☼ आत्म्यावर कर्माचे संस्कार कसे होतात? ☼
आत्म्यावर संस्कार हे केवळ आपल्या दैनंदिन कृतीतूनच होतात. कृती ही जाणीवपूर्वक असू शकते किंवा अनवधानाने होणारी असू शकते. प्रत्येक कृतीचा परिणाम हा आत्म्यावर होणारच. ज्या कृतींमध्ये मनाचा संबंध आहे, ज्या कृतींमुळे मनाला खूप चांगले वाटते, तसेच ज्या कृतींमुळे मनाला दु:ख ते वा वेदना होतात, त्याचा परिणाम हा आत्म्यावर कोरला जातो. आपल्या कृतींचा परिणाम आपल्याला ताबडतोब जाणवतो. चांगल्या कृतींचा, कर्माचा परिणाम चांगला होतो, तर वाईट कृतींचा परिणाम वाईट होतो. नामस्मरणाच्या माध्यमातून, तसेच सद्गुरूच्या सेवेने वा कृपेने आत्म्यावर चांगले परिणाम घडतात. माणूस सज्जनतेने आयुष्यभर वागला तर चांगलेच परिणाम होतील. दुष्ट हेतूने, दुष्ट कृतींनी वागला तर वाईट परिणाम घडून पूढील जीवन कष्टी व दु:खदायक होईलच. देहत्यागानंतर जीवाचा पूढील प्रवास हा देहाची विल्हेवाट लावून, भस्म करून होतो. दहनानंतर सूक्ष्म देहाचा पिंड, माणसाची पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये, पंचप्राण, मन व बुद्धी अशा एकूण १७ घटकांचा बनतो.
आता आपण नामस्मरणाचा कसा परिणाम होतो हे पाहू :
आजकाल प्रत्येक जणच एकमेकाला सांगतो, की नामस्मरण करा, म्हणजे त्रास कमी होईल. अध्यात्माच्या क्षेत्रात जो तो सांगतो की नामस्मरण करा. गुरू केले नसले तरी हरकत नाही, नामस्मरण करीत राहा. नामस्मरणाने मन:शांती मिळते. आत्मिक समाधान मिळते. आध्यात्मिक दृष्टीने माणूस प्रगत होतो. नामस्मरणाने काहीच नुकसान होत नाही. केलेले नामस्मरण वायादेखील जात नाही. आपल्याला जमेल तसे नामस्मरण करीत राहिल्याने सर्वकाही आपोआपच होईल. समाजामध्ये नामस्मरणासंबंधी असलेले हे विचार म्हणजे सांगणार्याचा नामस्मरणाविषयी असलेला गैरसमज आणि नामस्मरण करणार्याचा अविवेकीपणा फक्त लक्षात येतो. नामस्मरण कधी वाया जात नाही, हे विधान म्हणजे बर्याच वेळा सांगणार्याचे केवळ अज्ञान दिसते, तसेच जो ऐकतो त्याचे अज्ञान व त्याविषयी असलेले त्याचे अपसमज लक्षात येतात.
तत्त्वत: नामस्मरण करावे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. तोच खरा सगळ्यांत सोपा मार्ग आहे. पण नामस्मरण म्हणजे काय, ते केव्हा आणि कसे केले तर ते योग्य आहे, कोणत्या परिस्थितीत हे नामस्मरण आपल्या कामी येऊ शकते, हे प्रथम समजून घेणे जरुरीचे आहे. आपल्याला आवडेल ते नाव घ्यावे, हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही देवाचे नाव घेतले तर ते देवाचेच नाव आहे, त्यात काही गैर नाही, हा समज चुकीचा आहे. देवाचे नाव घेतले तर ते वाया जात नाही हे म्हणणे जरी बरोबर असले तरी ते कसे चुकीचे आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. केव्हातरी कोणत्यातरी जन्मात ते कामात येईलच. ते वाया निश्चित जाणार नाही. परंतु केव्हातरी ते कामास यावे, ह्या उद्देशाने ते घेतले जात नाही; तर ह्याच जीवनात सद्यपरिस्थितीतच ते कामाला येऊन माझे दु:ख, कष्ट, दारिद्य्र आदी भोग कमी व्हावेत, ह्या एकमात्र उद्देशाने ते घेतले जात असते. कधीतरी केव्हातरी ते कामास यावे, हा उद्देशच नसतो आणि अशा प्रकारे घेतलेल्या नावाचा जेव्हा काहीच चांगला परिणाम झालेला दिसत नाही त्या वेळी नामस्मरणाबद्दल, देवाधर्माबद्दल, गुरुसंस्थेबद्दल विविध प्रकारचे गैरसमज होऊ लागतात. परिणामत: आध्यात्मावरचा विश्वास हळूहळू उडू लागतो आणि हे सर्वच खोटे आहे, अशी आपली धारणा होऊ लागते.
सुरुवातीलाच वाल्मीकींच्या जीवनाचा उल्लेख केला आहे. ज्या वेळी रामावतार झाला नव्हता, व्हायला खूप अवधी होता, ज्या वेळी ‘राम नाम’ माहीतदेखील नव्हते, अशा वेळी नारदाने त्याला ‘राम राम’ म्हणत राहावयास सांगितले. वाल्याला ‘राम राम’ म्हणतादेखील येत नव्हते. तो ‘मरा मरा’ असेच म्हणत म्हणत उर्वरित जीवन कंठू लागला. आपल्या जीवनातील आसक्ती जाऊन तप:साधनेत तो एवढा तल्लीन झाला, की त्याचा संपूर्ण देह वारुळात डुबला तरी त्याला काहीच भान राहिले नाही. वाल्याचे वाल्मीकी ऋषी झाले आणि रामजन्मापूर्वी संपूर्ण रामायण त्यांनी लिहिले. हे सर्व केवळ ‘रामनामा’मुळे घडले. वाल्या कोळ्याच्या संपूर्ण जीवनाला जी कलाटणी मिळाली ती केवळ नारदमुनींमुळेच. वाल्याचे प्राक्तन, पूर्वजन्मीचे सुकृत, प्रारब्ध वगैरे लक्षात घेऊनच नारदमुनी वाल्याकडे गेले होते. ब्राह्मणाचा वेष घेऊन नारदमुनींनी वाल्याला त्याच्या चुकीच्या कर्मांची जाणीव दिली आणि त्याला तप:श्चर्येला बसविले.
वाल्याचे वाल्मीकी ऋषी झाले हे केवळ ‘रामनामा’ने, हे कसे, हे समजून घेणे जरूर आहे. वाल्याने ‘रामनाम’ आपल्या मनाने सुरू केले नाही, आपल्याला आवडते म्हणून सुरू केले नाही, तर ते केवळ नारदमुनींनी सांगितले होते. नारदमुनी म्हणजे ब्रह्मर्षी. अंतर्ज्ञानी, त्रिभुवनात स्वैर संचार करणारे. ब्रह्मदेवाचे मानसपूत्र आणि भगवान विष्णूचे परमभक्त. संपूर्ण ब्रह्मांडाची योजना म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचेच कार्यक्षेत्र चालविणार्या शक्तीचे आणि कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवणारे हे नारदमुनी. सदैव भगवान विष्णूच्या सान्निध्यात असणारे नारदमुनी आहेत.
या नारदमुनींनी रामनाम घेण्यास सांगितले म्हणून हे घडले. संपूर्ण आध्यात्मिक सामर्थ्याची जोड होती, संपूर्ण आधार हा नारदमुनींचा होता म्हणून हे घडले. अन्यथा हे घडलेच नसते. आजही समाजामध्ये १३ कोटी रामनामाचा जप केलेले लोक आहेत, पण त्यांना रामाचे साधे दर्शनदेखील झालेले नाही.
पुनर्दाराः पुनर्वितं, पुनःक्षेत्रं, पुनः सुतः|
पुनःशुभाशुभं कर्म, शरीरं न पुनःपुनः॥
म्हणजे पत्नी काय, संपत्ती काय, जमीन शेतीवाडी काय, पुत्रादी संपत्ती काय किंवा शुभाशुभ कर्म काय, हे सर्व आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार्या गोष्टी आहेत. पण केवळमानवी देहच असा आहे, की तो मात्र पुन्हाःपुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून ह्याच जन्मात या जीवीताचे सार्थक साधणे आवश्यक आहे. ते कसे साधावे याचा अहर्निष विचार व प्रयत्न करावा.
