकरिता पितरांना संतुष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. मनुष्याने गृहस्थाश्रमात पदार्पण केले की त्याला सामान्यत: संतती ही होते. जीवनात जर इच्छा अपुर्या राहिल्या तर सांसारिक जीवन असमाधानी व असंतुष्ट राहते. जसजसे हे असंतुष्टतेचे प्रमाण वाढते तसतसा माणूस ज्योतिषशास्त्राकडे वळतो आणि तेथूनच तो धार्मिक कर्माकडे, अनुष्ठानाकडे आकर्षित होऊ लागतो.
परद्रव्याचा अपहार केल्याने अथवा आपल्या वासनांमुळे जीव प्रेतयोनीत जातो. प्रेतयोनी ही स्वतंत्र योनी आहे. अतृप्त आत्म्यांच्या बर्याच घटना ऐकिवात येतात. मानवयोनीप्रमाणे भूत, प्रेत, पिशाच्चयोनी आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत देशांतदेखील त्याचे संशोधन झाले आहे.
मृत्यूनंतर अतृप्त आत्मे आपल्या शरीरासह दृष्टीस पडतात अगर दुसर्याच्या शरीरात प्रवेश करून आपल्यास यातना निर्माण करतात. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने या विषयावर संशोधन केले आहे. प्रेतयोनीतले काही जीवात्मे उपकारी, तर काही उपद्रवी असतात. त्यांना कृतकर्माचे प्रायश्चित्त म्हणून यातना भोगाव्या लागतात. त्या पूर्ण झाल्यावर ते सद्गतीची इच्छा करतात. सांसारिक आसक्ती, ईर्षा, द्वेष, मत्सर वा अपमृत्यू झाला तर असे जीव प्रेतयोनीत जातात. कित्येक घराण्यांत हे मृतात्मे पीडा निर्माण करतात. जीवनातील आरोग्य बिघडते. व्यवसायात अपयश, विवाहाला विविध प्रकारचा त्रास होतो. हे आत्मे अदृश्य पीडा निर्माण करतात. ज्या ठिकाणी गुप्त धन आहे, त्या ठिकाणींदेखील धनाच्या शुद्धीकरणाची आवश्यकता असते. शुद्धीकरणानंतर वापरलेले धन हे जीवनात त्रास देणार नाही. जीव प्रेतयोनीत गेलेल्या मानवी शरीरामध्ये साधारण मानवांपेक्षा जास्त प्रमाणात शक्ती असते. अशा व्यक्तीचे डोळे, मुख, मुद्रा, आवाज इत्यादी बदलतो. त्याच्या बुद्धीवरसुद्धा परिणाम होतो. अशा लोकांमध्ये आकाश व वायुतत्त्वाचे परिणाम जास्त होत असल्यानेच त्यांच्यात एक प्रकारची शक्ती जास्त प्रमाणात निर्माण झालेली असते.
देवांचे ऋण यज्ञाने, पितरांचे श्राद्धाने व ऋषींचे ऋण स्वाध्यायाने फिटते.
प्रेतयोनी : मानव हा देहधारी असून, आपल्या भौतिक इच्छा इंद्रियांद्वारा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. मृत्यूसमयी त्याच्या अदम्य वासना वा इच्छा पूर्ण करण्याची तडफड त्याला प्रेत योनीकडे नेते. मृत्यूनंतर आत्मा प्रेतशरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आत्म्याला भौतिक शरीराचा मोह राहू नये म्हणूनच हिंदू धर्मात अग्निसंस्कार सांगितलेला आहे.
सर्वच प्रेत-आत्मे हे त्रासदायक असतात असे नाही. काही आत्म्यांना शुभकार्य करण्याची तीव्र इच्छा असते. असे आत्मे ज्या भौतिक शरीराचा उपयोग करतात त्या माणसाचे चांगले होते, त्या व्यक्तीची उन्नती होते. परंतु दुरात्मा ज्या भौतिक शरीराचा आधार घेतात त्यांना मात्र दुःखाला नेहमीच सामोरे जावे लागते.
