अर्पण पत्रिका

बौद्धिक तारे तोडणार्‍या मला ज्यांनी ज्ञानाची दिशा दिली, कर्महीन अशा माझ्याकडून ज्यांनी सतत कर्म करवून घेतलं, व्यवहारज्ञान व आध्यात्मिक ज्ञानाची ज्यांनी सांगड घालून दिली. भक्ती, बुद्धी चातुर्य व कारणमिमांसाचं ज्यांनी ज्ञान दिलं; वेद आणि धर्मग्रंथाची ओढ लावून दिली, नाथपथांचा महिमा स्वतः सांगून पंथ कार्यपद्धतीचं ज्ञान दिलं, विभूतीची सिद्धता कशी करावी हे सांगून त्याचा उपयोग कसा व केव्हा करावा, हे ज्यांनी सांगितलं; मंत्र, तंत्र, ध्यानधारणा, उपासना आदींचे ज्ञान देऊन ते लोकोद्धारार्थ कसं वापरायचं, जलात असोनी त्या वाचुनिया कसं रहायचं, हे ज्यांनी शिकवलं व स्वतः त्यांना पाहिजे तसं मला घडवलं आणि सरतेशेवटी म्हणाले, तू चालला तर मी चाललो, तू बोलला तर मी बोललो, जे तू केलं ते मी केलं, जे मी केलं ते तू केलं, मी म्हणजे तू तू म्हणजे मी आहे. तू आणि मी दोघेही एकच आहोत.हे एवंढ बोलून ज्यांनी पुढील गुरूकार्याची आज्ञा केली स्वतः कबूल केल्याप्रमाणे भगवान दत्तात्रेयांची सदेह भेट अनेक अनुयायांसमोर घालून दिली. त्या माझ्या प्राणांत सामावलेल्या सद्गुरू व्यंकटनाथमहाराजांच्या चरणकमली त्यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी कार्याला समर्पण

सद्गुरु व्यंकटनाथांचा चरणरज

नरेंद्र चौधरी

अकोला : दत्तजयंती, डिसेंबर २०११


Leave a Reply