ज्या नामस्मरणाला अखंड आध्यात्मिक कार्य करणर्या शक्तींची, सामर्थ्याची जोड आहे, त्याच नामस्मरणाला अर्थ आहे. तेच नामस्मरण प्रभावी आणि उपयुक्त ठरेल. जे अखंड गुरुपरंपरेने गुरुकार्य करीत आहेत. तेच सद्गुरू आहेत. त्यांनी दिलेले नामस्मरण करीत राहणे हेच योग्य आहे. सद्गुरू कोण, कोणाला सद्गुरू समजावे, हेही महत्त्वाचे आहे.
सद्गुरूंच्या शोधात
समाजामध्ये सद्गुरूंविषयी अनेक तर्हेचे समज आहेत. जे धार्मिक क्षेत्रात कार्य करतात, जे समाजामध्ये धार्मिक ज्ञानाविषयी सतत प्रबोधन करीत असतात, जे भागवत आदी पूराणांवर सतत प्रबोधन करीत असतात, त्यांना सद्गुरू समजण्यात येते आणि त्यांना सद्गुरू म्हणूनच संबोधण्यात येते. लीकडच्या काळामध्ये जे योगासने शिकवून शरीरस्वास्थ्याचे ज्ञान देतात त्यांना जगद्गुरू, धर्मगुरू, सद्गुरू मानण्यात येते. आज देशामध्ये निरनिराळ्या ठिकाणी मंत्रसिद्धीच्या किंवा कोणत्या प्रकारच्या शक्ती ज्यांनी संपादन केल्या आहेत त्यांनादेखील सद्गुरू समजण्यात येते. फार काय, पूजा सांगणार्या ब्राह्मणाकडूनदेखील सद्गुरू म्हणून अनुग्रह घेतला जातो.
आज काही लोक शक्तींच्या जोरावर, काही लोक सिद्धींच्या जोरावर काही ठिकाणी आपण ज्याला म्हणतो अंगात येणे, त्याच्या जोरावर अशा अनेक प्रकारचे खेळ खेळून हेच लोक आध्यात्मिक ज्ञानाचा देखावा करून समाजाची दिशाभूल करीत आहेत. जे कोणी संत होऊन गेले त्यांच्या नावावर आध्यात्मिक संपदा असल्याचे भासवून समाजाची दिशाभूल करणारे बरेच लोक आहेत; परंतु हे काही आध्यात्मिक सद्गुरू असू शकत नाहीत.
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे, ‘‘गुरू पाहता पाहता लक्ष कोटी| बहुसाल मंत्रावळी शक्ती जे तेचि मोठी | मनीं कामना चेटके घात माता | जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ जगात आणि जीवनात गुरूंची काहीच कमतरता नाही. अनंत कोटी गुरू अस्तित्वात आहेत. परंतु ज्यांना अखंड गुरुपरंपरेने गुरुपदाचा अधिकार मिळाला आहे, तेच खरे गुरू होत. तेच खरे सद्गुरू होत. आपल्याच इच्छा वा मनोकामना पूर्ण करणारे लोक सद्गुरू कसे असू शकतील?
सद्गुरू हे आध्यात्मिक ज्ञान देतात, आध्यात्मिक उन्नती करून देतात. माणसामधले काम, क्रोध, मद, मत्सर हे विकार कमी करतात. त्याला सज्जन, सत्प्रवृत्त करतात. त्याच्यात ईश्वरप्रेम निर्माण करतात. त्याचा भक्तिभाव वाढवितात. संसारामध्ये त्याला सर्व तर्हेचे मार्गदर्शन करतात. त्याला ते गुरुपदी नेण्याच्या दृष्टीने घडवीत असतात. त्याच्यावर शुद्ध प्रेम करून त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन करीत असतात. ‘ईश्वरू होय जरी कोपीता| गुरू रक्षेल परियेसा | परी गुरू कोपेल एखाद्यासी | कोणी न रक्षे तयासी ॥ ही सद्गुरूंची ओळख आहे. ज्याची ईश्वरावरदेखील सत्ता आहे तो सामान्य गुरू कसा असेल ? जे विधिलिखित आहे त्याच्यात कोणीच बदल करू शकत नाहीत, परंतु सद्गुरू ते सहजतेने करू शकतात, हे त्यांचे सामर्थ्य आहे. शिष्याच्या कर्मानुसार पाहिजे तो बदल सद्गुरू करू शकतात. तत्त्वत: पाहिले तर ब्रह्मा, विष्णू, महेशरूपी भगवान दत्तात्रेय हेच सर्वांचे गुरू आहेत. जी कोणी व्यक्ती गुरू म्हणून कार्य करीत असेल तिच्यावर भगवान दत्तात्रेयांचेच नियंत्रण आहे.
आज समाजामध्ये निरनिराळे पंथ कार्य करीत आहेत. काहींना परंपरा आहे, तर अनेकांना परंपरा नाही. परंतु नाथ संप्रदाय असा आहे, की जो केवळ गुरू-शिष्य परंपरेनेच कार्य करीत आहे व भगवान दत्तात्रेय हेच स्वत: ह्या पंथाचे प्रमुख दैवत, आराध्य दैवत आहे. जेव्हापासून नवनाथांनी अवतारी कार्याला सुरवात केली आहे तेव्हापासून हा पंथ अखंड गुरुपरंपरेने कार्यरत आहे. आजही हा पंथ शिस्तबद्ध व कडक आहे. पंथाचे विभूतिमाहात्म्य आजही टिकून आहे. अशा परंपरेतील सद्गुरू मिळणे हे केवळ भाग्य आहे.‘पानी पीना छान के| गुरू करना जान के|’
संपूर्ण सृष्टीचा आधार असलेल्या वेदमंत्रांच्या माध्यमातून बदल करणे शक्य आहे का, प्रभावी उपासना, यज्ञयागादी कर्मांच्या व वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याचे पूनरुज्जीवन कसे होते हे आपण पाहू.
‘योगी म्हणोनि म्हणती कोणी कीर्तिगान गाती |
मज लोभ ना कशाचा, हा मार्ग स्वकर्माचा ॥
कर्म असे असावे, की जे केल्यावर समाधान मिळेल. ज्या उद्देशाने केले तो उद्देश साध्य हाईल. होणारा त्रास कमी होऊ लागेल. जीवनातील अडसर दूर होऊ लागतील. जीवन सुखावह वाटू लागेल. प्रारब्ध, भोग, कर्मदोष, जीवनातील विविध अडसर हे यथायोग्य कर्म केल्याने दूर होतात. कर्म हे प्रत्येकाला करावे लागते. साधू, संत, महात्मे यांनादेखील कर्म सुटलेले नाही. असे प्रभावी कर्म गुरूंच्या आशीर्वादाने आणि नाथ पंथाच्या सिद्धतेवर आधारित पूजाविधींनी नाथ शक्तिपीठ, अकोला येथे केले जाते.
ह्या पूजा फक्त नाथ शक्तिपीठ, अकोला येथेच होतात. अन्यत्र होत नाहीत. पूजेला लागणारे विधान, मंत्रसमुच्चय, कारिका संकल्प आदी नाथ शक्तिपीठानेच तयार केले आहे. हे तयार करताना विविध समस्यांचा विचार करून मंत्रांची योजना केली आहे. अनेक प्रकारचे लोकांचे सुख-दुःख लक्षात घेऊन त्यांच्या पीडा, दुःखे लक्षात घेऊन या पूजेचे विधान तयार केले आहे.
पूजेला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य हे नाथ शक्तिपीठातून उपलब्ध केले जाते. ज्यांना पूजा करायची असेल त्यांना पूजेला हजर राहावे लागते. एवढेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या दिवशी पूजेचा मुहूर्त असेल, त्याच दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत स्नानादी कर्म आटोपून तेथे हजर राहावे लागते. एकाच दिवशी सध्याच्या क्षमतेप्रमाणे तीस व्यक्तींची पूजा करता येते. त्यापेक्षा जास्त व्यक्तींची पूजा एका दिवशी होऊ शकत नाही. म्हणजेच एका दिवशीच्या मुहूर्तावर होऊ शकत नाही. मुहूर्त बदलला की दुसरा मुहूर्त लगेचच येईल असे काही खात्रीपूर्वक सांगता येत नाही. सतरा वर्षे झाली, अनेकविध लोकांची या तर्हेची पूजा येथून केली जात आहे.आजपर्यंत असंख्य लोकांच्या पूजा नाथ शक्तिपीठातून केल्या आहेत. निरनिराळ्या वयोगटांतील, निरनिराळ्या स्तरांतील, निरनिराळ्या गावांतील, निरनिराळ्या जातींतील, निरनिराळ्या कारणांनी या प्रकारच्या पूजा केल्या आहेत. आतापर्यंत अनेक पूजा येथून केल्या गेल्या असतील. आतापर्यंत केलेल्या सर्वच पूजा ह्या यशस्वी झाल्या आहेत. ज्या कारणांचा व दोषांचा आतापर्यंत ऊहापोह झाला नाही, त्या सर्व प्रकारच्या दोषांसाठी शक्तिपीठातून सल्ला घेऊन अशा प्रकारची पूजा करता येईल.