प्रेतपीडेची लक्षणे : अंत्येष्टी, दशान्तक्रिया झाली नाही व श्राद्धादी कमार्ंचा लोप झाला की प्रेतपीडा उत्पन्न होते. एका माता-पित्यापासून जन्म घेतल्यावर एक दुष्ट प्रवृत्तीचा निघतो, एकाला संतती होत नाही, एकाच्या मुलीच वाचतात, मुले वाचत नाहीत, धनाचा अपव्यय होऊन व्यवसायात अपयश व नास्तिकता येते, एकसारख्या आपत्ती येतात, शेतीच्या व्यवसायात अपयश, जनावरांचा एकाएकी मृत्यू, कर्जाचा बोजा होणे, व्यसन लागणे, नेहमी घरात कोणीतरी आजारी पडणे, आई-बापांशी भांडण होणे, स्त्रियांना पीडा होणे, त्यांच्या मासिक देहधर्मात अनियमितपणा येणे, गर्भपात वारंवार होणे, रोगांवर औषधोपचार करूनही उपाय न होणे, जेवताना भांडण होणे, अन्नाचे ताट लोटून देणे, सुखाचा संसार चालत असताना पत्नीचा त्याग करणे, पती-पत्नीचे मुलांचे भांडण होणे, चित्तात खिन्नता येणे, घरातील एखाद्या व्यक्तीच्या अंगात भूत, प्रेत, पिशाच्चाचा संचार होणे, पूत्र-संतती न होणे, झाली तरी ती न वाचणे वा ती मंद बुद्धीची अगर वेडसर जन्माला येणे, ही सर्व प्रेत-उपद्रवांची लक्षणे आहेत. प्रेतयोनीत गेल्यावर त्याला असह्य यातना होतात.‘पितर’ म्हणून दिलेला हविर्भाग आत्म्याला मिळत नाही. त्याने तो बेभान, सुन्न होतो व त्याच्या मुखातून श्वासरूपाने क्रोधजन्य अग्नी उत्पन्न होतो. ज्याच्याबद्दल ईर्षा, शत्रुत्व असते त्याला प्रेतात्मा तीव्र पीडा देतो. म्हणून अतृप्त प्रेत-पितरांना सद्गती देण्याकरिता योग्य ते उपचारकर्म करणे गरजेचे आहे.
अपमृत्यूची कारणे : विष्णू व दाल्भ्य ऋषींच्या संवादात म्हटले आहे, की दुर्मरणाने प्रेतत्व येते, अशी ३६ दुर्मरणे आहेत. ब्रह्मचारी अवस्थेत, पाण्यात पडून, झाडावरून पडून, रस्त्यात चक्कर येऊन, सिंह-व्याघ्रादी हिंस्र पशूंमुळे, सर्पदंशामुळे, पलंगावरून पडून मृत्यू, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, बालहत्या, गोहत्या घडल्याने, अग्नीमुळे, दृढ बंधनाने, आत्महत्या केल्याने, विषप्राशनाने, क्षयरोगाने, विजेच्या धक्क्याने, कंठात श्वास अडकल्याने, अतिशय आहार घेतल्याने, कंठ दाबल्याने, साथीच्या रोगाने, पुत्रसंतती न झाल्याने, अपघाताने, देशांतरी मृत झाल्याने, प्रेतक्रिया दशान्त सपिंडी न झाल्याने, पंचक, त्रिपाद, दक्षिणायनात, तसेच अपरात्री मृत्यू येणे, हे सर्व मृत्युप्रकार दुर्मरणात मोडतात. त्यामुळे सूक्ष्म जीव प्रेतयोनीत जातो. त्याला नरकवास, पूमप्राशन, लोहदंडाचा प्रसार आदी यमयातना भोगाव्या लागतात. त्या भोगून पूर्ण झाल्या म्हणजे तो आपल्या कुलात पीडा उत्पन्न करतो. त्यामुळे उपद्रव होतात. याकरिता योग्य उपचार, कर्म करणे आवश्यक आहे.
प्रेतपीडा, दुर्मरण व पूर्वजन्मातील शाप ज्यांना आहेत त्यांना पुत्रसंतती होत नाही व झाली तरी वाचत नाही. याचे कारण आपल्या पूर्वजन्माची पीडा म्हणजे प्रेतशाप, पितृशाप, सर्पशाप आहे असे समजावे. त्याला अनुसरून काही स्वप्ने पडतात. अशी स्वप्ने रोज पडत नाहीत, तर केव्हातरी पडतात. पुरुष किंवा स्त्रियांना स्वप्नात सर्प, नाग दिसणे, त्याला मारणे, त्याचे तुकडे झालेले पाहणे, नदी, तलाव, विहीर, समुद्र यांचे पाणी दिसणे, पाण्यात पडून त्यातून वर निघण्याचा प्रयत्न करणे, भांडण झालेले पाहणे, भांडणात आपण सापडलो असे पाहणे, एखादे घर कोसळत आहे असे दिसणे, झाडाची फळे, विधवा स्त्री दिसणे, ज्यांची मुले जगत नाहीत त्या स्त्रियांना मृत मूल दिसून ते आपल्या मांडीवर आहे, जिवंत आहे, असा भास होणे, ही सर्व शापसूचक स्वप्ने आहेत. हा पूर्वजन्माचा दोष आहे, असे समजून तो दूर करण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पितृदोष : पितृदोष याचा अर्थ आई किंवा वडिलांच्या मृतात्म्याशी नसून घरातील, घराण्यातील विविध मृतात्म्यांशी किंवा मित्र-आप्तेष्टांशी अथवा जवळच्या प्रेमसंबंधीयांशी असतो. विविध संबंधांतल्या मृतात्म्यांच्या अतृृप्त इच्छांचा ह्या दोषांशी संबंध असतो. फार थोडी माणसे मरण्यापूर्वी आपल्या इच्छा पूर्ण व्यक्त करून स्वतःला इच्छामुक्त मरण प्राप्त करतात. बहुतांश लोक आपल्या इच्छा सदैव मनातल्या मनातच दाबून मृत्युमुखी जातात. पूर्वजांपैकी कोणाचा आपल्यावर कोणत्या प्रकारचा रोष आहे, हे समजणे फारच आवघड आहे. परंतु आर्थिक आणि भौतिक सुखांसाठी पितरांची आपल्यावर प्रसन्नता असणे आवश्यक आहे. संत-सज्जन मंडळी सोडली तर बाकी सर्व लोक आपल्या अव्यक्त इच्छेनेच अतृप्त असतात. त्यांची अतृप्ती कुटुंबामध्ये ज्याच्याकडून पूर्ण होण्याची शक्यता आहे अथवा ज्या प्रेमसंबंधांकडून पूर्ण होऊ शकतात, त्यांच्याच मागे हा त्रास जास्त असतो. पितरकर्म केव्हा कुठे आणि किती वेळा करावे लागते, म्हणजे मागे लागलेले पितर सुटतील, याचा अंदाजच करता येत नाही, हीदेखील माणसाची दैवगती आहे. कर्माच्या माध्यमातूनच माणूस यातून बाहेर पडू शकतो. स्वप्नावस्थेमधून पितरदोष लक्षात येऊ शकतात. पितरदोष गेला हे समजण्याचे साधन म्हणजे ज्या त्रासाने पितर मागे लागले आहे असे जाणवते, तो त्रास बंद होणे, हाच आहे.