तीन प्रकारच्या पूजांचे विधी
एशं नैव गजं नैव व्याघ्रं नैव व नैव च |
अजापूत्रं बलीं दद्योद्देवो दुर्बल घातक: ॥
म्हणजे घोड्याचा बली देत नाहीत, हत्तीचा बळी देत नाही, वाघाचा तर देतच नाही. बली हा बोकडाचा देतात. म्हणून लोकांना असे वाटते, की देव
देखील दुर्बलांचा घातक आहे. परंतु माणसाचा हा भ्रम आहे. स्वकर्म माणसाला तारुन नेते. योग्य कर्म केले तर अशा प्रकारचे नकारात्मक विचार येत नाहीत. तीन प्रकारच्या पूजांनी सतेज कर्माचा अनुभव आपण घेऊ शकतो. या तिन्ही पूजांमध्ये प्रभावी व परिणामकारक मंत्रांची योजना केली आहे.
१) श्रीविष्णूची पूजा २) ग्रहग्रहण पूजा व ३) वैदिक उपचार
ह्या पूजांची माहिती पूढे देत आहे.
१. श्रीविष्णूची पूजा ही केवळ ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच्यासाठीच असते. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पूजा करणार्यावरच होतो. कोणत्याही प्रकारच्या नातलगाला ह्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही.
ही पूजा फक्त अमावस्येलाच होते. प्रत्येक अमावस्येला ही पूजा होत नाही, तर ज्या अमावस्येचे फळ हे प्रकृतिमानाला चांगले असते, अशाच अमावस्या निवडून त्या अमावस्येला ही पूजा करतात. अनेक औषधोपचार करून प्रकृतीत सुधारणा होत नाही किंवा अतिधीम्या गतीने होते. विवाहामध्ये विविध प्रकारचे अडथळे येत असतील, विवाहयोग लवकर जुळून येत नसतील, घरामध्ये कलह असतील, काही व्यक्तिगत बाबी- ज्या खुले आम बोलता येत नसतील, अशा गोष्टींसाठी ही पूजा करण्यात येते. ह्याशिवाय इतरही बाबींसाठी ही पूजा करण्यात येते, परंतु व्यक्तिगत दोष व जन्मपत्रिका ह्याचा विचार करून ती ठरविली जाते. पूजेचा उद्देश जन्माबरोबर आलेल्या प्राकृतिक दोषांचे निराकरण करण्याकरिता, वंश-परंपरागत आलेल्या रोगांसाठी, असामान्य रोगांसाठी, प्रकृती अस्वास्थ्यासाठी, गतजन्मीच्या कुयोगामुळे, सद्यजीवनामध्ये शरीरस्वास्थ्याला होणारा त्रास दूर करण्यासाठी या पूजेचे प्रयोजन केलेले आहे. जे आनुवंशिक रोग आहेत. दीर्घ काळ टिकणारे रोग आहेत, काहीही कारण नसताना आपल्यामागे लागलेले रोग आहेत त्यासाठी या पूजांचे आयोजन आम्ही केलेले आहे. जन्मतःच शरीरामध्ये निर्माण झालेल्या व्याधी, तसेच कर्माच्या अभावी निर्माण झालेले व्यंग वा दोष, जीवनातील उत्साह, तसेच नकारात्मक विचार काढण्यासाठी या पूजेची योजना केली जाते. भूक न लागणे, जेवण न जाणे, वातदोष, कफदोष, पित्तदोष हा जिथे कमी होत नाही तिथे या पूजेची योजना केली जाते. गतजन्मीच्या कुयोगामुळे विवाहसंबंध लवकर न होणे, तसेच विवाह झाल्यावर अकारणच अपत्य न होणे यावर, तसेच सुदृढ आणि चांगल्या शरीरयष्टीचे बालक जन्माला यावे यासाठीदेखील याचा प्रयोग केला जातो. विवाहानंतर सांसारिक सुखाचा अभाव असेल तरीही या पूजेचा उपयोग केला जातो.
बुद्धिमत्तेचा विकास कमी असणे, मनामध्ये निरुत्साह असणे, शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येणे, ऐन परीक्षेच्या वेळेला आजारी पडणे, झोप जास्त येणे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसणे, तसेच अयोग्य पद्धतीने निर्माण होणार्या शारीरिक पीडा, तसेच अन्य प्रश्न याच पूजेच्या माध्यमातून हाताळले जातात. चिडचिडा स्वभाव, स्वभावाची अस्थिरता, मनाची अशांतता घालविण्यासाठी या प्रकारच्या पूजेचा अवलंब नाथ शक्तिपीठात होतो. करणी, बाधा आदी प्रकारांनी त्रस्त असलेल्या जीवासाठी नाथ शक्तिपीठातून पूजा केल्या जातात. या पूजेचा परिणाम सर्वांगीण विकासासाठी केला जातो.
आजच्या चढाओढीच्या युगामध्ये ज्या विविध कारणांनी आपण स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची गरज आहे किंवा स्पर्धेमध्ये अग्रेसर राहायचे आहे, अशा वेळीदेखील या पूजांचा उपयोग होतो किंवा पूजा केल्या जातात. आर्थिक विवंचना, ऋण आदीसंबंधीचे प्रश्न, अकारण असलेले वैमनस्य या पूजांनी दूर केले जाते. जीवनातील अनेक प्रकारचे योग- ज्यामुळे दैनंदिन जीवन अशांत होऊन दिशाहीन झालेले आहे, निरुत्साह खूप वाढलेला आहे, बहुतांश दिवसाचा वेळ हा विवंचनेत किंवा निराश मानसिक अवस्थेत जात आहे, त्या वेळीदेखील या पूजेची योजना केली जाते. ही पूजा सकाळी सुरू होते व साधारणपणे तीन तास चालते. पूजा झाल्यावर आरती नंतर नैवेद्य दाखवून सर्वांचे भोजन आदी होते.
त्या पूजेमध्ये वर उल्लेखिलेल्या समस्यांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून निरनिराळ्या मंत्रसमुच्चयांचा एक पाठ केला आहे. गुरुकृपा व पंथाची सिद्धता केवळ ह्यांच्या साहाय्याने कार्यभाग चांगल्या तर्हेने साधला जातो.
ह्या एकाच पूजेमध्ये विविध तत्त्वांचा समुच्चय मंत्राच्या माध्यमातून केला आहे. साधारणपणे ह्या प्रकारची पूजा जीवनामध्ये एकदाच केली जाते. प्रत्येक व्यक्तीचे भाग्य, भोग, शरीरक्रिया आदी सर्वच जसे ज्याचे त्यालाच करणे भाग पडते, तसे प्रत्येकाचे शरीर वेगळे, भोग वेगळे. सर्वांच्या समस्या ह्या व्यक्तिगत समस्या आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय हे कार्य ब्रह्मांडाच्या नियमानुसार ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे आहे. जीवाची उत्पत्ती झाल्यानंतर त्याचा जीवनकाळ संपेपर्यंतचा कालावधी हा भगवान विष्णूच्या कार्यकक्षेत येतो. त्यामुळे जन्मल्यापासून ते अंतःकाळापर्यंत विष्णूच्या सामर्थ्याचा उपयोग हा जास्त फलदायी व उपयुक्त ठरतो. जीवनातील विविध प्रकारचे रोग, कफ, वात, पित्त यापासून निर्माण होणारे रोग, आतड्यांचे रोग, अस्थींचे रोग, शरीरातील प्रत्येक भागाचे रोग वा शरीरातील कोणताही रोग दूर करण्यासाठी विष्णूच्या शक्तीचा, कृपेचा उपयोग करणे हा योग्य वस्तुलाभ आहे.
विशेषतः अमावस्येला ज्या वेळेला चंद्र सूर्याने व्यापून टाकलेला असतो, म्हणजे अमावस्येला सूर्यास्तानंतर सर्वत्र अंधकार दिसतो, नंतर कलेकलेने प्रतिपदेपासून एकेक कोर करत चंद्र हा सूर्यकक्षेच्या बाहेर येऊन दिसू लागतो तो पंधरा दिवसांनी पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. सूर्यस्थितीचा, नक्षत्र तारांगणांचा विशेष परिणाम जीवावर होताना दिसतो. काही गोष्टींना अमावस्येलाच विशेष महत्त्व असते तर काही गोष्टी अवश्य वर्ज्य असतात, ज्या अमावस्या शुद्ध व कर्मयोग्य असतात त्या अमावस्येला विष्णूच्या विशेष मंत्र समुच्चयाचा उपयोग करून मानवी जीवनाला, त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न असतो.
कोणत्या प्रकारचा आपल्या जीवनावरचा अनिष्ट परिणाम काढावयाचा असतो त्याप्रमाणे संकल्प केला जातो. हा संकल्प विविध तर्हेच्या ग्रहबाधेसंबंधी असू शकतो किंवा परिवारातील क्षेम, धैर्य, आयुष्य, तसेच ऐश्वर्यवर्धनासाठी, बालग्रह, पीडा, वृद्ध ग्रहपीडा, विविध प्रकारच्या ग्रहपीडांचे निरसन करण्याकरिता संकल्प करून या पूजाविधीचा उपयोग केला जातो. हा पूजाविधी व त्याअंतर्गत विष्णूची आराधना केली जाते. या पूजेचा विधी हा साधारणतः तीन-चार तासांचा असतो. जारण, मारण, वशीकरण आदी पीडांसाठीदेखील या पूजांचा विनियोग करता येतो. कुटुंबातील क्षेम, स्थैर्य, आयुरारोग्य याच्या अभिवृद्धीसाठी, तसेच घरातील शुद्धतेसाठी या मंत्राच्या पाठाचा उपयोग केला जातो.
नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्याच्या हेतूने वास्तूचे सर्वानुरूप चांगले परिणाम होण्याच्या दृष्टीनेदेखील या पूजांचा विनियोग करता येतो. या प्रकारच्या पूजेसाठी विष्णू, शिव, गणेश आदी देवतांच्या मंत्रांचा, तसेच उपासनेचा उपयोग केला जातो. अमावस्येला वाममार्गी लोक तंत्र-मंत्र साध्य करतात किंवा पूजेसाठी त्याचा विनियोग करतात. ज्याच्यामुळे जीवनात निरनिराळ्या प्रकारचा उपद्रव होतो, निरनिराळे रोग शरीरात निर्माण होतात, निरनिराळ्या प्रकारच्या निर्मितीमुळे रोग उद्भवतात, तसेच निरनिराळ्या ग्रहांच्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या बाधा अनुभवास येतात. निरनिराळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग वा भयानक रोग, मनस्ताप देणार्या सर्व प्रकारच्या गोष्टी वा मन अस्थिर करणार्या गोष्टी वा मनःशांती ढळवणार्या गोष्टी जीवनातून दूर करण्याकरिता काय करायला पाहिजे ह्या विषयाचे संशोधन पूलस्त्य ऋषींनी केले. ते काय केले व कसे केले म्हणजे माणूस ह्या त्रासांपासून मुक्त होऊ शकेल, हे जाणून घेण्यासाठी दाल्भ्य ऋषींनी पूलस्त्य ऋषींना सर्व माहिती देण्यास सांगितले.
पूलस्त्य ऋषींनी केलेल्या अभ्यासावरून हे का होते व काय काय केले म्हणजे मानवी जीवनातील अशा प्रकारचा त्रास कमी होतो, हे समजून सांगताना तर भगवान श्रीविष्णूंची स्तुती, आराधना करून योग्य तर्हेने पूजाअर्चा केली तर हे कसे कसे होते. हे समजावून सांगितले. भगवान श्रीविष्णूंचे सुदर्शनचक्र हे केवळ एक शस्त्र नसून, त्या सुदर्शनचक्राच्या मंत्राद्वारा दुष्टांचा संहार होतो, पापांचा क्षय होतो, आरोग्य प्राप्त होते, त्रैलोक्यात ते रक्षण करते. परयंत्र, परमंत्र, परतंत्र आदी गोष्टींमुळे भूतप्रेताच्या भय आदी व्यथा नष्ट होऊन जारणमारण विघ्नापासून संरक्षण मिळते.
सर्व प्रकारचे ज्वर, रोग आदी नष्ट होतात. ताप नॉर्मलला येतच नसेल तर ही पूजा करावी. महाभारी चेटूक, वेताळ, पिशाच्च, भुताखेतांचा उपद्रव नष्ट होतो. त्या सर्व विद्यांचा, मंत्राचा अभ्यासपूर्ण शोध घेऊन नाथ शक्तिपीठामध्ये श्रीविष्णूच्या ह्या विशेष पूजेची रचनात्मक निर्मिती करून विशिष्ट पद्धतीने ही पूजा येथे केली जाते. गेल्या १७ वर्षांत अशा पूजा अनेक लोकांसाठी केल्या व त्यामुळे त्यांचे जीवन सुरळीत व सुलभ झाले.
हा पूजाविधी अतिप्रभावी आहे. सामान्यतः ही पूजा केल्यावर प्रकृतीत सुधारणा होऊ लागते. ही पूजा केल्यानंतरदेखील त्रास विशेष कमी होत नसेल, तर ती पून्हा एकदा करावी. त्रास कमी होण्याचे प्रमाण हळू हळू असेल तर संपर्क साधावा. बाह्य बाधा म्हणजे जारणमारण, संमोहन, वशीकरण, अकारण स्तंभन, मुष्टिकरण इत्यादी गोष्टी, तसेच ग्रहपीडा म्हणजे कालग्रहपीडा, वृद्ध ग्रहपीडा, अस्तंगत ग्रहपीडा, दुष्ट ग्रहपीडा, महादशा, अंतर्दशा यातील ग्रहांचा त्रास, साडेसाती, त्या त्रासांची तीव्रता जास्त असल्यास ही पूजा करावी. त्रास जर विशेष कमी झाला नाही तर संपर्क साधावा.
२. ग्रहग्रहण पूजा :-मुहूर्त पाहून ही पूजा सोमवार किंवा गुरुवारीच होते. ह्या पूजेचा फायदा पूजा करणार्यालाच होतो. संकल्प हा ज्याचा त्यानेच करावा लागतो.
तिथी, वार, नक्षत्र यांचा परस्परयोग, तसाच अग्नीचा या सर्वांशी योग कसा आहे, हे पाहूनच विशिष्ट नक्षत्राला ही पूजा करण्यात येते. पूजाविधीला सात-आठ तास लागतात. साधारणतः सकाळी सातच्या सुमारास सुरू केलेली पूजा दुपारी २ ते २.३० पर्यंत संपते. ही पूजा कोणालाही करता येते. वस्तुतः कर्माच्या दृष्टीने कुटुंब किंवा पतिपत्नी हे एक नाहीत, भिन्न आहेत. कुटुंबातील सर्वांसाठी ही एकच पूजा आहे असे होत नाही. तसे सुखदुःख, भोग हे ज्याचे त्याला आहेत. फार काय, पतिपत्नी एक असले, कुटुंबप्रमुख तेच असले तरी प्रत्येकाचे शरीर, आत्मा भिन्न, वेगवेगळे आहेत.
या पूजेचा उद्देश जीवनातील जे विविध अडसर त्रासदायक वाटतात, ते दूर करणे हा आहे. ज्या कर्मदोषांनी जीवनामध्ये अतिशय किंवा क्लेशदायक घटना घडतात ते कर्मदोष हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. ते दूर करण्याकरिता या पूजा व्यक्तिगत होणे गरजेचे आहे. तथापि भारतीय पद्धती, तशीच संस्कृती लक्षात घेऊन पतिपत्नी मिळून एकत्र पूजा करण्याचा परिपाठ आम्ही ठेवला आहे. आई, मुलगा, भाऊ, बहीण आदी सर्वांसाठी वेगवेगळी पूजा करावी लागते. जीवनातील अप्रिय योग हे कोणत्याही जाती-जमातीच्या व्यक्तीचे असू शकतात. त्यावर जीवनातील अगर पत्रिकेतील कर्मदोष दूर करण्याकरिता ही पूजा कोणीही व्यक्ती करू शकते. मुसलमान, ख्रिश्चन, जैन, गुजराती, सिंधी आदी कोणत्याही प्रकारच्या जाती धर्माच्या व्यक्तीला ही पूजा करता येईल. ज्या जातीतल्या लोकांना ही पूजा करणे त्याच्या धर्मबंधनानुसार योग्य नसेल त्यांनीदेखील ही पूजा करणे त्यांच्याच स्वतःच्या हिताचे राहील. कर्मदोषांचा संबंध हा जातीशी, भोवतालच्या परिस्थितीशी, सामाजिक पद्धतीशी संबंधित नसून हा केवळ त्याच्या पिंडाच्या कर्माशी व स्थितीशी संबंधित आहे. मानवजात ही विशाल संकल्पना जर धरली तर त्या मानवजातीतील कोणत्याही मानवासाठी ही पूजा होऊ शकेल. ही पूजा केवळ व्यक्तिगत स्वरूपाची आहे. त्यामुळे व्यक्ती, व्यक्तीपरत्वे अनेक व्यक्तींची पूजा एकाच वेळी त्यांच्या कर्मदोषांच्या आवश्यकतेप्रमाणे केली जाते.