कालसर्पयोग : कालसर्पयोगाचा विचार करण्यापूर्वी राहू व केतूंबद्दल प्रथम विचार केला पाहिजे. कारण राहू हे सर्पाचे मुख असून, केतू हे शेपूट आहे. या दोन ग्रहांमुळे ‘कालसर्प’ योग होतो. अनेक ज्योतिर्विदांनी ठरविलेला असा हा योग आहे. प्राचीन ग्रंथांत याचा उल्लेख सापडत नाही, पण याला योग मात्र दिलेला आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी सिंहिका हिच्यापासून राहूचा जन्म झाला. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेले अमृत घेण्याकरिता राहू हा देवसमूहात बसला होता. तो अमृतप्राशन करणार हे चंद्र-सूर्याने पाहून मोहिनीला इशारा देताच मोहिनीरूप विष्णूने त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे पूर्व भाग राहू व उत्तर भाग केतू झाला. त्या वेळेपासून त्यांना नवग्रहात स्थान मिळाले आहे. कालसर्पयोग जैन ज्योतिषग्रंथातून रूढ झाला असावा.
राहू-केतूचे महत्त्व : राहू व केतू हे आकाशात न दिसणारे ग्रह आहेत. चंद्राचा भ्रमणमार्ग पृथ्वीच्या भ्रमणमार्गास ज्या दोन ठिकाणी छेदतो त्या एका बिंदूला राहू व दुसर्याला केतू असे म्हणतात. हा शोध मागाहून लागला असला तरी ऋग्वेद, अथर्ववेद यात यांचे मंत्र आहेत. अथर्ववेदात ग्रहणे व या छेदनबिंदूचा उल्लेख आहे. बृहत्जातकात फक्त सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र व शनी या सात ग्रहांचा विचार केला आहे. वराहमिहिरांनी राहू चार नावाचे प्रकरण उद्धृत केले आहे, त्यामुळे राहूचे महत्त्व स्पष्ट झाले, पण फलज्योतिषात हे ग्रह म्हणून साधारण सातव्या किंवा आठव्या शतकापासून ओळखले जाऊ लागले असावेत.
राहू हा शुभ स्थितीत असता भाग्यदायक व पराक्रमी असतो. त्याचे प्रभुत्व मंत्र, तंत्र, अघोरी विद्यांच्या ठिकाणी असते आणि हा दूषित असता स्मृतिनाश, अपकीर्ती, पिशाच्चबाधा, संततीला अपाय करतो. राहू हा सर्पाचे मुख असल्याने काही पत्रिकांना तो शाप ठरतो. शुभ स्थितीत असताना उत्तम वैभव देतो. राजयोग उत्पन्न करतो. हा वायू तत्त्वाचा तमोगुणी ग्रह असून वक्र गतीने भ्रमण करतो. जन्मपत्रिकेवरून समजणारे हे दोष ढोबळमानाने दिेले आहेत. सद्यजन्मात घडणार्या गोष्टी ह्या केवळ आपल्या चुकींमुळे घडतात असे नसून, आपल्या पूर्वसंचितामुळेच त्या घडतात, हे दाखविण्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्राची ढोबळमानाने चर्चा केली आहे. सूर्यमंडल, ग्रहमंडल ह्यांचे परिणाम कसे असतात, हे ढोबळमानाने कळावे, ह्या दृष्टीने हे थोडक्यात सांगितले आहेत.
**********************************************************
कर्म करताना बुद्धी चांगली दे | कर्म करताना देह हा पडू दे |
कर्म करताना पूजा तुझी होवो | निश्चयाचे बळ सदा अंगी राहो |
**********************************************************