तिथी, वार, नक्षत्र, अग्नी या काही गोष्टींमुळे जो दिवस निघेल त्याच मुहूर्तावर ही पूजा होईल. या पूजेच्या अंतर्गत एक छोटासा हवनविधीदेखील असतो. हा हवनविधी सर्वांनी मिळून एकत्र करायचा असतो. त्याचा पूजाविधी सुरू झाल्यावर संपेपर्यंत इतर काही करायला वाव नसतो. त्यामुळे इतर सांभाळण्यासारखी कोणतीच बंधने नसतात. हा पूजाविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर कोणत्याच प्रकारचे बंधन राहत नाही. पूजा आणि पूजाविधी हा भाग पूर्णपणे संपलेला असतो. त्यामुळे विधी संपल्यावर त्याच्या त्यामागची प्रतीक्षा असते. ज्या वेळेला माणूस मनाचा निर्धार करतो आणि त्याप्रमाणे वाट्टेल ते झाले तरी निर्धाराच्या मुहूर्ताला पूजा ठरवितो. त्या प्रकारच्या अनेक माणसांचा अनुभव असा आहे, की पूजेचे परिणाम मनाच्या निर्धाराच्या अवस्थेपासून सुरू होतात. प्रत्यक्ष संकल्प हा त्यानंतरच्या काही कालावधीनंतर होतो, तरीही पूजेच्या फलश्रुती, अनुभूती पूजा सुरू करायच्या संकल्पाआधीच घेतलेली असते. बर्याच लोकांना पूजा संपवून उठताउठताच आपल्यात स्थित्यंतर होऊ लागले, आता आपला उद्देश साध्य होईल, असे जाणवते.
आपल्या भाग्यात परिवर्तन घडेल, हा विश्वास निर्माण झालेला दिसतो. मनातला उत्साह प्रचंड वाढलेला असतो. आपले सर्व तर्हेचे योग बदलू लागले आहेत, असे आंतरिक मन सांगू लागते. काही लोकांना पूजाविधी संपल्यानंतर ते पूजा झाल्यापासून सव्वा वर्षाच्या कालावधीत पूजेची फलश्रुती अनुभवास येते. कोणाला लवकर तर कोणाला उशिरा, हा सर्व भाग त्याच्या कर्मदोषाप्रमाणे होत असतो. ही पूजा झाल्यावर पून्हा त्या व्यक्तीची हीच पूजा करावी लागली, असा आमचा अनुभव नाही. या पूजेनंतर काही नित्यनैमित्तिक उपासना त्या व्यक्तीने करीत राहावी, ही अपेक्षा असते. या उपासनेचे स्वरूप दैनंदिन जीवनाच्या आड येत नाही. मनाने निश्चित केल्यावर अगदी कोणीही ही उपासना सहजतेने करू लागतो. अशी उपासना करु लागल्यावर पूजा झाल्यानंतरचे जीवन हे शिस्तबद्ध व नियमबद्ध चालू असल्याची अनुभूती येते. ही पूजा करण्यापूर्वी तर त्या उपासनेचा आणि पूजेनंतरच्या उपासनेचा कोणत्याही तर्हेचा विरोधाभास निर्माण होत नाही.
गर्भधारणा :- गर्भधारणेपूर्वी, तसेच गर्भधारणा झाल्यावर ही पूजा केली तर त्याचा परिणाम गर्भात असलेल्या बालकांवर विशेष करून चांगला होतो, असे लक्षात आले आहे. अशा अवस्थेत केलेल्या पूजेचा परिणाम बाळाच्या आईवरदेखील चांगला होतो. सुतक अथवा अशौच असताना ही पूजा केली जात नाही. जेव्हा केव्हा ही पूजा करू तेव्हा त्याचा चांगलाच परिणाम होतो, असे लक्षात आले आहे. घरात पतिपत्नीचे, बापलेकांचे, भावाबहिणींचे अथवा अन्य सदस्यांचे आपापसांत वाद होत असतील तर ते वाद कमी करून घरामध्ये शांतता व अस्थिरता प्रस्थापित करण्यासाठी या पूजेचा विनियोग केला जातो.
पैसा येतो, परंतु कितीही पैसा आला तरी तो हातात पडण्यापूर्वीच त्याचा अनपेक्षित खर्च करावा लागतो. परिणामत: नियोजनाप्रमाणे खर्च होत नाही आणि शिल्लक राहत नाही. बर्याच वेळा हा खर्च दवाखान्यासाठीच केला जातो. कोणत्याही तर्हेचे सुख, समाधान व शांती अशा खर्चापासून मिळत नाही. हे दूर करण्याकरितादेखील या पूजेचा विनियोग केला जातो.
सुस्त, शिथिल, आळशी, अकार्यक्षम व्यक्तीतील हे दोष जाऊन त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठीदेखील या पूजेचा विनियोग केला जातो.
पूण्याच्या खासगी कंपनीने आपल्या कार्यालयामधील नोकरलोकांची मनोवृत्ती बदलण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी, त्यांची निर्णयक्षमता वाढविण्यासाठी आणि जे काही काम करायचे ते मन लावून, मनापासून करण्यासाठी एकेक करीत सर्व स्टाफ करिता पूजा केली होती. त्या सर्वांचेच कल्याण झाले होते. पूजाविधी हा नाथ शक्तिपीठातच केला होता.
शाळा, कॉलेज व अन्य शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा नेटाने अभ्यास होत नाही. अध्ययन केलेल्या विषयांतील ज्ञानाचे विस्मरण होते. बुद्ध्यंक वाढत नाही, स्पर्धेमध्ये टिकणे अवघड जाते, विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते, अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी या पूजेचा विनियोग करता येतो. जीवनातील विविध तर्हेचे नैराश्य हे सहजासहजी जाता जात नाही. अनेक प्रयत्न करूनदेखील उत्साहित करणे हे खूपच जड जाते, तो माणूस उत्साहित होत नाही आणि विनाकारणच आपले आयुष्य दुःखी-कष्टी करून घेतो. या पूजाविधानांनी अशाही समस्या कायमच्या दूर होतात.
जन्मतःच मतिमंद असलेला, कोणत्याही तर्हेचे ज्ञानेंद्रिय कार्य करीत आहे असे दिसत नाही, तर केवळ शरीराचे, हाडामांसाचे पोषाण होत आहे असे दिसते, अशा व्यक्तीच्या ह्या व अन्य प्रकारच्या विविध पूजा करीत राहिले, तर अशी व्यक्ती इतर सामान्य व्यक्तीसारखे जीवन जगू शकेल असे परिणाम होऊ शकतात. अनेक प्रकारचे कर्म करताना अनपेक्षित अडथळे निर्माण होतात आणि कामाचे परिणाम दूरवर जाऊन ती कर्मे असाध्य वाटू लागतात. अनेक प्रकारचे प्रयत्न करूनदेखील कामातील अडथळे दूर होत नाहीत आणि यश लवकर पदरी पडत नाही. बर्याच वेळा यश पदरी पडता पडता निसटून जाते. कामाची दिशा मिळत नाही, मिळाली तर हळू हळू प्रगती करता करता आता आपण चांगल्या स्थितीत येणार तोच अचानक काहीतरी धक्का बसून आपणच त्या कामातून दूर फेकले जातो व पुन्हा सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतात. जीवनामध्ये यशस्वी शिखराकडे चढणे कमी आणि असफलतेकडे वारंवार ढकलले जाणे, हा अनुभव ज्यांना ज्यांना येतो त्यांनी त्यांनी ही पूजा अवश्य करावी.
पूर्वजन्मीच्या कृतींचा सद्यजन्मामध्ये विविध प्रकारचा त्रास होतो. असे गेल्या सतरा-अठरा वर्षांच्या अभ्यासावरून लक्षात आले आहे. या त्रासाची कल्पना आपल्या जन्मपत्रिकेवरून येऊ शकते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे निरनिराळ्या ग्रहांचा जो परस्परसंबंध आहे, ज्या घरात हे ग्रह बसलेले आहेत किंवा निरनिराळ्या ग्रहांची एकमेकांवर असलेली दृष्टी यावरून मागच्या जन्मातील घटनांमुळे चालू जन्मात विशिष्ट प्रकारचे त्रास अनुभवाला येतात, याचा अर्थ पूर्वजन्मीच्या कृतींचा, पितरांचा आपल्या पिढीवर एवढा परिणाम झालेला असतो, की आपल्या सद्यजीवनामध्ये घडणार्या गोष्टींचे प्रयत्न जरी आपण करीत असलो तरी त्याला वेगळीच अनुभूती येते. हीच गोष्ट प्रत्यक्ष जीवनामध्ये वेगळ्या तर्हेने पडताळून पाहता येते. स्वप्नामध्ये सर्प दिसणे, मारून टाकणे; नदी, तलाव, विहीर, समुद्र यांचे पाणी दिसणे, पाण्यात पडून पाण्यातून वर निघणे, असे प्रकार स्वप्नामध्ये दिसत असतात. एखादे घर कोसळताना पाहणे, ज्यांचे मूल जगत नाही त्या स्त्रियांना आपल्याच मांडीवर मृत मूल दिसणे, पूत्रसंतती होणे, गर्भधारणा झाली तर पून्हा पून्हा गर्भपात होतात आणि इतके करूनही मूल जन्माला आले तर ते टिकत नाही, अल्पायुषी राहते. या लक्षणांवरून हे पूर्वजन्मीचे दोष आहेत, असे समजायला काहीच हरकत नाही. पूर्वजन्मात पैशांची अफरातफर केल्यास, गैरव्यवहार केल्यास किंवा ज्या कोणत्या व्यवहारामुळे मानसिक क्लेश, दुःख खूप झाले असेल त्याचा परिणाम म्हणून या जन्मामध्ये मूल होत नाही किंवा अंगावर पांढरे कोड येते. व्यवहारात आपण फसून जाऊ, अशा तर्हेचे व्यवहार घडतात. यावरून हे पूर्वजन्मीचे दोष आहेत, असे समजायला काहीच हरकत नाही.
रोगांवर औषधोपचार करूनही रोग बरा न होणे, जेवताना भांडणे होणे, अन्नाचे ताट भिरकावून देणे, सरळ सुव्यवस्थित संसार चालू असताना अकारण पत्नीशी भांडण करणे, वाईट वागणे वा तिचा त्याग करणे, तसेच पत्नीने अशा प्रकारे वागून दुःख निर्माण करणे, ही सर्व लक्षणे पूर्वजन्मीच्याच कृतींतून निर्माण होणार्या दोषांची आहे.
आत्महत्येचा विचार येणे, सर्पदोष अथवा हिंस्र पशूंमुळे मृत्यू येणे हे पत्रिकेवरील ग्रहांवरून समजून येते. ते दोष या पूजाविधानांनी घालविता येतात. कारण घरामध्ये एकसारख्या आपत्ती येणे, व्यवसायामध्ये अपयश येणे, कर्जाचा बोजा वाढणे, व्यसनाधीन होणे, घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडणे, घरामध्ये सदैव कलह होणे, औषधोपचार करूनही रोग बरा न होणे, या सर्व प्रकारचे दोष हे प्रेतात्म्यामुळे लागलेले दोष असून, त्यांचा संबंध हा घराण्यातील पितरांशी येतो. या प्रकारचे दोष काही केल्या जात नाहीत. परंतु अशा या पूजांच्या माध्यमातून हे कमी होतात किंवा नाश पावतात, असे आमच्या अनुभवास आले आहे. अतृप्त प्रेतात्म्यांना तृप्त केल्याशिवाय भौतिक जीवन सुखी होऊ शकत नाही.
सामान्य माणसाला काही कारण नसताना विविध प्रकारच्या बाधांना तोंड द्यावे लागते. काहीतरी पूर्वजन्मीचा भाग असतो, की ज्यामुळे हा दोष माणसाला लागतो. या प्रकारच्या वामपंथी विद्यांचा एक स्वतंत्र भाग आहे. या
विद्यांचे प्रयोग माणसाला अनेक तर्हेने छळतात. या विद्येचा प्रयोग करणारा हा प्रयोग कोणावरही जरी करू शकत असला तरी तो कोणावरही होत नाही. या विद्यांचा उपद्रव होण्यासाठी त्याला लागणारा ग्रहांचा योग हा पत्रिकेत असल्याशिवाय हा त्रास होऊ शकत नाही. ज्याच्या पत्रिकेमध्ये बाधेपासून अशा त्रासांचे योग आहेत, त्यांनाच तो त्रास होताना दिसतो. ज्यांच्या पत्रिकेत असा योग नाही. त्यांच्यावर अशा विद्यांचा प्रयोग झालेला दिसत नाही. या प्रकारच्या बाधांपासून होणारा उपद्रव दूर करण्याकरिता देखील या पूजांचा उपयोग होतो.
माणसाला अनेक प्रकारचे शत्रू असतात. शत्रूचा अर्थ त्रास देणारा, छळणारा व अस्वस्थता निर्माण करणारा माणूस. हा ओळखीचा असू शकतो. आपल्याला त्याचे ज्ञान नसेल तर आपल्याला तो त्रास का देतो, हेदेखील कळत नाही. जीवनात सर्व तर्हेच्या गोष्टींमध्ये हा आड येताना दिसतो. शत्रूपासून उपद्रव असण्याचा योग पत्रिकेत असल्याशिवाय त्याला अशा तर्हेचा त्रास होऊ शकत नाही. ग्रहपीडा जी नक्षत्र, ग्रह, तारांगणाच्या भ्रमणाने आलेली असते किंवा दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतीमुळे किंवा दृष्टीमुळे आलेली असते तीदेखील या पूजेच्या माध्यमातून दूर करता येते. विवाह झाल्यावर पतिपत्नीचा परस्परसंबंध आल्यावर होणारी प्रजोत्पत्ती ही चांगली म्हणजे बुद्धिमान, शक्तिभक्तीने युक्त, जीवनामध्ये चांगले योग येणारी आणि सर्व तर्हेची सुबत्ता,तसेच चांगले शरीर, शुद्ध अंतःकरण, रंग, अंग, कांती उत्तम असणारी होण्यासाठीदेखील या पूजा महत्त्वाच्या आहेत.
आपल्या शरीरामध्ये, इंद्रियामध्ये, विचारांमध्ये, लोकांशी येणार्या संबंधांमुळे काम, धंदा, व्यवसायांमध्ये येणार्या अडचणींमध्ये, तसेच कोणत्याही प्रकारचा वारंवार त्रास होत असेल तर तो का व कशामुळे होतो, याची कारणमीमांसा आपल्या जन्मपत्रिकेच्या आधारावर, तसेच प्रत्यक्ष ज्याला त्रास होत आहे त्याला पाहून त्याच्याशी चर्चा करून नेमके काय करायला हवे याविषयीचा सल्लादेखील येथे मिळू शकतो. जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी, आपले प्रारब्ध बदलण्यासाठी आपल्या इच्छित फळप्राप्तीसाठी कोणते व काय प्रयत्न करावे लागतील आणि कोणत्या कामाचा आधार घ्यावा लागेल याचे मार्गदर्शन करून तशा प्रकारचे विधान फक्त येथेच करता येते. प्रत्येकाची भाग्याची मर्यादा काय आहे, याचा अंदाज ज्याच्या त्याच्या जन्मपत्रिकेवरून येऊ शकतो. जे आपल्या भाग्यात आपण अनुभवतो त्यापेक्षा जास्त, तसेच जे आपल्या भाग्यातच नाही, असे आपल्याला वाटते, ते सर्व साध्य करण्यासाठी योग्य त्या कर्माची योजना करून ते येथून कार्यान्वित करता येते. यथायोग्य कर्म सातत्याने करतच राहिले तर आपल्या कल्पनेप्रमाणे यश संपादन करणे शक्य आहे. या प्रकारची विधाने व त्याचे प्रयोग अन्यत्र कोठेही होत नाहीत, असे येथे येऊन जाणारे लोक सांगतात.
३. वैदिक उपचार
ही पूजा व्यक्तिगत समस्येसाठी केली जाते, परंतु या पूजेमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांनाही सहभाग घेता येतो. कारण व्यक्तिगत व कौटुंबिक समस्यांसाठी ही पूजा केली जाते.
संकल्प हा ज्याचा त्यानेच करावा लागतो, परंतु ज्या ठिकाणी आईवड ील हेच अज्ञान पालनकर्ते असतात, तेथे पाल्याच्या वतीने तेही पूजा करू शकतात. पूजेचे फळ ज्याचे त्यालाच मिळते. जेथे कुटुंब सहभागी होते तेथे ते फळ पूजा करणार्याला व कुटुंबातील सदस्याला मिळू शकते.
ही आठ-दहा दिवसांची पूजा असते. यातील पहिल्या पाच दिवसांत विविध प्रकारची अनुष्ठाने करण्यात येतात, तर शेवटच्या तीन दिवसांत केलेल्या अनुष्ठानाचे हवन करण्यात येते. हा कार्यक्रम यजमानाच्या घरी किंवा त्याच्या इच्छेनुरूप इतरत्र कोठेही नाही, तर शक्तिपीठ, अकोला येथेच केला जातो. हा संपूर्ण कार्यक्रम यजमानातर्फे व यजमानाच्या इच्छेप्रमाणे होतो. ही त्याची विशेष पूजा असते. या पूजेत इतर कोणालाही सामील करून घेतले जात नाही.
यजमानाचे जे कोणते विशेष मुद्दे असतील किंवा जे असाध्य प्रश्न असतील किंवा ज्याचा व्यक्तीला किंवा कुटुंबाला विशेष त्रास होतो अशा कोणत्याही कारणासाठी ही पूजा करण्यात येते. घरात अस्थिरता व अशांतता असेल, पतिपत्नींमध्ये वादविवाद होत असतील, पतिपत्नीचे मतमतांतर, जीवनात दुःख, अस्थिरता व एकमेकांबद्दलचा कलुषितपणा वाढत असेल तर तो घालविण्यासाठी ही पूजा केली जाते.
काही कारण नसताना ग्रह फिरल्यासारखे होऊन दप्तरी किंवा राजदरबारी गैरसमज होऊन अटक करण्यात येते आणि त्याच्यावर चालू असलेला मुकदमा हा लांबतच राहतो. खोटे आळ, आरोप किंवा स्वतःचा काहीएक संबंध नसताना आपल्यावर एखादा गुन्हा लादला जातो. त्यामुळे समाजामध्ये आपली मानहानी होते. साम, दाम, दंड, भेद- कोणत्याही नीतिनियमाने प्रश्न सुटतच नसेल तर असे प्रश्न अनुष्ठान हवनाच्या माध्यमाने सोडविता येतात.
पूण्याच्या मध्यवर्ती वस्तीत एक रेस्टॉरंट होते. कॉर्पोरेशनच्या नियमाप्रमाणे त्याची बांधणी व उभारणी केली होती. सर्व संबंधित खात्यंाच्या लेखी परवानगीप्रमाणे रेस्टॉरंट उभे केले होते. सर्व अद्ययावत उपकरणे, यंत्रसामग्री व बैठकीची व्यवस्था उत्कृष्ट केली होती. सरकारी नियमाप्रमाणेच सर्व काही काम झाले होते. परंतु काही समाजकंटकांच्या दडपशाही धोरणामुळे आणि अधिकार्यांच्या स्वार्थी हेतूमुळे व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळत नव्हते. निरनिराळे राजकीय गट या प्रकरणात सामील झाले. कोणी परवानगी आणण्यासाठी प्रयत्न करीत होता तर कोणी ती मिळू नये यासाठी. सर्वच प्रकारची सरकारी खाती या प्रकरणात गुंतली होती. मंत्रालयापर्यंत जाऊन, पूढारीदेखील कामात बाधा निर्माण करतात. प्रयत्नशील होते. परंतु कोणत्याही नीतीचा अवलंब करून परवानगी मिळत नव्हती. शेवटी अनुष्ठान- हवनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. अनुष्ठानाचा कार्यक्रम संपण्यापूर्वीच कमिशनरची लेखी परवानगी हातामध्ये आली आणि सर्व विरोधी शक्ती शांत झाल्या. पूण्याच्या एका शक्तिशाली व धनाढ्य व्यक्तीचा व्यवसाय इन्कमटॅक्सच्या व अन्य खात्यांनी मिळून बंद पाडला आणि व्यवसायाला ताळे ठोकले. बराच प्रदीर्घ काळ निघून गेला होता. व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि भलामोठा व्यावसायिक खर्च चालूच राहिला होता. कोणत्याही मार्गाने व्यवसाय सुरू करता येत नव्हता. कायदेशीर दडपणे खूप होती. अनुष्ठान- हवनाच्या माध्यमातून ही सगळी बंधने गळून पडली आणि व्यवसाय पूर्वीसारखा जोमाने पहिल्या दिवसापासून सुरू झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यावसायिकावर अनेक आपत्ती एकाच वेळी कोसळल्या. बँकांचे घेतलेले ऋण परत न केले गेल्यामुळे व्याजासह तो आकडा फुगतच गेला. केंद्रीय सरकारच्या नोटिसीप्रमाणे खूपच मोठी रक्कम ही टॅक्स म्हणून भरण्याचे निर्देश आले. याशिवाय निरनिराळ्या खात्यांचे निरनिराळे आक्षेप त्यांच्यावर होते, हे व्यावसायिक क्षेत्र कर्जाच्या बदल्यात बँकेला देऊन टाकावे किंवा कर्जवसुली होईपर्यंत ते बँकांच्या नियंत्रणाखाली ठेवावे, असे कोर्टाचे आदेश होण्याचे जवळजवळ निश्चितच झाले होते. दरम्यान अनुष्ठान-हवनाच्या प्रयत्नांनी कोर्टाने आपला विचार बदलून मालकालाच तो व्यवसाय चालू ठेवून नियमबद्धपणे आर्थिक व्यवहार करण्यास सांगितले आणि या व्यवसायाची पूर्ण स्वतंत्रताही मालकाकडे ठेवली. पूढे मालकाने हर तर्हेचे प्रयत्न केले आणि सर्व तर्हेच्या प्रयत्नांना यश येऊन व्यवसाय क्षेत्रावरचा फार मोठा आर्थिक बोजा हा कायदेशीररीत्या दूर झाला आणि हळूहळू व्यवसाय पूर्णपणे मालकाच्या नियंत्रणात आला.
आई-वडील, एक मुलगा, एक मुलगी एवढे कुटुंब. वडील हे मोठ्या सरकारी हुद्द्यावरून निवृत्त झाले. मुलीचा विवाह योग्य ठिकाणी झाला. मुलगा विवाहयोग्य होता. बिजनेस मॅनेजमेंटमध्ये मोठ्या हुद्द्यावर होता. एकाएकी या मुलाचे संतुलन गेले आणि तो व्हायलंट झाला. मनाच्या विकृत अवस्थेत जाऊन आपल्याच वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न त्याने केला. योग बलवत्तर म्हणून वडील वाचले. चारचौघांनी मिळून त्याला धरून डॉक्टरकडे नेले. मनोरुग्ण म्हणून त्याच्यावर उपचार सुरू झाले. ही विकृती पूढे खूपच वाढली. म्हणून मोठ्या शहरातल्या एका मंटल हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केले. तिथे त्याला इंजेक्शन देणे, शॉक देणे, आदी प्रकार सुरू झाले. त्याच्या औषधोपचारांप्रमाणे त्याला निद्रिस्त अवस्थेत ते पूष्कळ ठेवत होते. वडिलांच्या विनंतीवरून त्याच्यावर वैदिक उपचार सुरू केले आणि अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीतच तो मुलगा नॉर्मल झाला. डॉक्टरी तपासणीत तो नॉर्मल असून, बाहेर राहण्यायोग्य आहे. कोणतेही घातपाती कृत्य तो करणार नाही, असा वैद्यकीय तपासणीनंतर निर्वाळा देण्यात आला. आज तो मुलगा स्वतंत्र व्यवसाय करीत आहे.
अमरावतीच्या एलआयसी शाखेच्या अधिकारीपदावर एकजण सेवारत होता. उत्तम कार्य केल्याबद्दल झोनल ऑफिसच्या लोकांनी त्याचा गौरव करण्याकरिता अमरावतीत मोठा कार्यक्रम योजला. कार्यक्रम चांगल्या थाटामाटात झाला. कार्यक्रम झाल्यावर तो रात्री घरी आला व घरातल्या सदस्यांबरोबर अल्प कालावधी घालवून सगळे शांत झोपी गेले. सकाळी ज्या वेळी उठले त्या वेळेला हा मुख्य अधिकारी भ्रमिष्ट झाल्यासारखा वाटला. त्याच्या चेहर्यावर हावभाव आणि वरतीच पाहण्याच्या लकबीवरून त्याच्या स्वतःवरचे नियंत्रण पूर्णपणे गेले, असे जाणवत होते. तो घरातल्या कोणालाच ओळखू शकला नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही. तो बोलू शकत नाही, काही करूही शकत नाही. त्याची ही अवस्था पाहून घरातले सर्व घाबरले. ताबडतोब डॉक्टरकडे नेऊन सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या केल्या. सर्व तपासण्या या नॉर्मल होत्या. कोणताच दोष वैद्यकीय तपासणीतून लक्षात आला नाही, परंतु त्याची अवस्था जशी होती तशीच होती. त्याला खाण्याचीही शुद्ध नव्हती. मोठ्या शहरात नेऊन पून्हा तपासण्या केल्या. कुठेच काही लक्षात आले नाही. त्यामुळे औषधोपचारदेखील सुरू झाले नव्हते. निरनिराळ्या मोठ्या स्पेशालिस्टांकडून तपासण्या केल्या, पण निदान काहीच झाले नाही. त्याची ही अवस्था जशीच्या तशीच होती. खूप मोठा कालावधी लोटल्यामुळे एलआयसीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी स्वतःच निर्णय घेऊन त्याची सेवा संपूष्टात आणली. त्याचे सर्व अधिकार काढून घेऊन त्याला सेवानिवृत्त केले. या त्याच्या अवस्थेत तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर तो नाथ शक्तिपीठाच्या संपर्कात आला आणि त्याच्यावर वैदिक उपचारांना सुरुवात झाली. अवघ्या पंधरा दिवसांच्या काळात त्याच्यात ५० टक्के सुधारणा झाली आणि सहा महिन्यांच्या कालावधीत तो पूर्ववत बरा झाला. एवढेच नाही, तर त्याच्या बाकी व्यक्तिगत समस्यांचेदेखील समाधान झाले. हे केवळ अनुष्ठान-हवनांच्या माध्यमातून स्थित्यंतर घडू शकले.
एका व्यक्तीला हळू हळू करत करत देणे वाढता वाढता ६० लाखांचे देणे झाले. घरदार, इस्टेट- सगळे गेले. उत्पन्नाचे साधनदेखील राहिले नाही, आणि पोलिस खात्याच्यादेखील धमक्या सुरू झाल्या. कोर्टाचा ससेमिरा सुरू झाला. गुप्तपणे राहून कसेतरी दिवस काढायचे, अशा तर्हेचा त्याचा कार्यक्रम सुरू होता. अनुष्ठान- हवनाच्या माध्यमातून वैदिक उपचार केल्यावर जवळजवळ तीन वर्षांच्या कालावधीपासूनच्या दडपणातून तो बाहेर पडला. बरीचशी देणी निकालात निघाली आणि राजसन्मानांनी त्याला समाजात वावरता येऊ लागले. हळूहळू तो आता पून्हा स्वावलंबी झाला.
पूण्याच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा व्यवसाय असणार्या व्यावसायिकाच्या शाळकरी मुलीच्या मानसिकतेमध्ये बरेच प्रश्न निर्माण झाले. सर्व तर्हेने शिस्तबद्ध वागणारी, नियमितपणे अभ्यास करणारी मुलगी एकाएकी शाळेत जात नाही, अभ्यास करीत नाही. सारखी रडत बसायची. व्यवसायामध्ये विशेष प्रकारचे यश नव्हते. धंदा हा भगीरथ प्रयत्नांनी चालू ठेवावा लागला. व्यवसायात काम करणारे कामगार आणि आप्तेष्ट, नातलग, मित्र यांच्या मनधरणीमध्ये बराच अवधी जायचा. कुटुंबातील लोकांचे आरोग्य यथातथाच होते. आप्तेष्टांकडून आर्थिक कुचंबणा झाली होती. व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा सुरळीतपणा, व्यवस्थितपणा नसायचा. सर्वच गोष्टींना विलंब खूप लागायचा. वैदिक उपचारांनंतर सर्वच परिस्थिती बदलली. मुलीची प्रकृती आठ-दहा दिवसांतच पूर्ववत झाली. सर्व वैद्यकीय उपचार बंद केले. व्यवसायामध्ये शिस्त, सुव्यवस्थितपणा येऊन कामे भराभर होऊ लागली. परदेशी माल जाऊ लागला आणि अल्पावधीतच यशस्वी कारखानदार म्हणून तो पूढे आला.
नागपूरच्या सरकारी खात्यात ऑडिटर म्हणून काम करणार्या पापभीरू, अतिसज्जन व सात्त्विक प्रवृत्तीच्या एका माणसावर पैसे खाल्ल्याचा खोटा आक्षेप आला, त्यांना नोकरीवरून सस्पेंड केले. घरामध्ये पत्नीची प्रकृती सदैव काही ना काही त्रास देत असे. कोर्टकचेरीमध्ये कच्चा निकाल यांना वाचून दाखविण्यात आला तो पूर्णतः त्यांच्या विरोधात होता. वैदिक उपचारांनंतर कोर्टाचा निकालदेखील बदलला. पत्नीचे स्वास्थ्यदेखील चांगले झाले आणि ते काळजीमुक्त झाले.
आंध्र प्रदेशातले नामवंत अद्वैत वेदान्ताचार्य आणि फार मोठा शिष्यसंप्रदाय असणारे महाराज यांना एक कन्या होती व जावई हे वेदपारंगत होते. मुलीचे आरोग्य पूर्णपणे बिघडलेले होते. काही दिवसांची ती साथी आहे, तिच्यावरचे हे गंडांतर जावे, यासाठी वैदिक उपचारांचा अवलंब केला आणि मरणोन्मुख असलेली मुलगी पूर्ववत संसार करू लागली.
पिंपरी-चिंचवडच्या एका गृहस्थाच्या मुलीचे व मुलाचे काहीही केल्या लग्न जमतच नव्हते. कोर्टकेसेसचे घरामध्ये विविध प्रकारचे त्रास होते. कोणत्याही गोष्टीस यश येत नव्हते. काहीतरी दैवी कोप आपल्या कुटुंबावर आहे, असे त्यांना जाणवायचे. हे सर्व वैदिक उपचारांनी दुरुस्त झाले. अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रात अग्रेसर कार्य करणारे एक गृहस्थ विविध प्रकारच्या समस्यांमध्ये अडकले होते. शंकराचार्यांचा उपदेश व आध्यात्मिक मार्गदर्शन त्यांना लाभले होते. जीवनातील विविध कुयोगांमुळे परिस्थिती विपरीत होऊन पूर्ण रसातळाला गेली होती. आता या परिस्थितीत पून्हा सर्व काही सावरून स्थिरपणे उभे राहू अशी परिस्थिती नव्हती, परंतु वैदिक उपचारांनी बिघडलेली पूर्ण परिस्थिती बदलून पून्हा पूर्ववत झाली व आर्थिक स्थैर्यावर ते उभे राहिले.
मॉस्को, रशिया येथे व्यवसाय करणारा, भारतीय व्यवसायातील एक अग्रणी विविध अडचणींमुळे, तेथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे आणि अपत्य नसल्यामुळे चिंतित झाला होता. कोणत्याही प्रयत्नाला यश येत नव्हते. नाथ शक्तिपीठाच्या मार्गदर्शनाने, वैदिक उपचाराने सर्व प्रश्न सुटले आणि जीवनामध्ये स्थिरता आली.
‘लिहिले न भाळीं त्याने वात्सल्य, प्रेम विधीने |
पण दोष ना कोणाचा, हा भोग संचिताचा |
योगी म्हणोनी कोणी कीर्तिगान गाती |
मज लोभ ना कशाचा, हा मार्ग स्वकर्माचा |’’
वैदिक क्षेत्रातल्या विविध पूजा, त्यांचे संकलन आम्हीच केले आहे. याच्या माध्यमातून जीवनातले कोणतेही प्रश्न सोडविता येतात. जो कोणी माणूस- कर्माने तो कितीही मोठा असो किंवा त्याला अनंत प्रकारचे क्लेश लागलेले असो, तरी योग्य कर्म केल्यावर त्यातून हवा तसा मार्ग काढता येऊ शकतो. याची अनुभूती १९९३ सालापासून नाथ शक्तिपीठातून अनेक लोक घेत आहेत.
शेवटी असे म्हणावे लागते, की पूर्वसंचित गुरुकृपेनेच समजते. त्याच्यावर केवळ सत्कृत्यानेच मात होऊ शकते. वेदमंत्र, यथायोग्य कर्म व गुरुमार्गदर्शन यांच्या संयोगाने कौटुंबिक जीवन तथा मानवी जीवन हे सुखी होऊ शकते व त्यायोगे पूर्वसंचितावर मात होते. ह्यासाठी गुरुकृपा हाच तरणोपाय आहे. म्हणून गुरूबद्दल सुज्ञपणे समजून घेणे जरूर आहे.